logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अण्णासाहेब पाटील महामंडळाची वैयक्तिक व गट कर्ज सुलभ परतावा योजना. नांदेड दि. 16 एप्रिल :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत बँक मंजुरी स्तरावर “Reject for Incomplete Documents” अर्थात अपूर्ण कागदपत्रांमुळे Reject स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार आहेत. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित प्रकरण “Scrutiny” स्तरावर दिसेल. त्या ठिकाणी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी “Submit” पर्याय उपलब्ध होईल. “Submit” केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल व त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात, लाभार्थी व्याज परताव्यासाठी क्लेम सादर करत असताना कागदपत्रांमधील त्रुटींमुळे Hold स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसह दिसतील. अशा प्रकरणांचे त्वरित निराकरण करण्यासाठी लाभार्थ्यांनी संबंधित त्रुटींची पूर्तता जिल्हा समन्वयकांमार्फत करावी. सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे जिल्हा समन्वयकांकडून प्राथमिक तपासणी व विभागीय समन्वयकांकडून पुढील प्रक्रिया पूर्ण करून प्रकरण मुख्यालयाकडे पाठविले जाईल. लाभार्थ्यांनी Hold स्थितीतील कारणे लक्षात घेऊन 15 दिवसांच्या आत कागदपत्रे पूर्ण करावीत. आवश्यक असल्यास जिल्हा समन्वयकांकडून मार्गदर्शन घ्यावे. भविष्यात Hold संबंधित कागदपत्रे लॉगिनवरून अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. पूर्वी व्याज परतावा खात्यात जमा झाल्यानंतरच पुढील क्लेम करता येत होता आता “Sent for CAFO” स्तरावर पोहोचताच पुढील क्लेम सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी प्रतीक्षा न करता सुविधा वापरावी. एकापेक्षा अधिक समान संपर्क क्रमांक, बँक तपशीलातील विसंगती तसेच कागदपत्रांमधील खाडाखोड या कारणांमुळे काही प्रकरणे Block करण्यात आलेली आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी योग्य संपर्क क्रमांक / बँक तपशील दुरुस्त करावेत. मूळ कागदपत्रांसह अर्ज जिल्हा समन्वयकांकडे सादर करावा. सर्व लाभार्थ्यांनी लॉगिनवर जाऊन Hold/Block कारणे तपासावीत, त्वरित कागदपत्रे पूर्ण करावीत. अडचण असल्यास जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. फक्त अधिकृत संकेतस्थळाव्दारेच प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.

on 17 April
user_Informative news
Informative news
Nanded, Maharashtra•

More news from Maharashtra and nearby areas
  • नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    1
    नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.  आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. 
नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    17 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    1
    खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    13 hrs ago
  • Post by Mushtaq Shaikh
    1
    Post by Mushtaq Shaikh
    user_Mushtaq Shaikh
    Mushtaq Shaikh
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.