*हे घ्या, आणखी एक समिती; शिक्षकांनो लागा कामाला! शिक्षक नेते म्हणतात, 'आता अशैक्षणिक वर्षच घोषित करा' *शिक्षक वर्गात प्रचंड रोष आयकॉन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अमरावती: शाळा पातळीवर विविध समित्या आधीच कार्यरत आहेत. आता पुन्हा एकाची भर पडणार. राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये महिला कर्मचार्यांच्या व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व जिल्ह्यांतून शाळांमधील या समित्यांच्या स्थापनेची अद्ययावत माहिती विहित नमुन्यात मागवली आहे. *कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई* ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम, २०१३’ मधील नियमांनुसार राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये ही समिती गठित करणे अनिवार्य आहे. शासकीय कार्यालयांमधील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शालेय स्तरावर महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने शिक्षण आयुक्तालय स्तरावर हा डेटा संकलित केला जात आहे. *माहिती संकलनाचे मुद्दे* शिक्षण संचालनालयाने दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हा आणि तालुका स्तरावर खालील माहिती संकलित केली जाणार आहे. एकूण शाळांची संख्या (तालुका व जिल्हा निहाय), अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन केलेल्या शाळांची संख्या आणि त्यांची टक्केवारी, समिती स्थापन न केलेल्या शाळांची संख्या तसेच अशा शाळांवर केलेली किंवा प्रस्तावित कारवाई.सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), महानगरपालिकांचे शिक्षण/प्रशासन अधिकारी आणि बृहन्मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना ही माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षक नेते सांगतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा स्तरावर सुरुवातीला अनेक वर्षांपूर्वी ग्राम शिक्षण समिती नावाची एकच समिती होती. त्यानंतर वेगवेगळ्या समित्या वाढतच गेल्या. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती ही सवैधानिक समिती असतानाच सोबतच १४ समित्या शाळा स्तरावर गठित करावे लागल्या. प्रत्येक समितीच्या नोटीस काढणे, सभा लावणे, इतिवृत्त लिहिणे व रेकॉर्ड जतन करणे ही कामे करत असताना प्राथमिक शाळा स्तरावर मुख्याध्यापक शिक्षकांना प्रचंड त्रास व्हायला लागला. कारण एक शिक्षक दोन-तीन वर्ग, यातही बहुतांशी ठिकाणी मुख्याध्यापकाचा प्रभार, कोणताही शिक्षकेतर कर्मचारी नाही. ऑनलाइन व ऑफलाइन माहितीचा ससेमिरा यामुळे हैराण होऊन संघटनेने अनेकदा आंदोलने केली पाठपुरावा केला. नंतरच्या मागील दोन वर्षांपूर्वी शाळा स्तरावर समित्यांची संख्या कमी करून चार वर आणण्यात आली. परंतु आता पुन्हा त्यामध्ये भर पडत आहे. आता सहा समित्या तयार झाल्या आहेत. *शैक्षणिक की अशैक्षणिक* प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे म्हणतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेत कामकाज करताना वेगवेगळ्या समित्या त्यांचे अहवाल, सभा आणि अन्य ऑनलाइन, ऑफलाइन कामे, प्रशिक्षणे वाढतच आहे. कमी शिक्षक संख्येत अशा प्रकारच्या कामांमुळे दैनंदिन शैक्षणिक कार्य प्रभावित होते. यावर्षी तर दैनंदिन अध्यापन करण्यापासून शिक्षकांना दूर ठेवणाऱ्या कामांची मोजमापच करता येत नाही. कोरोना काळासारखी अभूतपूर्व स्थिती प्राथमिक शाळांची झालेली आहे. हे वर्ष अशैक्षणिक वर्षच घोषित करण्याची वेळ आली आहे. शासन-प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गांभीर्याने विचार करून मार्ग काढला पाहिजे. शिक्षकांना शिकविण्यासाठी वेळ दिला पाहिजे.

- नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी माननीय मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना धीर देत, घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे, असा विश्वास दिला.1
- छत्रपती संभाजीनगर...शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छत्रपती संभाजीनगर... शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ANC : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन अर्थात मुप्टा संघटना आक्रमक झाली आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी शेकडो शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, यासह इतर विविध मागण्या शिक्षकांनी प्रशासनासमोर मांडल्या. यासंदर्भात मुप्टाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. शिक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या मागण्यांवर काय निर्णय घेतो, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. बाईट- मुप्टा शिक्षक संघटना अध्यक्ष राजेंद्र जाधव2
- डोळ्यांसमोर वाहून गेली घरं, पूल अन् गाड्या; नेपाळमध्ये महापुराचा कहर! नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत महापुराने थैमान घातले असून, पूराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की घरं, पूल आणि वाहने डोळ्यांसमोर वाहून गेल्याचे थरकाप उडवणारे दृश्य समोर आले आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. #NepalFlood #FlashFlood #Nepal #Flood #BreakingNews1
- 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService1
- ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे सुविधेचा अभाव, मा.आमदार उदयसिंग राजपूत यांनी तीव्र शब्दात नाराजी1
- पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ1
- ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह. 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन पाहायला मिळाले. एका बाजूला मुस्लिम बांधवांनी भव्य आणि शांततापूर्ण जुलूस काढला, तर दुसऱ्या बाजूला 'अल-कुरेशी बॉईज'च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवण्यात आला आहे. पाहूया या विशेष कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ढोरकीन शहरात आज भव्य जुलूस काढण्यात आला. तसेच 'अल-कुरेशी बॉईज, ढोरकीन' यांच्या पुढाकाराने राजाबाग सवार दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. "चला रक्तदान मोहीम राबवूया... रक्तदान करून जीव वाचवूया" हा संदेश देत तरुणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. संकलित झालेले रक्त 'दत्ताजी भाले रक्तकेंद्र' यांच्या माध्यमातून गरजूंसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मौलाना काशिफ रजा, मौलाना अबू, सुफियान कुरेशी, निसार कुरेशी, जावेद कुरेशी, अय्यूब कुरेशी, जब्बार कुरेशी, जुबेर कुरेशी, मोईन कुरेशी, इरफान कुरेशी, मुक्रम कुरेशी, इम्रान कुरेशी, मुजीब कुरेशी, इस्माईल कुरेशी, अजिम कुरेशी, युनुस कुरेशी, फकिर कुरेशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.1
- चार लाख भाविकांनी खुलताबाद येथे पैगंबर मोहम्मद सल्ललाहुअलैह व सल्लम यांचे पोशाख व मू ए मुबारक चे दर्शन घेतले,1