कै. नारायणराव चिद्रावार व्याख्यानमालेत डॉ. विठ्ठल लहाने यांचे व्याख्यान देगलूर प्रतिनिधी, :- नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजातील नेते, देगलूरचे माजी नगराध्यक्ष , अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थेचे संस्थापक कै. नारायणराव चिद्रावार यांच्या ४० व्या स्मृतीदिनानिमित्त यावर्षी २ मे २०२६ रोज शनीवारी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे यंदाचे पुष्प जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जन व सुप्रसिद्ध वक्ते डॉ. विट्ठलराव लहाने हे "वैभवशाली भारतीय संस्कृती व राष्ट्र उभारणीत आपले योगदान " या विषयावर गुंफणार आहेत, सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून निजामबादचे आमदार धनपाल सूर्यनारायण गुप्ता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक तथा मा उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव श्री बालाजीराव पाटील ख़तगावकर व मा.आ. जितेशजी अंतापुरकर (देगलूर विधानसभा मतदारसंघ) या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या व्याख्यानमालेचे ३९ वर्षे पूर्ण झाले असून यंदाचे ४० वे वर्ष आहे. महाराष्ट्रातील थोर विचारवंत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यीक यांचे विचार लोकांपर्यंत जावेत व या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य व्हावे या सदहेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. आज पर्यंत या व्याख्यानमालेत ना. ग. गोरे, माजी अर्थमंत्री मधु दंडवते, प्रा. राम शेवाळकर, राजीव दीक्षित, बापुसाहेब काळदाते, माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य , माजी शिक्षणमंत्री सदानंद वर्दे, माजी न्यायाधीश कोळसे पाटील, गो. रा. खैरनार, मेधाताई पाटकर, सदाशिव अमरापुरकर, निळु फुले, सिंधुताई सपकाळ, डॉ. नरेंद्र दाभोळकर, चैतन्य महाराज देगलुरकर, प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. कुमार सप्तर्षी, सुरेश द्वादशीवार, डॉ. जगदीश हिरेमठ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे यांची व्याख्याने झाली आहेत . या वर्षी ०२ मे २०२६ रोजी सायंकाळी ०७:०० वा. देगलूर येथील नगरेश्वर मंदिर प्रांगण येथे आयोजित केला आहे. सर्व मान्यवरांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कै. नारायणराव चिद्रावार स्मृती व्याख्यानमालेच्या संयोजकांनी केले आहे.

- जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा2
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे1
- जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… पाण्यासाठी रात्रभर जागरण… लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ… ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे! ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का? तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी. पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही! #जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews1
- मुखेड शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा संपन्न. अनावरण सोहळा दिनांक : २५ एप्रिल २०२६ वेळ : सायं. ०६:०० वाजता स्थळ : जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण,मुखेड जि.नांदेड.1