सावळदबारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, भव्य मिरवणुकीने गाव दणाणले दिलीप मोरे.. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे आज दिनांक २१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. यावेळी बाबासाहेबांची प्रतिमा आकर्षक पालखी व सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आली होती. डीजेच्या गजरात आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून वातावरण उत्सवमय झाले होते. विशेष म्हणजे व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईसह विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले भीमसैनिक या मौल्यवान दिवसाचे औचित्य साधत खास गावात दाखल झाले. त्यांनी मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला. गावातील इतर धर्मीय नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत सामाजिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला. महिला भगिनींचा सहभागही यंदा लक्षणीय होता. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी मिरवणुकीत सहभाग घेत वातावरण अधिक रंगतदार केले. ही भव्य मिरवणूक संध्याकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. संपूर्ण गावभर फिरत रात्री सुमारे नऊ वाजेपर्यंत मिरवणूक पुन्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. सजवलेल्या घोडा-पालखीत विराजमान बाबासाहेबांचा सोनेरी पुतळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गावात जणू दिवाळीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करत बाबासाहेबांना अभिवादन केले. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि संविधान मूल्यांचा संदेश देणारी ही जयंती सावळद बारा गावासाठी अविस्मरणीय ठरली.
सावळदबारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, भव्य मिरवणुकीने गाव दणाणले दिलीप मोरे.. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे आज दिनांक २१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. यावेळी बाबासाहेबांची प्रतिमा आकर्षक पालखी व सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आली होती. डीजेच्या गजरात आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. गावातून भव्य मिरवणूक काढण्यात
आली असून वातावरण उत्सवमय झाले होते. विशेष म्हणजे व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईसह विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले भीमसैनिक या मौल्यवान दिवसाचे औचित्य साधत खास गावात दाखल झाले. त्यांनी मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला. गावातील इतर धर्मीय नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत सामाजिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला. महिला भगिनींचा सहभागही यंदा लक्षणीय होता. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी मिरवणुकीत सहभाग घेत वातावरण अधिक रंगतदार केले. ही भव्य मिरवणूक संध्याकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. संपूर्ण
गावभर फिरत रात्री सुमारे नऊ वाजेपर्यंत मिरवणूक पुन्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. सजवलेल्या घोडा-पालखीत विराजमान बाबासाहेबांचा सोनेरी पुतळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गावात जणू दिवाळीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करत बाबासाहेबांना अभिवादन केले. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि संविधान मूल्यांचा संदेश देणारी ही जयंती सावळद बारा गावासाठी अविस्मरणीय ठरली.
- दिलीप मोरे.. सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे आज दिनांक २१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. यावेळी बाबासाहेबांची प्रतिमा आकर्षक पालखी व सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आली होती. डीजेच्या गजरात आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेले. गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून वातावरण उत्सवमय झाले होते. विशेष म्हणजे व्यवसायानिमित्त पुणे, मुंबईसह विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले भीमसैनिक या मौल्यवान दिवसाचे औचित्य साधत खास गावात दाखल झाले. त्यांनी मिरवणुकीत उत्साहाने सहभाग नोंदवला. गावातील इतर धर्मीय नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहत सामाजिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला. महिला भगिनींचा सहभागही यंदा लक्षणीय होता. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी मिरवणुकीत सहभाग घेत वातावरण अधिक रंगतदार केले. ही भव्य मिरवणूक संध्याकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. संपूर्ण गावभर फिरत रात्री सुमारे नऊ वाजेपर्यंत मिरवणूक पुन्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. सजवलेल्या घोडा-पालखीत विराजमान बाबासाहेबांचा सोनेरी पुतळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. गावात जणू दिवाळीचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांनी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करत बाबासाहेबांना अभिवादन केले. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि संविधान मूल्यांचा संदेश देणारी ही जयंती सावळद बारा गावासाठी अविस्मरणीय ठरली.3
- संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.1
- सिल्लोड तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अजिंठा घाटात मंगळवार (२१) सकाळी साडेसहा वाजता दोन ट्रक नादुरुस्त झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. जळगावहून छत्रपती संभाजीनगर कडे येणाऱ्या मार्गावर विटांनी भरलेला एक ट्रक व सिमेंट वाहतूक करणारा दुसरा ट्रक बंद पडल्याने रस्ता अडला. घाटातील अरुंद रस्ता व अवजड वाहनांची वर्दळ यामुळे सुमारे चार तास वाहतूक ठप्प राहिली. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवासी व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अजिंठा घाटात वारंवार कोंडी होत असल्याने नागरिकांनी अवजड वाहनांवर निर्बंध घालून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- Bharat 24taas News भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भायडी येथे नवागत विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यंदा शाळेत सुमारे 16 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला असून, त्यांच्या स्वागतासाठी वाजत-गाजत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. नव्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देत स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास प्रशाला भोकरदनचे मुख्याध्यापक श्री. कृष्णा जंजाळ, श्री. विष्णूपंत जंजाळ, श्री. विष्णू वसाने, श्री. अर्जुनराव वसाने,श्री.रावसाहेब वसाने, दत्ता जंजाळ,संदीप दसपुते,श्रीमती रुक्मण फरकाडे,तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दीपक ब्राह्मणे यांच्यासह अंगणवाडी सेविका,आशा सेविका यांच्यासह गावकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील भेद एका प्रभावी पथनाट्याद्वारे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या महत्त्वावर आधारित उत्कृष्ट नृत्य सादरीकरण आणि लेझीम संचलनाने कार्यक्रमाला रंगत आणली.** **मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक श्री. कृष्णा जंजाळ यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. तर श्री. विष्णुपंत जंजाळ यांनी शाळेसाठी सदैव सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. मुख्याध्यापक श्री. सुरेश इंगळे आणि श्री. के. डी. वाघ यांनी शाळेची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजन याबाबत माहिती देत सकारात्मक दृष्टिकोन मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. के. डी. वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. शिवाजी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती अंजना बोर्डे, के . टि.दांडगे व श्रीमती मंदा दळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.** हा कार्यक्रम गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून,जिल्हा परिषद शाळेच्या उत्कर्षासाठी सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.बाहेरील गावात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता गावातील शाळेला प्राधान्य देत प्रवेश घेण्यासाठी तत्परता दाखवली आहे.2
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल नगरपालिका, यावल महोदय, यावल नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २, आयशानगर परिसरामध्ये असलेला नाला अनेक दिवसांपासून साफसफाई न करता तसाच पडून आहे. नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यात साचलेल्या घाण व पाण्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्यापूर्वी संबंधित विभागाने तात्काळ नाला सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती. अन्यथा उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील.1
- Post by विष्णु आखरे पाटील1
- Post by बुलढाणा माझा न्युज1
- प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1