logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने तब्बल २८ वर्षांपासून फरार असलेल्या सरकारी रकमेच्या अपहार प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. संजय केशवराव देशपांडे (वय ६२ वर्षे, रा. हलगरा, ता. निलंगा, जि. लातूर) असे या आरोपीचे नाव असून, तो हलगरा शाखा डाकघरात शाखा डाकपाल म्हणून कार्यरत असताना त्याने सरकारी रकमेचा अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. लातूर दक्षिण उपविभागाच्या अखत्यारीतील हलगरा शाखा डाकघरात बचत खातेदारांच्या ठेव रकमांच्या व्यवहारात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. आरोपी संजय देशपांडे याने प्राथमिक आरोग्य केंद्र हलगरा येथील कनिष्ठ लिपिक एल. डी. सूर्यवंशी यांच्या आर.डी. खात्यातील रक्कम काढण्यासाठी बनावट स्वाक्षरी करून २,६८३ रुपयांचा अपहार केला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलगरा येथील मुख्याध्यापक के. एच. शिंगारे यांच्या खात्यातील रकमा बनावट कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे काढून १४,६७८ रुपयांचा अपहार केला. संबंधित खातेदारांनी चौकशीदरम्यान विड्रॉल फॉर्मवरील स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचे स्पष्ट केले होते. या दोन्ही घटनांमधून आरोपीने एकूण १७,३६१ रुपयांच्या सरकारी रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी अपहार करून पोस्ट खात्याची अधिकृत नोंदवही व कागदपत्रे बनावट तयार केली होती. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १०/१९९८ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९, ४६७, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला आरोपीला नाममात्र अटक करण्यात आली होती; मात्र त्यानंतर तो न्यायालयीन कामकाजास गैरहजर राहत फरार झाला. तो वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध लागत नव्हता. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट आणि जाहीरनामा काढूनही तो मिळून येत नव्हता. अखेर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान, पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून आरोपी औसा रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून विशेष पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणी करून गांधी चौक पोलीस ठाण्यात हजर केले. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले व पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

1 hr ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago
716c110a-747f-44e9-b9f3-1e327ecedf0f

More news from Maharashtra and nearby areas
  • लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे 'राम कृष्ण हरी' आणि विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत पालखीचे प्रस्थान झाले आहे. या सोहळ्यात विठ्ठल नामाच्या गजराने अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून पालखी मार्गस्थ झाली आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे 'राम कृष्ण हरी' आणि विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत पालखीचे प्रस्थान झाले आहे. या सोहळ्यात विठ्ठल नामाच्या गजराने अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून पालखी मार्गस्थ झाली आहे.
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.
    1
    महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    21 hrs ago
  • अक्कलकोटचे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. सचिनजी अहिर साहेब अक्कलकोट येथे आले होते. यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि अक्कलकोटच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे मा. सिद्धरामजी म्हेत्रे साहेब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आणि राज्याच्या प्रगतीसह जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दौऱ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी एकमेकांशी विविध विकासकामांबाबत आणि अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली.
    1
    अक्कलकोटचे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. सचिनजी अहिर साहेब अक्कलकोट येथे आले होते. यावेळी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि अक्कलकोटच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे मा. सिद्धरामजी म्हेत्रे साहेब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले.

या प्रसंगी त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आणि राज्याच्या प्रगतीसह जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. या दौऱ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी एकमेकांशी विविध विकासकामांबाबत आणि अक्कलकोटच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    33 min ago
  • नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    2
    नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    user_जयपाल चांदोबा दावनगीरकर
    जयपाल चांदोबा दावनगीरकर
    Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    1 day ago
  • नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    1
    नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये स्वतःचेच गुण कमी असताना गुरुजनांना मार्गदर्शन करण्याच्या स्थितीवर उपरोधिक प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आमचे स्वतःचेच मार्क कमी आहेत, तर आम्ही तुम्हा गुरुजनांना काय मार्गदर्शन करावे, असा थेट सवाल करत या परिस्थितीवर तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
    1
    लातूरच्या शिरूर अनंतपाळमध्ये स्वतःचेच गुण कमी असताना गुरुजनांना मार्गदर्शन करण्याच्या स्थितीवर उपरोधिक प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आमचे स्वतःचेच मार्क कमी आहेत, तर आम्ही तुम्हा गुरुजनांना काय मार्गदर्शन करावे, असा थेट सवाल करत या परिस्थितीवर तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    12 hrs ago
  • लातूर शहराच्या दक्षिण भागातील संजय नगर भागात अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ सुरू असून दारूच्या नशेत एक महिला रस्त्यावर बेशुद्ध पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार, १२ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे संजय नगरमधील रहिवाशांमध्ये तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथील वॉर्ड क्रमांक चार आणि पाच अंतर्गत येणाऱ्या संजय नगर भागात घरोघरी अवैध दारूची विक्री केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या लहू वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरच ही महिला दारूच्या नशेत अत्यंत वाईट आणि बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडली होती. हे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून या महिलेला पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. हा संपूर्ण परिसर विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने संतप्त स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून विवेकानंद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    लातूर शहराच्या दक्षिण भागातील संजय नगर भागात अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ सुरू असून दारूच्या नशेत एक महिला रस्त्यावर बेशुद्ध पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार, १२ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे संजय नगरमधील रहिवाशांमध्ये तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथील वॉर्ड क्रमांक चार आणि पाच अंतर्गत येणाऱ्या संजय नगर भागात घरोघरी अवैध दारूची विक्री केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या लहू वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरच ही महिला दारूच्या नशेत अत्यंत वाईट आणि बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडली होती. हे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून या महिलेला पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. हा संपूर्ण परिसर विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने संतप्त स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून विवेकानंद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.