logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सरपंच शंकर गायकवाड यांचा थेट मंत्री भरत गोगावले यांना फोन

3 hrs ago
user_विष्णु आखरे पाटील
विष्णु आखरे पाटील
पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
3 hrs ago

सरपंच शंकर गायकवाड यांचा थेट मंत्री भरत गोगावले यांना फोन

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रतिनिधी D.M...
घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप
मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही.
कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अजिंठा घाटात मंगळवार (२१) सकाळी साडेसहा वाजता दोन ट्रक नादुरुस्त झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. जळगावहून छत्रपती संभाजीनगर कडे येणाऱ्या मार्गावर विटांनी भरलेला एक ट्रक व सिमेंट वाहतूक करणारा दुसरा ट्रक बंद पडल्याने रस्ता अडला. घाटातील अरुंद रस्ता व अवजड वाहनांची वर्दळ यामुळे सुमारे चार तास वाहतूक ठप्प राहिली. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवासी व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अजिंठा घाटात वारंवार कोंडी होत असल्याने नागरिकांनी अवजड वाहनांवर निर्बंध घालून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    सिल्लोड तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अजिंठा घाटात मंगळवार (२१) सकाळी साडेसहा वाजता दोन ट्रक नादुरुस्त झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. जळगावहून छत्रपती संभाजीनगर कडे येणाऱ्या मार्गावर विटांनी भरलेला एक ट्रक व सिमेंट वाहतूक करणारा दुसरा ट्रक बंद पडल्याने रस्ता अडला.
घाटातील अरुंद रस्ता व अवजड वाहनांची वर्दळ यामुळे सुमारे चार तास वाहतूक ठप्प राहिली. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवासी व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
अजिंठा घाटात वारंवार कोंडी होत असल्याने नागरिकांनी अवजड वाहनांवर निर्बंध घालून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Chetan Lokhande
    Chetan Lokhande
    Video Creator सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बाळापूर तालुक्यातील रिधोरा शेतशिवारातील राजेश लोहिया यांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीने प्रशासकीय यंत्रणेचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला आहे. या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा लाखो रुपयांचा हरभरा साठा असतानाही, तिथे आग विझवण्यासाठी साधी पाण्याची सोय किंवा 'फायर ऑडिट' नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर विषयावर रिधोरा येथील पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारच्या सुमारास राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊन परीसरात भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. ज्या गोडाऊनमध्ये शासकीय माल (नाफेड आणि सीसीआय) साठवला जातो, तिथे नियमानुसार अग्निशमन यंत्रणा आणि पाण्याची पुरेशी व्यवस्था असणे अनिवार्य आहे. मात्र, रिधोरा येथील या गोडाऊनमध्ये आगीच्या वेळी पाण्याचा टँकर सोडाच, पण साध्या पाण्याचीही सोय नव्हती. सुदैवाने अग्निशमन दलाच्या बंबांनी वेळीच पोहोचून आग विझवली, अन्यथा शेतकऱ्यांचा आणि सरकारचा कोट्यवधींचा माल खाक झाला असता. * प्रशासनाला जाब विचारणार - पोलीस पाटील "नाफेडच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या निकषावर अशा गोडाऊनची निवड केली जिथे सुरक्षेची कोणतीही साधने नाहीत? एखाद्या गरिबाचे गोडाऊन असते तर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली असती, मग मोठ्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनला सवलत का?" असा सवाल पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि गोडाऊन मालकावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
    1
    बाळापूर तालुक्यातील रिधोरा शेतशिवारातील राजेश लोहिया यांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीने प्रशासकीय यंत्रणेचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला आहे. या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा लाखो रुपयांचा हरभरा साठा असतानाही, तिथे आग विझवण्यासाठी साधी पाण्याची सोय किंवा 'फायर ऑडिट' नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर विषयावर रिधोरा येथील पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारच्या सुमारास राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊन परीसरात भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. ज्या गोडाऊनमध्ये शासकीय माल (नाफेड आणि सीसीआय) साठवला जातो, तिथे नियमानुसार अग्निशमन यंत्रणा आणि पाण्याची पुरेशी व्यवस्था असणे अनिवार्य आहे. मात्र, रिधोरा येथील या गोडाऊनमध्ये आगीच्या वेळी पाण्याचा टँकर सोडाच, पण साध्या पाण्याचीही सोय नव्हती. सुदैवाने अग्निशमन दलाच्या बंबांनी वेळीच पोहोचून आग विझवली, अन्यथा शेतकऱ्यांचा आणि सरकारचा कोट्यवधींचा माल खाक झाला असता.
* प्रशासनाला जाब विचारणार - पोलीस पाटील
"नाफेडच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या निकषावर अशा गोडाऊनची निवड केली जिथे सुरक्षेची कोणतीही साधने नाहीत? एखाद्या गरिबाचे गोडाऊन असते तर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली असती, मग मोठ्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनला सवलत का?" असा सवाल पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि गोडाऊन मालकावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer Balapur, Akola•
    4 hrs ago
  • संग्रामपूरमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी; लिंगायत समाज व ग्रामस्थांचा मोठा सहभाग!
    1
    संग्रामपूरमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी; लिंगायत समाज व ग्रामस्थांचा मोठा सहभाग!
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • sakshisanstoshi YouTube
    7
    sakshisanstoshi YouTube
    user_Sakshi Sahtosh
    Sakshi Sahtosh
    Librarian जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल नगरपालिका, यावल महोदय, यावल नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २, आयशानगर परिसरामध्ये असलेला नाला अनेक दिवसांपासून साफसफाई न करता तसाच पडून आहे. नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यात साचलेल्या घाण व पाण्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्यापूर्वी संबंधित विभागाने तात्काळ नाला सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती. अन्यथा उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील.
    1
    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,
यावल नगरपालिका, यावल
महोदय,
यावल नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २, आयशानगर परिसरामध्ये असलेला नाला अनेक दिवसांपासून साफसफाई न करता तसाच पडून आहे. नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नाल्यात साचलेल्या घाण व पाण्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
सदर बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्यापूर्वी संबंधित विभागाने तात्काळ नाला सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती.
अन्यथा उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील.
    user_Saqlain Shaikh Rafique
    Saqlain Shaikh Rafique
    जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • अकोला बाळापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या परिसरात वाढलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा मोठा हरभरा साठा साठवणूक केलेला असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. सध्या विदर्भात सूर्य कोपला असून तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णता आणि वाळलेले गवत यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊनमध्ये नाफेडचा लाखो रुपयांचा हरभरा साठा असल्याने ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग गोडाऊनच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्याआधीच विझवली. यामुळे गोडाऊनमधील हरभरा साठा पूर्णपणे सुरक्षित राहिला असून मोठा अनर्थ टळला आहे. उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान पाहता, गोडाऊन परिसरातील कचरा व गवत वेळीच साफ करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही.
    1
    अकोला 
बाळापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या परिसरात वाढलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा मोठा हरभरा साठा साठवणूक केलेला असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
सध्या विदर्भात सूर्य कोपला असून तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णता आणि वाळलेले गवत यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊनमध्ये नाफेडचा लाखो रुपयांचा हरभरा साठा असल्याने ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग गोडाऊनच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्याआधीच विझवली. यामुळे गोडाऊनमधील हरभरा साठा पूर्णपणे सुरक्षित राहिला असून मोठा अनर्थ टळला आहे.
उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान पाहता, गोडाऊन परिसरातील कचरा व गवत वेळीच साफ करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही.
    user_Anil dandi
    Anil dandi
    Farmer Balapur, Akola•
    9 hrs ago
  • मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!
    1
    मालेगाव /अकोला 
इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले. म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते. गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान! प्रयत्न आज करण्यात आला. शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले. म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत? ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे. संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते. गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल. संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही. जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान!
    1
    शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले.
म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत?
ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे.
संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते.
गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल.
संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही.
जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान! प्रयत्न आज करण्यात आला.
शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी ना मुख्यालयी वास्तव्यास आहेत, ना स्वतःच्या ग्रामपंचायतीत वेळेवर हजर असतात. यामुळे सामान्य नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अंबुलगे यांच्याकडे मंगरूळ व वांजुळा पुनर्वसन अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीमध्ये त्या दोन्ही ठिकाणी अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. पंचायत समितीमध्ये चौकशी केली असता त्या रजेवरही नसल्याचे समोर आले.
म्हणजेच रजेवर नाहीत, ग्रामपंचायतीत नाहीत, मुख्यालयी वास्तव्यास नाहीत, मग नेमके अधिकारी कुठे आहेत?
ग्रामपंचायतचे दप्तर गावात नसून तालुक्याच्या ठिकाणी ठेवले जाते, ग्रामस्थांना वेळेवर सेवा मिळत नाही, आणि प्रशासन कागदोपत्रीच चालते हीच आजची खरी परिस्थिती आहे.
संभाजी ब्रिगेड मंठा याचा तीव्र निषेध करते आणि संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर तात्काळ विभागीय चौकशी, पगार कपात, शिस्तभंग कारवाई आणि संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्याची ठाम मागणी करते.
गावकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्यांना आता जाब द्यावाच लागेल.
संभाजी ब्रिगेड अन्याय सहन करणार नाही.
जय जिजाऊ! जय शिवराय! जय संविधान!
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.