logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धक्कादायक! शरीरसुखास नकार दिल्याने गर्भवती पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या; रावेर तालुक्यातील संतापजनक घटना. ​रावेर (जळगाव): रावेर तालुक्यातील निमशेत (सायबूपाडा) शिवारात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ शरीरसुखाच्या मागणीला नकार दिला म्हणून एका नराधम पतीने आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या केली. या क्रूर कृत्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, रावेर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव लालू शरद पावरा (वय २५, रा. निमड्या, ता. रावेर) असे आहे. लालू या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ३ ते ५ वाजेच्या सुमारास पती शरद मिरलाल पावरा याने राहत्या घराच्या पाठीमागील जंगलात पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, गर्भधारणेमुळे होत असलेल्या शारीरिक त्रासामुळे लालू यांनी पतीला नकार दिला. ​या किरकोळ कारणावरून संतापलेल्या शरदने आपल्या पत्नीला जमिनीवर पाडले. तिचे हात-पाय दाबून धरत तिच्या छातीवर बसून दोन्ही हातांनी गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता, नराधम शरदने तिने अंगात घातलेल्या शर्टच्या साहाय्याने तिचा गळा आवळून तो शर्ट झाडाला बांधला आणि तेथून पळ काढला. ​पोलीस कारवाई आणि तपास ​या घटनेबाबत पोलीस पाटील रमजान अहमद तडवी (रा. अंधारमळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (फैजपूर विभाग) अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. ​घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास रावेर पोलिसांनी सापळा रचून आरोपी पती शरद मिरलाल पावरा याला अटक केली. १३ एप्रिल रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रावे गतिमान केली आहेत. ​परिसरात खळबळ ​एका गर्भवती महिलेची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

on 15 April
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
on 15 April

धक्कादायक! शरीरसुखास नकार दिल्याने गर्भवती पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या; रावेर तालुक्यातील संतापजनक घटना. ​रावेर (जळगाव): रावेर तालुक्यातील निमशेत (सायबूपाडा) शिवारात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ शरीरसुखाच्या मागणीला नकार दिला म्हणून एका नराधम पतीने आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या केली. या क्रूर कृत्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, रावेर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव लालू शरद पावरा (वय २५, रा. निमड्या, ता. रावेर) असे आहे. लालू या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ३ ते ५ वाजेच्या सुमारास पती शरद मिरलाल पावरा याने राहत्या घराच्या पाठीमागील जंगलात पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, गर्भधारणेमुळे होत असलेल्या शारीरिक त्रासामुळे लालू यांनी पतीला नकार दिला. ​या किरकोळ कारणावरून संतापलेल्या शरदने आपल्या पत्नीला जमिनीवर पाडले. तिचे हात-पाय दाबून धरत तिच्या छातीवर बसून दोन्ही हातांनी गळा आवळला. एवढ्यावरच न थांबता, नराधम शरदने तिने अंगात घातलेल्या शर्टच्या साहाय्याने तिचा गळा आवळून तो शर्ट झाडाला बांधला आणि तेथून पळ काढला. ​पोलीस कारवाई आणि तपास ​या घटनेबाबत पोलीस पाटील रमजान अहमद तडवी (रा. अंधारमळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (फैजपूर विभाग) अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. ​घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध सुरू करण्यात आला होता. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास रावेर पोलिसांनी सापळा रचून आरोपी पती शरद मिरलाल पावरा याला अटक केली. १३ एप्रिल रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रावे गतिमान केली आहेत. ​परिसरात खळबळ ​एका गर्भवती महिलेची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धुळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कडक कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच त्या संदर्भात राजकीय स्तरावर बदलाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
    1
    धुळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. पश्चिम बंगालमधील परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी कडक कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच त्या संदर्भात राजकीय स्तरावर बदलाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Anis qureshi sillod
    1
    Post by Anis qureshi sillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
    1
    बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.
पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.
    1
    महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते.
यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले.
अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    15 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर मधील अतुल सावे साहेब व माननीय संजयजी शिरसाट यांच्या हस्ते शुभारंभ उपस्थित माननीय कल्याणजी काळे साहेब व माननीय अनुराधाताई चव्हाण राजगुरू साहेब तसेच राजेंद्र जंजाळ साहेब तसेच माननीय सर्व पदाधिकारी व आयुक्त साहेब तसेच सर्व भागातील प्रभागातील झोनल व प्रभा ग अधिकारी तसेच नगरसेवक हे सगळ्यांनी उपस्थित होते व कामगारांना गाड्या सोपवण्यात करण्यात आला व गाड्या वाटप करण्यात आले व आज कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या हक्कासाठी व नवीन कामगारांना संधी देणे देण्यात आली तसेच महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन घंटागाडी जेसीबी टिप्पर 407 व टाटा एसी व टाटा एसी ev छत्रपती संभाजी नगर मधील प्रभागांमध्ये रूट मॅप सहित नागरिकांना सेवेसाठी देण्यात आले तसेच
    4
    छत्रपती संभाजी नगर मधील अतुल सावे साहेब व माननीय संजयजी शिरसाट यांच्या हस्ते शुभारंभ उपस्थित माननीय कल्याणजी काळे साहेब व माननीय अनुराधाताई चव्हाण राजगुरू साहेब तसेच राजेंद्र जंजाळ साहेब तसेच माननीय सर्व पदाधिकारी व आयुक्त साहेब तसेच सर्व भागातील प्रभागातील झोनल व प्रभा ग अधिकारी तसेच नगरसेवक हे सगळ्यांनी उपस्थित होते व कामगारांना गाड्या सोपवण्यात करण्यात आला व गाड्या वाटप करण्यात आले व आज कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या हक्कासाठी व नवीन कामगारांना संधी देणे देण्यात आली तसेच महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन घंटागाडी जेसीबी टिप्पर 407 व टाटा एसी व टाटा एसी ev छत्रपती संभाजी नगर मधील प्रभागांमध्ये रूट मॅप सहित नागरिकांना सेवेसाठी देण्यात आले तसेच
    user_Sushil Navkar
    Sushil Navkar
    City Star Aurangabad, Maharashtra•
    5 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Anis qureshi sillod
    1
    Post by Anis qureshi sillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात* *सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट* छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *जनगणनेत सहभागाचे आवाहन* देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *पुरस्कार वितरण* याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. ०००००
    1
    *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात*
*सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट*
छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. 
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. 
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली.
ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. 	त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.  सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.  आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री  शिरसाट यांनी केले. 
*जनगणनेत सहभागाचे आवाहन*
देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले.
*पुरस्कार वितरण*
याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी   राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल  पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले.
सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी  कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. 
सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. 
०००००
    user_Global bharat
    Global bharat
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.