जमीन हडपण्यासाठी बीडमधील भावाचा खतरनाक प्लॅन, बुरखा घालून बहिणीच्या जागी बायको केली उभी, प्रकरणाचा शेवट झाला अजबच बीड : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला असून, सख्ख्या बहिणीच्या नावावर असलेला जमीनहक्क बेकायदेशीररित्या हस्तांतरित केल्याचा आरोप भावावरच ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात भावाने स्वतःच्या पत्नीस बहिणीच्या जागी उभे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे हक्कसोडपत्र तयार केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित पती-पत्नीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार रजिया बानो यांनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जानुसार, त्यांच्या वडिलांच्या आणि आईच्या निधनानंतर बीड तालुक्यातील माळीपुरा येथील शेतजमीन ही सर्व वारसांमध्ये विभागली गेली होती. संबंधित जमिनीवर चार बहिणी आणि एक भाऊ अशी सर्वांची नावे कायदेशीररित्या 7/12 उताऱ्यावर नोंदवण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येकाला आपापला हक्काचा हिस्सा मिळालेला होता. मात्र, या सामयिक जमिनीतील बहिणींचा हिस्सा स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी आरोपी भावाने कट रचल्याचा आरोप आहे. त्याने आपल्या पत्नीच्या मदतीने एक बनावट ओळख निर्माण केली. नोंदणी प्रक्रियेदरम्यान पत्नीने बुरखा परिधान करून स्वतःला रजिया बानो असल्याचे भासवले आणि संबंधित कागदपत्रांवर बनावट सह्या करून हक्कसोडपत्र नोंदवून घेतल्याचे तपासात समोर आले आहे.या बनावट व्यवहाराच्या आधारे आरोपीने महसूल नोंदीत स्वतःचे नाव लावून घेतल्याचेही उघड झाले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर रजिया बानो यांनी सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, तिथे योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी संबंधित पती-पत्नीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तसेच साक्षीदारांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सख्ख्या नात्यातील अशा फसवणुकीमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

- Post by Labour addaa.1
- बुलढाणा जिल्ह्यात इंधन_पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.1
- खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण गावासह परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिव-पार्वती विवाहाच्या चार दिवसानंतर आता मंदिर परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली असून, संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिव मंदिराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपारिक पद्धतीने पार पडला. शास्त्रोक्त विधी, पुरोहितांचे मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या स्वरात शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच आजपासून सुटाळा बुद्रुक महादेव संस्थान परिसरात मोठ्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील विवाहित लेकी-सुना या यात्रेच्या निमित्ताने खास माहेरी येतात.यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने थाटली गेली आहेत. सुटाळा बुद्रुक येथील ही परंपरा सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली असून, या सोहळ्यामुळे गावात उत्सवी चैतन्य पसरले आहे.परिसरातील नागरिक या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुटाळा बुद्रुक येथे दाखल होत आहेत.2
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- Post by Jansagar 9 Marathi1
- Post by Labour addaa.1