logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी प्रतीकात्मक आंदोलन; काम तात्काळ सुरू करण्याची मागणी रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी प्रतीकात्मक आंदोलन; काम तात्काळ सुरू करण्याची मागणी बीड | प्रतिनिधी भाग्यनगर परिसरातील पारनेरकर महाराज सभागृह ते गीते हॉस्पिटल आणि डॉ. अरुण भस्मे यांच्या घरापर्यंत मंजूर झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "रस्ता कधी सुरू होणार?" हा जनतेचा ज्वलंत प्रश्न बनला असून, याच पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा यांच्या छायाचित्राला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या वतीने एकमुखी मागणी करत, मंजूर झालेल्या रस्त्याचे काम कोणताही विलंब न करता तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे (सामाजिक कार्यकर्ता) यांनी सांगितले की, या रस्त्याअभावी परिसरातील नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंजुरी मिळूनही काम सुरू न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी त्यांनी मागणी केली. या प्रतीकात्मक आंदोलनामुळे प्रशासनाने रखडलेल्या विकासकामांची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

16 hrs ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
16 hrs ago

रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी प्रतीकात्मक आंदोलन; काम तात्काळ सुरू करण्याची मागणी रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी प्रतीकात्मक आंदोलन; काम तात्काळ सुरू करण्याची मागणी बीड | प्रतिनिधी भाग्यनगर परिसरातील पारनेरकर महाराज सभागृह ते गीते हॉस्पिटल आणि डॉ. अरुण भस्मे यांच्या घरापर्यंत मंजूर झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "रस्ता कधी सुरू होणार?" हा जनतेचा ज्वलंत प्रश्न बनला असून, याच पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात स्वर्गीय अजितदादा यांच्या छायाचित्राला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या वतीने एकमुखी मागणी करत, मंजूर झालेल्या रस्त्याचे काम कोणताही विलंब न करता तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे (सामाजिक कार्यकर्ता) यांनी सांगितले की, या रस्त्याअभावी परिसरातील नागरिक, रुग्ण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंजुरी मिळूनही काम सुरू न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी त्यांनी मागणी केली. या प्रतीकात्मक आंदोलनामुळे प्रशासनाने रखडलेल्या विकासकामांची दखल घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खासदार डॉ कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली मस्तगढ येथे कॅंडल मार्च शिक्षाण मंत्रीचा राजीनामा विद्यार्थीचे संघर्षाला यश
    1
    खासदार डॉ कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली मस्तगढ येथे कॅंडल मार्च शिक्षाण मंत्रीचा राजीनामा  विद्यार्थीचे संघर्षाला यश
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • 2026 आषाढी वारीतील वारकऱ्यांची प्रभाकर महाराज मठामध्ये सेवा करताना
    1
    2026 आषाढी वारीतील वारकऱ्यांची प्रभाकर महाराज मठामध्ये सेवा करताना
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरात अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; ३०.२९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न सुरक्षा विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल ३० लाख २९ हजार ४९३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे मोती कारंजा, मोंढा आणि नवाबपुरा परिसरात दोन स्वतंत्र पथकांनी एकाचवेळी छापे टाकले. कारवाईदरम्यान विविध नामांकित ब्रँडचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास अन्न सुरक्षा विभागाकडून सुरू आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरात अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; ३०.२९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न सुरक्षा विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल ३० लाख २९ हजार ४९३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे मोती कारंजा, मोंढा आणि नवाबपुरा परिसरात दोन स्वतंत्र पथकांनी एकाचवेळी छापे टाकले. कारवाईदरम्यान विविध नामांकित ब्रँडचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास अन्न सुरक्षा विभागाकडून सुरू आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लातूर. दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प; २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य 'पंचसूत्री' सोहळा* *दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प; २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य 'पंचसूत्री' सोहळा* पत्रकार परिषदेत धर्मवीर भारती व व्यंकटेश पुरी यांनी जागवल्या देव, देश अन् धर्माच्या स्मृती! लातूर (दि. २८ जुलै) : "दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत," असे प्रतिपादन व्यंकटेश पुरी आणि प्रतिष्ठित उद्योजक धर्मवीर भारती यांनी केले. दशनाम गोसावी समाज , लातूर या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात सकाळी १०:०० वाजता आयोजित भव्य 'पंचसूत्री सोहळ्याची' माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते संयुक्तपणे बोलत होते. गेली ३१ वर्षे, म्हणजेच १९९६ पासून दशनाम गोसावी समाज ही संघटना लातूरमध्ये समाजकार्यात अत्यंत सक्रियपणे कार्यरत असून अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे, हाच वारसा पुढे नेत या भव्य कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत उद्योजक धर्मवीर भारती यांच्या समाज उन्नतीसाठीच्या मोठ्या योगदानाचा आणि त्यांनी समाजातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेळोवेळी पुढे केलेल्या मदतीच्या हाताचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी गोसावी वुमन्स विंगच्या सुरेखा धर्मवीर भारती (भारती मॅडम) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानच्या व्यापक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, २ ऑगस्ट रोजी होणारा हा पंचसूत्री सोहळा केवळ एक कौतुक सोहळा नसून समाज बांधणीसाठी घेतलेला एक ध्यास आहे. समाजातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी 'भारती फाउंडेशन'च्या वतीने शैक्षणिक साहित्यासोबतच शिलाई मशीन वाटप केवळ एवढ्यावरच न थांबता हळदीकुंकू आणि विविध सांस्कृतिक सणांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे काम ही विंग करत आहे. समाजातील विधवा महिलांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणून, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणे, हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत अल्का गोसावी यांच्यासह विनायक गिरी, राजेंद्र गिरी, मोती गिरी गोसावी, मकरंद गिरी, प्रमोद बन, पद्माकर गिरी, विश्वजीत गिरी, चंद्रशेखर गिरी आणि बाळासाहेब भारती आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून हभप श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून हभप श्री. अविनाशजी भारती महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. स्वप्निल भय्या भारती, प्रमुख अतिथी सूर्यकांता गिरी गोसावी, पुणे यांच्या सह महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांतून नामांकित व्यक्ती श्री. सुखदेव गिरी (कोल्हापूर), श्री. अनुप गोसावी (नाशिक), श्री. ओमप्रकाश गिरी (बीड), श्री. मुन्ना गिरी गोसावी, पंढरपूर आणि श्री. गणेश पुरी (नागपूर) हे प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यात सत्कार आणि स्कॉलरशिपचा लाभ मिळवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क मेमोसह ९९२०६ २११११ (मयूर भारती प्रॉपर्टीज ऑफिस) या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नावनोंदणी करून घेणे आवश्यक आहे. लातूरच्या या ऐतिहासिक आणि प्रबोधनपर सोहळ्यास दशनाम गोसावी समाजातील सर्व समाज बांधव, भगिनी, आणि युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्घाटकांच्या विचारांचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन दशनाम गोसावी समाज, लातूरच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्वांसाठी प्रीती भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
    1
    लातूर. दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प; २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य 'पंचसूत्री' सोहळा*


*दशनाम गोसावी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प; २ ऑगस्टला लातूरमध्ये रंगणार भव्य 'पंचसूत्री' सोहळा*
पत्रकार परिषदेत धर्मवीर भारती व व्यंकटेश पुरी यांनी जागवल्या देव, देश अन् धर्माच्या स्मृती!
लातूर (दि. २८ जुलै) : "दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुढील पिढीला सक्षम करण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत," असे प्रतिपादन व्यंकटेश पुरी आणि प्रतिष्ठित उद्योजक धर्मवीर भारती यांनी केले. दशनाम गोसावी समाज , लातूर या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात सकाळी १०:०० वाजता आयोजित भव्य 'पंचसूत्री सोहळ्याची' माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते संयुक्तपणे बोलत होते. गेली ३१ वर्षे, म्हणजेच १९९६ पासून दशनाम गोसावी समाज ही संघटना लातूरमध्ये समाजकार्यात अत्यंत सक्रियपणे कार्यरत असून अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे, हाच वारसा पुढे नेत या भव्य कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या पत्रकार परिषदेत उद्योजक धर्मवीर भारती यांच्या समाज उन्नतीसाठीच्या मोठ्या योगदानाचा आणि त्यांनी समाजातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेळोवेळी पुढे केलेल्या मदतीच्या हाताचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी गोसावी वुमन्स विंगच्या सुरेखा धर्मवीर भारती (भारती मॅडम) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानच्या व्यापक उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, २ ऑगस्ट रोजी होणारा हा पंचसूत्री सोहळा केवळ एक कौतुक सोहळा नसून समाज बांधणीसाठी घेतलेला एक ध्यास आहे. समाजातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी 'भारती फाउंडेशन'च्या वतीने शैक्षणिक साहित्यासोबतच शिलाई मशीन वाटप केवळ एवढ्यावरच न थांबता हळदीकुंकू आणि विविध सांस्कृतिक सणांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचे काम ही विंग करत आहे. समाजातील विधवा महिलांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणून, त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. कार्यपद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणणे, हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत अल्का गोसावी यांच्यासह विनायक गिरी, राजेंद्र गिरी, मोती गिरी गोसावी, मकरंद गिरी, प्रमोद बन, पद्माकर गिरी, विश्वजीत गिरी, चंद्रशेखर गिरी आणि बाळासाहेब भारती आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मुख्य सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक म्हणून हभप श्री. महादेव महाराज चाकरवाडीकर तसेच प्रमुख वक्ते म्हणून हभप श्री. अविनाशजी भारती महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. स्वप्निल भय्या भारती, प्रमुख अतिथी सूर्यकांता गिरी गोसावी, पुणे यांच्या सह महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यांतून नामांकित व्यक्ती श्री. सुखदेव गिरी (कोल्हापूर), श्री. अनुप गोसावी (नाशिक), श्री. ओमप्रकाश गिरी (बीड), श्री. मुन्ना गिरी गोसावी, पंढरपूर आणि श्री. गणेश पुरी (नागपूर) हे प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यात सत्कार आणि स्कॉलरशिपचा लाभ मिळवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मार्क मेमोसह ९९२०६ २११११ (मयूर भारती प्रॉपर्टीज ऑफिस) या क्रमांकावर त्वरित संपर्क साधून आपली नावनोंदणी करून घेणे आवश्यक आहे. लातूरच्या या ऐतिहासिक आणि प्रबोधनपर सोहळ्यास दशनाम गोसावी समाजातील सर्व समाज बांधव, भगिनी, आणि युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उद्घाटकांच्या विचारांचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन दशनाम गोसावी समाज, लातूरच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्वांसाठी प्रीती भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागृतीचे आवाहन; वेळेवर निदान आणि उपचारच ठरतील जीव वाचविण्याचा प्रभावी उपाय. २८ जुलै जागतिक कावीळ दिन : स्वच्छ पाणी, लसीकरण आणि जनजागृतीनेच कावीळमुक्त समाज शक्य!.. जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागृतीचे आवाहन; वेळेवर निदान आणि उपचारच ठरतील जीव वाचविण्याचा प्रभावी उपाय. २८ जुलै जागतिक कावीळ दिन : स्वच्छ पाणी, लसीकरण आणि जनजागृतीनेच कावीळमुक्त समाज शक्य!.. आज दिनांक 28 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : दरवर्षी २८ जुलै रोजी जगभरात जागतिक कावीळ दिन साजरा केला जातो. कावीळ (व्हायरल हिपॅटायटिस) हा यकृतावर परिणाम करणारा विषाणूजन्य आजार असून, वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी केले आहे.
    1
    जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागृतीचे आवाहन; वेळेवर निदान आणि उपचारच ठरतील जीव वाचविण्याचा प्रभावी उपाय.

२८ जुलै जागतिक कावीळ दिन : स्वच्छ पाणी, लसीकरण आणि जनजागृतीनेच कावीळमुक्त समाज शक्य!..


जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागृतीचे आवाहन; वेळेवर निदान आणि उपचारच ठरतील जीव वाचविण्याचा प्रभावी उपाय.
२८ जुलै जागतिक कावीळ दिन : स्वच्छ पाणी, लसीकरण आणि जनजागृतीनेच कावीळमुक्त समाज शक्य!..
आज दिनांक 28 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : दरवर्षी २८ जुलै रोजी जगभरात जागतिक कावीळ दिन साजरा केला जातो. कावीळ (व्हायरल हिपॅटायटिस) हा यकृतावर परिणाम करणारा विषाणूजन्य आजार असून, वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी केले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पिशोर-देवगाव रंगारीला तालुक्याचा दर्जा?; मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचा हर्षवर्धन जाधवांचा दावा कन्नड तालुक्यातील पिशोर आणि देवगाव रंगारीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना प्रशासकीय सुविधा अधिक सुलभ होऊन विकासकामांना वेग मिळेल, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे पिशोर व देवगाव रंगारी परिसरातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    पिशोर-देवगाव रंगारीला तालुक्याचा दर्जा?; मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचा हर्षवर्धन जाधवांचा दावा
कन्नड तालुक्यातील पिशोर आणि देवगाव रंगारीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचा दावा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना प्रशासकीय सुविधा अधिक सुलभ होऊन विकासकामांना वेग मिळेल, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे पिशोर व देवगाव रंगारी परिसरातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • दर्शनाम गोसावी समाजाची पत्रकार परिषद उत्साहात संपन्न ‘पंचसूत्री सोहळ्या’ची सविस्तर माहिती लातूर, दि.२८ (प्रतिनिधी) : दर्शनाम गोसावी समाज, लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद मंगळवारी हॉटेल भोज, हनुमान चौक, मेन रोड, लातूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘पंचसूत्री सोहळ्या’ची सविस्तर माहिती पत्रकारांसमोर मांडण्यात आली. यावेळी आयोजकांनी सांगितले की, समाजामध्ये शिक्षण, सामाजिक ऐक्य, गुणवंतांचा गौरव आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने पंचसूत्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, निवृत्त कर्मचारी व ज्येष्ठांचा सन्मान, ‘समाजभूषण पुरस्कार’ वितरण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत, तसेच समाज प्रबोधनपर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत समाजाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना, समाजातील युवकांना शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यावर भर देण्यात आला. समाज संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. आगामी पंचसूत्री सोहळा हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नसून समाजातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक प्रगतीचा संदेश देणारा सोहळा ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही करण्यात आले. पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील विविध प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि कॅमेरामन उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आयोजकांनी सविस्तर उत्तरे देत पंचसूत्री सोहळ्याची रूपरेषा स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेस धर्मवीर भारती, व्यंकटेश पुरी यांच्यासह दर्शनाम गोसावी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकारांचे आभार मानून पंचसूत्री सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
    1
    दर्शनाम गोसावी समाजाची पत्रकार परिषद उत्साहात संपन्न
‘पंचसूत्री सोहळ्या’ची सविस्तर माहिती

लातूर, दि.२८ (प्रतिनिधी) : दर्शनाम गोसावी समाज, लातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद मंगळवारी हॉटेल भोज, हनुमान चौक, मेन रोड, लातूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या पत्रकार परिषदेत रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘पंचसूत्री सोहळ्या’ची सविस्तर माहिती पत्रकारांसमोर मांडण्यात आली.
यावेळी आयोजकांनी सांगितले की, समाजामध्ये शिक्षण, सामाजिक ऐक्य, गुणवंतांचा गौरव आणि गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने पंचसूत्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, निवृत्त कर्मचारी व ज्येष्ठांचा सन्मान, ‘समाजभूषण पुरस्कार’ वितरण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत, तसेच समाज प्रबोधनपर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेत समाजाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना, समाजातील युवकांना शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यावर भर देण्यात आला. समाज संघटन अधिक मजबूत करण्यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
आगामी पंचसूत्री सोहळा हा केवळ सत्काराचा कार्यक्रम नसून समाजातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक प्रगतीचा संदेश देणारा सोहळा ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही करण्यात आले.
पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील विविध प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार आणि कॅमेरामन उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आयोजकांनी सविस्तर उत्तरे देत पंचसूत्री सोहळ्याची रूपरेषा स्पष्ट केली.
या पत्रकार परिषदेस धर्मवीर भारती, व्यंकटेश पुरी यांच्यासह दर्शनाम गोसावी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकारांचे आभार मानून पंचसूत्री सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    12 hrs ago
  • जालना शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पस शाळा समोर युवकाचा निर्घृण खून; धारदार शस्त्राने सपासप वार, शहरात खळबळ मयूर मेंदळे (24) या युवकाचा मृत्यू; खुनाचे कारण आणि आरोपींचा शोध अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू जालना शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पस शाळा समोर युवकाचा निर्घृण खून; धारदार शस्त्राने सपासप वार, शहरात खळबळ मयूर मेंदळे (24) या युवकाचा मृत्यू; खुनाचे कारण आणि आरोपींचा शोध अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू आज दिनांक 28 मंगळवार रोजी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पस शाळा समोर मंगळवारी रात्री 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास एका 24 वर्षीय युवकावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
    1
    जालना शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पस शाळा समोर युवकाचा निर्घृण खून; धारदार शस्त्राने सपासप वार, शहरात खळबळ

मयूर मेंदळे (24) या युवकाचा मृत्यू; खुनाचे कारण आणि आरोपींचा शोध अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू


जालना शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पस शाळा समोर युवकाचा निर्घृण खून; धारदार शस्त्राने सपासप वार, शहरात खळबळ
मयूर मेंदळे (24) या युवकाचा मृत्यू; खुनाचे कारण आणि आरोपींचा शोध अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू
आज दिनांक 28 मंगळवार रोजी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पस शाळा समोर मंगळवारी रात्री 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास एका 24 वर्षीय युवकावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.