logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मानवत उड्डाणपुलावरून ट्रक कोसळला; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला परभणी (प्रतिनिधी): बीडहून मिरची घेऊन परभणीकडे येणारा ट्रक मानवत शहरातील उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याची घटना मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, (क्रमांक एमएच २३ एयू ४२९९) हा ट्रक लाल मिरची घेऊन परभणीकडे येत होता. मानवत येथील राष्ट्रीय महामार्गावरील के.के.एम. महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक खाली कोसळला. अपघातानंतर चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रमोद देवकते, अविनाश डोंगले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिका चालक देवा पेडगावकर यांच्या मदतीने जखमी चालकाला स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.जखमी चालकाचे नाव शेख तसवक शेख महबूब (वय ४१, रा. बीड) असे आहे. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान, मानवत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुल परिसरात यापूर्वीही अपघात घडले असून, अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आजचा अपघात पहाटेच्या सुमारास झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दिवसा या मार्गावर शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे

1 hr ago
user_Jafar tarodekar
Jafar tarodekar
परभणी, परभणी, महाराष्ट्र•
1 hr ago
61fcb670-8afc-405c-a342-35844930cc18

More news from Maharashtra and nearby areas
  • नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    1
    नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    25 min ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    46 min ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra MAX PARBHANI LIVE 1
    1
    LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra  MAX PARBHANI LIVE 1
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • तेलंगाना के बोर्ड के अध्यक्ष परभणी जिले के केंद्र निरीक्षक अजमतउल्लाह हुसैनी के नेतृत्व में जिंतूर शहर संगठन सूजन अभियान
    5
    तेलंगाना के बोर्ड के अध्यक्ष परभणी जिले के केंद्र निरीक्षक अजमतउल्लाह हुसैनी के नेतृत्व में जिंतूर शहर संगठन सूजन अभियान
    user_फेरोज भैया
    फेरोज भैया
    जिंतूर, परभणी, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटीआय कर्मचाऱ्यांचे बेमुद्दत कामबंद आंदोलन सुरू
    1
    राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटीआय कर्मचाऱ्यांचे बेमुद्दत कामबंद आंदोलन सुरू
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.