घरगुती वादाचा दुर्दैवी शेवट; साल्याकडून भावोजीवर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू घरगुती वादाचा दुर्दैवी शेवट; साल्याकडून भावोजीवर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू भोकरदन (प्रतिनिधी) :विश्वास धसाळ घरगुती वादातून साल्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने भावोजीला काठी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील मुठाड फाट्याजवळ घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कृष्णा शेषराव इंगळे (वय ३८, रा. इब्राहिमपूर) यांचा दोन दिवसांच्या उपचारानंतर गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी मुख्य आरोपी गजानन गणेश डांगे याला अटक केली असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी मृत कृष्णा इंगळे यांचे भाऊ संतोष शेषराव इंगळे (वय २९, व्यवसाय रिक्षाचालक, रा. इब्राहिमपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ घरगुती वादातून हल्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता मुठाड फाट्याजवळील रस्त्यावर ही घटना घडली. कृष्णा इंगळे यांचा त्यांच्या पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादाची माहिती त्यांच्या पत्नीने आपला भाऊ गजानन डांगे याला दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर गजानन डांगे हा आपल्या दोन साथीदारांसह कृष्णा इंगळे यांच्याजवळ गेला. यावेळी तिघांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात कृष्णा इंगळे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी मध्यस्थी करून मारहाण थांबवली मारहाणीचा प्रकार लक्षात आल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून हल्ला थांबवला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या कृष्णा इंगळे यांना तातडीने भोकरदन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच इब्राहिमपूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार कृष्णा इंगळे यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजता इब्राहिमपूर येथील त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साल्यावर खुनाचा गुन्हा दाखल; मुख्य आरोपी अटकेत, दोघांचा शोध सुरू या घटनेप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर तपासादरम्यान उपलब्ध माहितीच्या आधारे हल्ल्याचे गांभीर्य समोर आल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ११५(२) आणि ३(५) अन्वये साळ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी गजानन गणेश डांगे याला अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. “उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून, तपासाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे,” अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर यांनी दिली.

- दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव दिवसा ढवळ्या जालना शहरात हत्या, जुना वादातून हत्या, जालना शहरासह परिसरात खळबळ, संजय शर्मा वय 40 असे मयताचे नाव1
- निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ निधी खर्च होऊनही विकास शून्य! सेवली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; ५ वर्षांतील निधीचा हिशोब देण्याची ग्रामस्थांची मागणी1
- आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते1
- Sillod छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का भव्य रैली के साथ स्वागत, | AQS NEWS #sillod sillod update: chhatrapati shivaji maharaj ki pratima ka bhavya rally ke saath swagat, hazaron shiv bhakt hue shamil | AQS NEWS #Sillod #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivBhakt #SillodNews #AQSNEWS #AQSNEWSDIGITAL #सिल्लोड #छत्रपतिशिवाजीमहाराज #सिल्लोडन्यूज #महाराष्ट्रnews1
- सिल्लोड कायगाव अज्ञात आरोपीने कपाशी पिकाची केली नुकसान वडोद बाजार पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे अज्ञात आरोपीने कपाशी पिकाचे झाडे उपटून फेकत खोडके या शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलिसांनी घेतली आहे1
- जालन्यात पुन्हा थरार एक ४० वर्षिया तरुणाची धारदार शस्त्र ने अज्ञात हल्लेखोरांनी खपा खप धारदार शस्त्र ने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली कानून आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह1
- जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव जालन्यात भरदिवसा तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या शहरातील जुना मोंढा भागातील जय माँ हॉटेल समोरील घटना संजय शर्मा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव1
- भांडुप पूर्व सनशाइन सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी मारली मात्र झाडात अटकली दोन तास भांडुप पूर्व येथील सनशाइन सोसायटी येथील दहाव्या मजल्यावरून महिलेने उडी घेतली मात्र महिला एका झाडाला चक्क दोन तास अडकले होती महिलेला झाडावरून काढण्यासाठी फायर ब्रिगेड व पोलिसांना दोन तासाचा वेळ लागला सदरील घटनेत महिलेचे जीव वाचले मात्र फायर ब्रिगेड व पोलिसांना दोरीवरची कसरत करावा लागली1