रिधोरा येथील आगीच्या घटनेने नाफेडच्या गोडाऊनमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; पोलीस पाटीलांकडून संताप व्यक्त बाळापूर तालुक्यातील रिधोरा शेतशिवारातील राजेश लोहिया यांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीने प्रशासकीय यंत्रणेचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला आहे. या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा लाखो रुपयांचा हरभरा साठा असतानाही, तिथे आग विझवण्यासाठी साधी पाण्याची सोय किंवा 'फायर ऑडिट' नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर विषयावर रिधोरा येथील पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारच्या सुमारास राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊन परीसरात भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. ज्या गोडाऊनमध्ये शासकीय माल (नाफेड आणि सीसीआय) साठवला जातो, तिथे नियमानुसार अग्निशमन यंत्रणा आणि पाण्याची पुरेशी व्यवस्था असणे अनिवार्य आहे. मात्र, रिधोरा येथील या गोडाऊनमध्ये आगीच्या वेळी पाण्याचा टँकर सोडाच, पण साध्या पाण्याचीही सोय नव्हती. सुदैवाने अग्निशमन दलाच्या बंबांनी वेळीच पोहोचून आग विझवली, अन्यथा शेतकऱ्यांचा आणि सरकारचा कोट्यवधींचा माल खाक झाला असता. * प्रशासनाला जाब विचारणार - पोलीस पाटील "नाफेडच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या निकषावर अशा गोडाऊनची निवड केली जिथे सुरक्षेची कोणतीही साधने नाहीत? एखाद्या गरिबाचे गोडाऊन असते तर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली असती, मग मोठ्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनला सवलत का?" असा सवाल पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि गोडाऊन मालकावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

- बाळापूर तालुक्यातील रिधोरा शेतशिवारातील राजेश लोहिया यांच्या गोडाऊनला लागलेल्या आगीने प्रशासकीय यंत्रणेचा गलथानपणा चव्हाट्यावर आणला आहे. या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा लाखो रुपयांचा हरभरा साठा असतानाही, तिथे आग विझवण्यासाठी साधी पाण्याची सोय किंवा 'फायर ऑडिट' नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर विषयावर रिधोरा येथील पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारच्या सुमारास राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊन परीसरात भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. ज्या गोडाऊनमध्ये शासकीय माल (नाफेड आणि सीसीआय) साठवला जातो, तिथे नियमानुसार अग्निशमन यंत्रणा आणि पाण्याची पुरेशी व्यवस्था असणे अनिवार्य आहे. मात्र, रिधोरा येथील या गोडाऊनमध्ये आगीच्या वेळी पाण्याचा टँकर सोडाच, पण साध्या पाण्याचीही सोय नव्हती. सुदैवाने अग्निशमन दलाच्या बंबांनी वेळीच पोहोचून आग विझवली, अन्यथा शेतकऱ्यांचा आणि सरकारचा कोट्यवधींचा माल खाक झाला असता. * प्रशासनाला जाब विचारणार - पोलीस पाटील "नाफेडच्या अधिकाऱ्यांनी कुठल्या निकषावर अशा गोडाऊनची निवड केली जिथे सुरक्षेची कोणतीही साधने नाहीत? एखाद्या गरिबाचे गोडाऊन असते तर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली असती, मग मोठ्या व्यापाऱ्यांच्या गोडाऊनला सवलत का?" असा सवाल पोलीस पाटील सुजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि गोडाऊन मालकावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.1
- खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत. यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.1
- संग्रामपूरमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी; लिंगायत समाज व ग्रामस्थांचा मोठा सहभाग!1
- Post by विष्णु आखरे पाटील1
- Post by बुलढाणा माझा न्युज1
- बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची ३७० वर्षांची ऐतिहासिक घटमांडणी दरवर्षी अक्षय्य तृतीयेला चर्चेचा विषय ठरते. मात्र, यंदा ही चर्चा भाकितांपेक्षा एका 'आव्हाना'मुळे अधिक गाजत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी भेंडवळच्या घटमांडणीला उघड आव्हान दिले आहे. ही प्रथा केवळ श्रद्धा आहे की अंधश्रद्धा, यावरून आता राज्यभरात नवा वाद निर्माण झाला आहे.श्याम मानव यांनी भेंडवळच्या भाकितांवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, कोणत्याही प्रकारच्या खगोलशास्त्रीय किंवा सांख्यिकीय पुराव्याशिवाय वर्तवलेली ही भाकिते म्हणजे लोकांच्या श्रद्धेचा खेळ आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, जर भेंडवळच्या घटमांडणीतील यंदाची भाकिते ९० टक्क्यांपेक्षा जास्त अचूक ठरली, तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ८० लाखांचे रोख पारितोषिक संबंधित महाराजांना दिले जाईल.श्याम मानव यांच्या या आव्हानामुळे भेंडवळच्या घटमांडणी करणाऱ्या पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. अंनिसचा दावा आहे की, केवळ अंदाज वर्तवून समाजात संभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे. विज्ञानाच्या कसोटीवर आणि अचूकतेच्या निकषावर ही भाकिते खरी ठरली पाहिजेत, अन्यथा हे अंधश्रद्धेचे प्रदर्शन असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.एकीकडे ३७० वर्षांची परंपरा जपणाऱ्या भाविकांची मोठी फळी आहे, ज्यांच्यासाठी हे भाकीत शेती नियोजनाचा एक अविभाज्य भाग आहे. तर दुसरीकडे, पुरोगामी विचारवंत आणि अंनिस याला विज्ञानाच्या चौकटीत बसवून तपासण्याची मागणी करत आहेत. '८० लाखांचे बक्षीस' हे केवळ एक निमित्त असून, त्यामागे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा मुख्य उद्देश असल्याचे श्याम मानव यांनी स्पष्ट केले आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- अकोला बाळापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या परिसरात वाढलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा मोठा हरभरा साठा साठवणूक केलेला असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. सध्या विदर्भात सूर्य कोपला असून तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णता आणि वाळलेले गवत यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊनमध्ये नाफेडचा लाखो रुपयांचा हरभरा साठा असल्याने ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग गोडाऊनच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्याआधीच विझवली. यामुळे गोडाऊनमधील हरभरा साठा पूर्णपणे सुरक्षित राहिला असून मोठा अनर्थ टळला आहे. उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान पाहता, गोडाऊन परिसरातील कचरा व गवत वेळीच साफ करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही.1