logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

2 hrs ago
user_ARIFKHAN AJMER KHAN JONVAL
ARIFKHAN AJMER KHAN JONVAL
फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago
e50323ac-6513-4945-86fb-70b9c43e889b

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून छाया राजू खाजेकर यांची नियुक्ती करण्यात आली, निष्ठावंत पक्षनिष्ठा चे फळ मिळाले आहे असे छाया राजू खाजेकर यांनी म्हटले आहे
    1
    छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून छाया राजू खाजेकर यांची नियुक्ती करण्यात आली,
निष्ठावंत पक्षनिष्ठा चे फळ मिळाले आहे असे छाया राजू खाजेकर यांनी म्हटले आहे
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मोबाईलच्या किरकोळ वादातून त्रिमूर्ती चौकात तरुणावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून आज त्याची धिंड काढत कडक संदेश दिला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरात मोबाईलच्या वादातून गंभीर गुन्हा घडला होता. सुमित उर्फ बाबासाहेब शेजवळ या आरोपीने संतोष ठोंबरे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात संतोष ठोंबरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी सुमित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर जवाहरनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. पोलिसांनी केवळ अटकच नाही तर आरोपीने ज्या ठिकाणी गुन्हा केला आणि तो ज्या भागात राहतो त्या परिसरात त्याची धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात कायद्याचा चांगलाच धाक निर्माण झाला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI माने, PSI सुतार तसेच पोलीस हवालदार गायकवाड, पोटे, पठाण, शिंदे आणि मारोती गोरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
    4
    मोबाईलच्या किरकोळ वादातून त्रिमूर्ती चौकात तरुणावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून आज त्याची धिंड काढत कडक संदेश दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरात मोबाईलच्या वादातून गंभीर गुन्हा घडला होता. सुमित उर्फ बाबासाहेब शेजवळ या आरोपीने संतोष ठोंबरे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात संतोष ठोंबरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आरोपी सुमित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर जवाहरनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. पोलिसांनी केवळ अटकच नाही तर आरोपीने ज्या ठिकाणी गुन्हा केला आणि तो ज्या भागात राहतो त्या परिसरात त्याची धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरात कायद्याचा चांगलाच धाक निर्माण झाला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI माने, PSI सुतार तसेच पोलीस हवालदार गायकवाड, पोटे, पठाण, शिंदे आणि मारोती गोरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अजिंठा घाटात मंगळवार (२१) सकाळी साडेसहा वाजता दोन ट्रक नादुरुस्त झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. जळगावहून छत्रपती संभाजीनगर कडे येणाऱ्या मार्गावर विटांनी भरलेला एक ट्रक व सिमेंट वाहतूक करणारा दुसरा ट्रक बंद पडल्याने रस्ता अडला. घाटातील अरुंद रस्ता व अवजड वाहनांची वर्दळ यामुळे सुमारे चार तास वाहतूक ठप्प राहिली. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवासी व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अजिंठा घाटात वारंवार कोंडी होत असल्याने नागरिकांनी अवजड वाहनांवर निर्बंध घालून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    सिल्लोड तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अजिंठा घाटात मंगळवार (२१) सकाळी साडेसहा वाजता दोन ट्रक नादुरुस्त झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. जळगावहून छत्रपती संभाजीनगर कडे येणाऱ्या मार्गावर विटांनी भरलेला एक ट्रक व सिमेंट वाहतूक करणारा दुसरा ट्रक बंद पडल्याने रस्ता अडला.
घाटातील अरुंद रस्ता व अवजड वाहनांची वर्दळ यामुळे सुमारे चार तास वाहतूक ठप्प राहिली. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवासी व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
अजिंठा घाटात वारंवार कोंडी होत असल्याने नागरिकांनी अवजड वाहनांवर निर्बंध घालून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Chetan Lokhande
    Chetan Lokhande
    Video Creator सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 min ago
  • Bharat 24taas News भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भायडी येथे नवागत विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यंदा शाळेत सुमारे 16 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला असून, त्यांच्या स्वागतासाठी वाजत-गाजत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. नव्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास प्रशाला भोकरदनचे मुख्याध्यापक श्री. कृष्णा जंजाळ, श्री. विष्णूपंत जंजाळ, श्री. विष्णू वसाने, श्री. अर्जुनराव वसाने,श्री.रावसाहेब वसाने, दत्ता जंजाळ,संदीप दसपुते,श्रीमती रुक्मण फरकाडे,तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दीपक ब्राह्मणे यांच्यासह अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांच्यासह गावकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील भेद एका प्रभावी पथनाट्याद्वारे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या महत्त्वावर आधारित उत्कृष्ट नृत्य सादरीकरण आणि लेझीम संचलनाने कार्यक्रमाला रंगत आणली.** **मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक श्री. कृष्णा जंजाळ यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तर श्री. विष्णुपंत जंजाळ यांनी शाळेसाठी सदैव सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुख्याध्यापक श्री. सुरेश इंगळे आणि श्री. के. डी. वाघ यांनी शाळेची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत माहिती देत सकारात्मक दृष्टिकोन मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. के. डी. वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. शिवाजी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती अंजना बोर्डे, के . टि.दांडगे व श्रीमती मंदा दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.** हा कार्यक्रम गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून,जिल्हा परिषद शाळेच्या उत्कर्षासाठी सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.बाहेरील गावात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता गावातील शाळेला प्राधान्य देत प्रवेश घेण्यासाठी तत्परता दाखवली आहे.
    2
    Bharat 24taas News 
भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भायडी येथे नवागत विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यंदा शाळेत सुमारे 16 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला असून, त्यांच्या स्वागतासाठी वाजत-गाजत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. नव्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रशाला भोकरदनचे मुख्याध्यापक श्री. कृष्णा जंजाळ, श्री. विष्णूपंत जंजाळ, श्री. विष्णू वसाने, श्री. अर्जुनराव वसाने,श्री.रावसाहेब वसाने, दत्ता जंजाळ,संदीप दसपुते,श्रीमती रुक्मण फरकाडे,तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दीपक ब्राह्मणे यांच्यासह अंगणवाडी सेविका,आशा  सेविका यांच्यासह गावकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील भेद एका प्रभावी पथनाट्याद्वारे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या महत्त्वावर आधारित उत्कृष्ट नृत्य सादरीकरण आणि लेझीम संचलनाने कार्यक्रमाला रंगत आणली.**
**मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक श्री. कृष्णा जंजाळ यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तर श्री. विष्णुपंत जंजाळ यांनी शाळेसाठी सदैव सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुख्याध्यापक श्री. सुरेश इंगळे आणि श्री. के. डी. वाघ यांनी शाळेची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत माहिती देत सकारात्मक दृष्टिकोन मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. के. डी. वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. शिवाजी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती अंजना बोर्डे, के . टि.दांडगे व श्रीमती मंदा दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.**
हा कार्यक्रम गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून,जिल्हा परिषद शाळेच्या उत्कर्षासाठी सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.बाहेरील गावात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता गावातील शाळेला प्राधान्य देत प्रवेश घेण्यासाठी तत्परता दाखवली आहे.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    5 hrs ago
  • sakshisanstoshi YouTube
    7
    sakshisanstoshi YouTube
    user_Sakshi Sahtosh
    Sakshi Sahtosh
    Librarian जालना, जालना, महाराष्ट्र•
    43 min ago
  • प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रतिनिधी D.M...
घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप
मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही.
कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    1
    संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद 
छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
🔹 घटनेचा तपशील:
माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही.
🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग:
घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण:
भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔹 पोलिसांचे आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा
    1
    सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.