logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

म्युझिकल फौंऊटेनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर: गेल्या दोन – तीन वर्षापासून ऐतिहासिक रंकाळा तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या होत असलेल्या विकास कामांमुळे पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रंकाळा तलाव सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली. सद्यस्थितीत रंकाळा तलावात म्युझिकल फौंऊटेन बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या म्युझिकल फौंऊटेनच्या कामात आणि वापरण्यात येणाऱ्या साहित्यांच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड नको, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. रंकाळा तलाव येथे सुरु असलेल्या कामाची आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत पाहणी केली. ते पुढे म्हणाले, कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो. यासह शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे हक्काचे विरंगुळा केंद्र म्हणजे रंकाळा तलाव आहे. या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापूरच्या पर्यटनात भर घालणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प असल्याने तो शहराच्या वैभवात भर टाकणारा असावा. म्युझिकल फौंटनचे काम हे जागतिक दर्जाचे आणि दर्जेदारच झाले पाहिजे. त्यात तांत्रिक त्रुटी किंवा निकृष्ट साहित्य वापरले गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रातून यामध्ये चायना मटेरियल वापरले जाणार असल्याचे प्रसिद्ध झाले होते. यामुळे प्रकल्पाची आणि लोकप्रतिनिधींची नाहक बदनामी होते. याबाबत अधिकारी आणि ठेकेदारांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी धारेवर धरले. हे काम जागतिक दर्जाचे असल्याने परदेशातून काही साहित्य मागविले जाणार असेल तर त्याचा दर्जाचा योग्य असावा. यामध्ये कोणतेही चायना मटेरियल दिसता कामा नये. आलेल्या साहित्याचे सर्टिफिकेशन करूनच त्या साहित्याचा वापर प्रकल्पात करावा. प्रकल्पाच्याबाबतीत कोणतीही बदनामी खपवून घेतली जाणार नाही. बसविण्यात येणाऱ्या फौंऊटेनची जागा योग्य असावी, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याचा आनंद घेता येईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांच्या गर्दीत वाढ होणार आहे त्यामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसे काम करा, अशा सूचना दिल्या. महायुती शासनाच्या काळात कोल्हापुरात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे. कोल्हापूर सांगली पूरनियंत्रण प्रकल्प, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरण, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, गांधी मैदान ड्रेनेज लाईन, रंकाळा तलाव म्युझिकल फौंऊटन, शहरातील तालीम संस्था बांधकाम अशी अनेक विकास कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांची २६ जून रोजी जयंती साजरी होणार असून, या निमित्ताने मुखमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या विकास कामांचे लोकार्पण करण्याचा उद्देश असून, अधिकाऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त रमाकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, अभियंता फुलारे आदी उपस्थित होते.

3 hrs ago
user_Journalist Ajay
Journalist Ajay
करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
a05e473d-99b8-4c55-9c8d-df191e5495ad

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पावसाळापूर्व नाले सफाई मोहिमेला वेग.... KMC Action मोडवर कोल्हापूर, ता. ९ : पावसाळ्यापूर्वी शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा व नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी कोल्हापूर महानगरपालिकाच्या आरोग्य विभागामार्फत नाले, चॅनेल व ओढे सफाई मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. दिनांक २३ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेलद्वारे कामाला वेग देण्यात आला आहे. महानगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये मनुष्यबळ तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नालेसफाईचे काम सुरू आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी गाळ, कचरा व अडथळे दूर करण्यात आले असून पावसाळ्यापूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. कामाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे : १) मनुष्यबळाद्वारे सफाई – एकूण ४७६ ठिकाणांपैकी २४६ ठिकाणांची सफाई पूर्ण (६४ टक्के) २) JCB यंत्राद्वारे सफाई – एकूण २०६ ठिकाणांपैकी ८७ ठिकाणांची सफाई पूर्ण (४० टक्के) ३) पोकलॅंड मशिनद्वारे सफाई – एकूण २१ ठिकाणांपैकी ७ ठिकाणांची सफाई पूर्ण, ४ ठिकाणी काम सुरू (५२ टक्के) या मोहिमेसाठी दोन स्वतंत्र मनुष्यबळ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पथक क्रमांक १ मध्ये २४ कर्मचारी तर पथक क्रमांक २ मध्ये २९ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच भाडेतत्त्वावर ३ पोकलॅंड, ३ JCB व ४ डंपर तैनात करण्यात आले असून महानगरपालिकेच्या स्वतःच्या १ पोकलॅंड मशिनचाही वापर सुरू आहे. मोठ्या नाल्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः ५० फूट लॉगबूम पोकलॅंड मशिनद्वारे सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्व सर्व नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनीही कचरा नाल्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    पावसाळापूर्व नाले सफाई मोहिमेला वेग.... KMC Action मोडवर 
कोल्हापूर, ता. ९ : पावसाळ्यापूर्वी शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा व नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी कोल्हापूर महानगरपालिकाच्या आरोग्य विभागामार्फत नाले, चॅनेल व ओढे सफाई मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. दिनांक २३ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेलद्वारे  कामाला वेग देण्यात आला आहे.
महानगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये मनुष्यबळ तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नालेसफाईचे काम सुरू आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी गाळ, कचरा व अडथळे दूर करण्यात आले असून पावसाळ्यापूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचत आहे.
कामाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे :
१) मनुष्यबळाद्वारे सफाई – एकूण ४७६ ठिकाणांपैकी २४६ ठिकाणांची सफाई पूर्ण (६४ टक्के)
२) JCB यंत्राद्वारे सफाई – एकूण २०६ ठिकाणांपैकी ८७ ठिकाणांची सफाई पूर्ण (४० टक्के)
३) पोकलॅंड मशिनद्वारे सफाई – एकूण २१ ठिकाणांपैकी ७ ठिकाणांची सफाई पूर्ण, ४ ठिकाणी काम सुरू (५२ टक्के)
या मोहिमेसाठी दोन स्वतंत्र मनुष्यबळ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पथक क्रमांक १ मध्ये २४ कर्मचारी तर पथक क्रमांक २ मध्ये २९ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच भाडेतत्त्वावर ३ पोकलॅंड, ३ JCB व ४ डंपर तैनात करण्यात आले असून महानगरपालिकेच्या स्वतःच्या १ पोकलॅंड मशिनचाही वापर सुरू आहे.
मोठ्या नाल्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः ५० फूट लॉगबूम पोकलॅंड मशिनद्वारे सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्व सर्व नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनीही कचरा नाल्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.
    1
    आजच्या राशीभविष्यात प्रत्येक राशीसाठीचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या. प्रेम, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि करिअरसंबंधी महत्त्वाची माहिती मिळेल.
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.
    1
    जीवन निरगुडे यांना त्यांच्या 19 वर्षांच्या उत्कृष्ट पोलीस सेवेसाठी 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह' देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पश्चिम बंगाल मराठी व्यापारी असोसिएशनने अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित सेवेचे प्रतीक आहे.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.
    4
    आई ती असते जी संघर्षांमध्येही कधी हार मानत नाही. परमेश्वराने आपल्याला जगातील सर्वात प्रेमळ आणि शक्तिशाली माता दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानूया.
    user_किशोर पाटील
    किशोर पाटील
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • दैनिक जनप्रवासचे संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी उधळला आहे. जमिनीच्या वादातून घडलेल्या या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, पिस्तूल, काडतुसे व चाकू जप्त करण्यात आले आहेत.
    1
    दैनिक जनप्रवासचे संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट सांगली पोलिसांनी उधळला आहे. जमिनीच्या वादातून घडलेल्या या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, पिस्तूल, काडतुसे व चाकू जप्त करण्यात आले आहेत.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • कोवाड (चंदगड) येथे पालकांच्या मागणीनुसार 'निओगोवा अँग्लो स्कूल' ही नवीन इंग्लिश मीडियम शाळा सुरू होत आहे. गोव्यामध्ये यशस्वीरित्या शाळा चालवणारे संजीव पाटील यांनी ही घोषणा केली असून, प्रवेश सुरू होण्याआधीच ६०-७० पालकांनी मुलांचे प्रवेश निश्चित केले आहेत. यामुळे चंदगड तालुक्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होणार आहे.
    1
    कोवाड (चंदगड) येथे पालकांच्या मागणीनुसार 'निओगोवा अँग्लो स्कूल' ही नवीन इंग्लिश मीडियम शाळा सुरू होत आहे. गोव्यामध्ये यशस्वीरित्या शाळा चालवणारे संजीव पाटील यांनी ही घोषणा केली असून, प्रवेश सुरू होण्याआधीच ६०-७० पालकांनी मुलांचे प्रवेश निश्चित केले आहेत. यामुळे चंदगड तालुक्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होणार आहे.
    user_Sm7news
    Sm7news
    Farmer चांदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सांगली शहरात दैनिक 'जनप्रवास'चे संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा मोठा कट पोलिसांनी उधळला. पोलिसांनी दोन देशी पिस्तुलं, चार काडतुसे आणि चाकू जप्त करत तिघांना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून रचलेल्या या कटातील आरोपींना ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    2
    सांगली शहरात दैनिक 'जनप्रवास'चे संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा मोठा कट पोलिसांनी उधळला. पोलिसांनी दोन देशी पिस्तुलं, चार काडतुसे आणि चाकू जप्त करत तिघांना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून रचलेल्या या कटातील आरोपींना ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
    user_क्रांती न्यूज
    क्रांती न्यूज
    Advertising Photographer आटपाडी, सांगली, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.
    1
    मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय गायिका श्रेया घोषाला तिच्या गाण्यांमधून आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. 'मेंदीच्या पानावर' सारख्या गाण्यांमधून तिचा मधुर आवाज आजही अनेकांना भुरळ घालतो.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.