सुकळी साठवण तलाव रद्द करा,रिपब्लिकन सेनेची मागणी, आंदोलनाचा इशारा सेनगाव तालुक्यातील प्रस्तावित सुकळी साठवण तलाव प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार सेनगाव यांच्यामार्फत आज जिल्हाधिकारी हिंगोली यांना निवेदन सादर करण्यात आले. सुकळी साठवण तलाव प्रकल्पामुळे चार गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या जमिनी,पाणी व उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे तात्काळ सदर प्रकल्प रद्द करून येलदरी धरणातून सेनगाव तालुक्याला पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा १५ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आज देण्यात आले. या धरणे आंदोलनामध्ये चारही गावातील समस्त ग्रामस्थ,शेतकरी,महिला व पुरुष तसेच रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी होणार असून त्या अनुषंगाने सदर प्रश्नावर योग्य तो निर्णय प्रशासनाने घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनामध्ये प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे करण्यात आल्या आहेत सुकळी साठवण तलाव प्रकल्प रद्द करण्यात यावा,येलदरी धरणातून सेनगाव तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यात यावे,शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनी संपादन करण्यात येऊ नये,प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ग्रामस्थांच्या हक्काचे व हितांचे संरक्षण करण्यात यावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून या निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू इंगोले, सेनगाव तालुकाध्यक्ष सर्जेराव खंदारे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय वाकळे, आकाश कांबळे,योगेश वाढवे,मंगेश पडघान यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

- मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे1
- सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते1
- कळमनुरी येथे भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून वाद,शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीच्या कारणावरून शिरस्तेदार व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दि.26 आगष्ट रोजी प्राप्त झाली आहे. सदर घटना ही घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कळमनुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून याप्रकरणी कार्यालयातील शिरस्तेदार शेख रफीक शेख अब्दुला यांनी 25 ऑगस्ट रोजी तोंडी फिर्याद दिली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीच्या नातेवाईकांच्या आखाडा बाळापूर येथील सर्वे क्रमांक 82/3 मधील शेतीच्या मोजणीच्या कारणावरून आरोपी केशव शंकरराव बोंढारे, विशाल अशोक बोंढारे, मंगेश केशव बोंढारे आणि दिगंबर शंकरराव बोंढारे (सर्व रा. आखाडा बाळापूर) यांनी संगनमत करून कार्यालयात येत फिर्यादी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.यावरून कळमनुरी परिसरात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास आडे हे अधिक तपास करीत आहेत .1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा1
- परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन परभणी जिल्हा परिषद कार्यालयात रिपब्लिकन युवा सेनेचे आंदोलन1
- *ई-चलान मेसेजमुळे १० बनावट ऑटो रिक्षांचे रॅकेट उघड* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे वाशिम : हिंगोली येथील एका रिक्षाचालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला. आपली रिक्षा वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले, याची माहिती घेण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता बनावट नंबरप्लेटच्या ऑटो रिक्षांचे रॅकेट उघडकीस आले. पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व पथकाने शुक्रवार पेठ येथील दादाराव राजाराम घुगे (वय ५२) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या. तपासणीदरम्यान या रिक्षांच्या नंबरप्लेट, चेसिस नंबर तसेच खरेदीची कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी प्रत्येक ऑटो दररोज २५० रुपये भाड्याने देत असल्याचेही समोर आले. या कारवाईत ८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला वाशिम शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३३६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.2
- संपामुळे मनपातील सेवा ठप्प; नागरिकांची गैरसोय थांबवा— समाजसेवक सय्यद अकबर अली संपामुळे मनपातील सेवा ठप्प; नागरिकांची गैरसोय थांबवा— समाजसेवक सय्यद अकबर अली1