देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळखंडोबाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि युवा नेते अभिजीत दीपके आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत. कुही येथे मांडला रोड ते थेट तहसील कार्यालयापर्यंत एक प्रचंड आणि 'महा-आक्रमक मोर्चा' काढण्यात आला. मांडला रोडवरून सुरू झालेल्या या जनसमुदायात सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते, शेतकरी, पालक आणि हजारो नागरिक दलीय मतभेद विसरून रस्त्यावर उतरले. "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा" आणि "सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांच्या मागण्या पूर्ण करा" अशा जोरदार घोषणांनी मांडला रोड ते तहसील कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मांडला रोडवर प्रचंड गर्दी जमल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. परीक्षांमधील घोळ, पेपर लीक आणि शैक्षणिक नुकसान यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला असून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. हा आक्रमक मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDO) करिश्मा प्रताप चौधरी आणि प्रशांत झाडे यांना महामहिम राष्ट्रपतींच्या नावे अत्यंत कडक शब्दांतील निवेदन सुपूर्द करण्यात आले. दिल्लीत उपोषणाला बसलेल्या प्रदर्शनकर्त्यांच्या मागण्यांवर २४ तासांच्या आत निर्णय झाला नाही आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आला नाही, तर मांडला रोडवरून सुरू झालेला हा लढा संपूर्ण नागपूर जिल्हा ठप्प करेल, असा थेट इशारा सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

- देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळखंडोबाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि युवा नेते अभिजीत दीपके आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत. कुही येथे मांडला रोड ते थेट तहसील कार्यालयापर्यंत एक प्रचंड आणि 'महा-आक्रमक मोर्चा' काढण्यात आला. मांडला रोडवरून सुरू झालेल्या या जनसमुदायात सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते, शेतकरी, पालक आणि हजारो नागरिक दलीय मतभेद विसरून रस्त्यावर उतरले. "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा" आणि "सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांच्या मागण्या पूर्ण करा" अशा जोरदार घोषणांनी मांडला रोड ते तहसील कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मांडला रोडवर प्रचंड गर्दी जमल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. परीक्षांमधील घोळ, पेपर लीक आणि शैक्षणिक नुकसान यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला असून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. हा आक्रमक मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDO) करिश्मा प्रताप चौधरी आणि प्रशांत झाडे यांना महामहिम राष्ट्रपतींच्या नावे अत्यंत कडक शब्दांतील निवेदन सुपूर्द करण्यात आले. दिल्लीत उपोषणाला बसलेल्या प्रदर्शनकर्त्यांच्या मागण्यांवर २४ तासांच्या आत निर्णय झाला नाही आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आला नाही, तर मांडला रोडवरून सुरू झालेला हा लढा संपूर्ण नागपूर जिल्हा ठप्प करेल, असा थेट इशारा सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.1
- भिवापूर आणि उमरेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर व तालुका वतीने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या विकासाला आणि शेवटच्या माणसाच्या कल्याणाला प्राधान्य दिले; जनतेशी जोडलेली त्यांची नाळ, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, विकासाविषयीची दूरदृष्टी आणि कार्यकर्त्यांवरील निस्सीम प्रेम यामुळे लाखो लोकांच्या हृदयात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर माजी जिल्हाध्यक्ष राजुभाऊ राऊत, नगर पंचायत उपाध्यक्ष रुचित पंजलवार, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक नाजिम बेग, तालुका अध्यक्ष अशोक गोंगल, युवा नेते पवन राऊत, डॉ. राहुल राऊत, तभाने, दिनेश बडनाग, अर्जुन ठाकरे, रोहित खेटमाली यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्याच्या तपासी पथकाने घरफोडीच्या एका गंभीर प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करून तो तक्रारदाराला परत सोपवला आहे. २० जुलै २०२६ रोजी भंडारा रोड, पारडी येथील रहिवासी आदित्य गौरव आर्य (वय २१) यांनी त्यांच्या 'वन क्लीकी एंटरप्रायझेस' या दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह साहित्य चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती व आरोपीच्या गुन्हे करण्याच्या विशिष्ट पद्धतीचा (मोडस ऑपरेंडी) अभ्यास करून तपास सुरू केला. आरोपी रात्रीच्या वेळी बंद दुकाने व आस्थापनांचे शटर उचकटून मौल्यवान साहित्याची चोरी करत असल्याचे तपासात पुढे आले. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून पाचपावली येथील मिनीमाता नगरचा रहिवासी ओमप्रकाश पुनम लहरे (वय २६) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने या चोरीची कबुली दिली. आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेसंबंधी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून चोरीचा सर्व माल जप्त करून तक्रारदाराकडे सुपूर्द करण्यात आला आहे.1
- नागपूर शहरातील पार्टी कार्यालयात दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. नागपूर शहर येथील पार्टी कार्यालयात त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली.1
- माजी आमदार सुधीर पारवे यांच्या उमरेड मतदारसंघातील विविध गावांमध्ये १० हजार झाडे लावण्याच्या संकल्पनेतून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक २ जुना धान्यगंज येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सुधीर पारवे फाउंडेशन, लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था (भिवापूर) आणि भारतीय जनता पार्टी उमरेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन व हरित भविष्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. हा वृक्षारोपण कार्यक्रम “एक पेड, माँ के नाम” या संकल्पनेखाली पार पडला. या अभियानाअंतर्गत वड, पिंपळ, कडूनिंब, आवळा, जांभूळ, करंजी आणि उंबर यांसारख्या विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष व गटनेते सतीश चौधरी, आरोग्य व स्वच्छता विभाग सभापती वैष्णवी लाडेकर, शिक्षण सभापती वैशालीताई राजेश बांदरे, नगरसेवक प्रणय मधुकर मेश्राम, महामंत्री राकेश नौकरकर, महामंत्री गिरीश लेंडे, अमितजी लाडेकर, तुषारजी ढोरे, विशालजी बेले, बालाजी मुंगले, राजूजी वाघमारे, निखिलजी नकाते, संजयजी नखाते, विश्लेष चकोले आणि हिमांशू बहादुरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- काँग्रेसने आपली नौटंकी बंद करावी आणि स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचे काम करू नये, असा घणाघाती इशारा देण्यात आला आहे. राजकीय फायद्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणे आणि त्यांची माथी भडकवणे काँग्रेसने थांबवावे, असे स्पष्ट करत त्यांच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे.1
- कळमेश्वर येथील ब्राह्मणी गाडगे लेआउट परिसरातील सम्राट ग्राउंडजवळ एक इसम आजारी अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे यांनी आपले सहकारी प्रतीक बागडे आणि रोशन आगरकर यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला मदत केली. सदर व्यक्तीला पुढील उपचारासाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, उपचारादरम्यान संबंधित व्यक्तीची ओळख आता पटली असून त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. त्याची आई उद्या कळमेश्वर येथे येणार असल्याची माहिती मिळाली आहे. एन वेळेवर मदत करून त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.1