Shuru
Apke Nagar Ki App…
sakshisanstoshi sakshisanstoshi YouTube
Sakshi Sahtosh
sakshisanstoshi sakshisanstoshi YouTube
More news from महाराष्ट्र and nearby areas
- दिलीप मोरे.. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे आज दिनांक २१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. यावेळी बाबासाहेबांची प्रतिमा आकर्षक पालखी व सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आली होती. डीजेच्या गजरात आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून वातावरण उत्सवमय झाले होते. विशेष म्हणजे व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईसह विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले भीमसैनिक या मौल्यवान दिवसाचे औचित्य साधत खास गावात दाखल झाले. त्यांनी मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला. गावातील इतर धर्मीय नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत सामाजिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला. महिला भगिनींचा सहभागही यंदा लक्षणीय होता. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी मिरवणुकीत सहभाग घेत वातावरण अधिक रंगतदार केले. ही भव्य मिरवणूक संध्याकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. संपूर्ण गावभर फिरत रात्री सुमारे नऊ वाजेपर्यंत मिरवणूक पुन्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. सजवलेल्या घोडा-पालखीत विराजमान बाबासाहेबांचा सोनेरी पुतळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गावात जणू दिवाळीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करत बाबासाहेबांना अभिवादन केले. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि संविधान मूल्यांचा संदेश देणारी ही जयंती सावळद बारा गावासाठी अविस्मरणीय ठरली.3
- Post by बुलढाणा माझा न्युज1
- Post by Ramesh Mulgir1
- LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra MAX PARBHANI LIVE 11
- बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची ३७० वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी दरवर्षी अक्षय्य तृतीयेला चर्चेचा विषय ठरते. मात्र, यंदा ही चर्चा भाकितांपेक्षा एका 'आव्हाना'मुळे अधिक गाजत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी भेंडवळच्या घटमांडणीला उघड आव्हान दिले आहे. ही प्रथा केवळ श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, यावरून आता राज्यभरात नवा वाद निर्माण झाला आहे.श्याम मानव यांनी भेंडवळच्या भाकितांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या खगोलशास्त्रीय किंवा सांख्यिकीय पुराव्याशिवाय वर्तवलेली ही भाकिते म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा खेळ आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, जर भेंडवळच्या घटमांडणीतील यंदाची भाकिते ९० टक्क्यांपेक्षा जास्त अचूक ठरली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ८० लाखांचे रोख पारितोषिक संबंधित महाराजांना दिले जाईल.श्याम मानव यांच्या या आव्हानामुळे भेंडवळच्या घटमांडणी करणाऱ्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंनिसचा दावा आहे की, केवळ अंदाज वर्तवून समाजात संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. विज्ञानाच्या कसोटीवर आणि अचूकतेच्या निकषावर ही भाकिते खरी ठरली पाहिजेत, अन्यथा हे अंधश्रद्धेचे प्रदर्शन असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.एकीकडे ३७० वर्षांची परंपरा जपणाऱ्या भाविकांची मोठी फळी आहे, ज्यांच्यासाठी हे भाकीत शेती नियोजनाचा एक अविभाज्य भाग आहे. तर दुसरीकडे, पुरोगामी विचारवंत आणि अंनिस याला विज्ञानाच्या चौकटीत बसवून तपासण्याची मागणी करत आहेत. '८० लाखांचे बक्षीस' हे केवळ एक निमित्त असून, त्यामागे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.1
- तेलंगाना के बोर्ड के अध्यक्ष परभणी जिले के केंद्र निरीक्षक अजमतउल्लाह हुसैनी के नेतृत्व में जिंतूर शहर संगठन सूजन अभियान5
- प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.1
- ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.1