logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

यशोधरा नगरात महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवणारे २ भामटे पसार; आदर्श नगरात घरफोडीचा प्रयत्न ​खामगाव : दूध घेऊन पायी घराकडे परतणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी बळजबरीने हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना यशोधरा नगर भागात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, खामगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, शंकर नगर येथील रहिवासी सौ. शशीकला जनार्दन सपकाळ (वय ५६) या गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० ते ७:१५ वाजेच्या सुमारास दूध घेऊन पायी घराकडे परत जात होत्या. दरम्यान, यशोधरा नगर परिसरात समोरून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळसूत्राची शॉर्ट गंठण पोत किंमत अंदाजे ७९ हजार २४५ रुपये बळजबरीने हिसकावून पोबारा केला. ​घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ खामगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सौ. शशिकला सपकाळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी कलम ३०४(२), ३(५) बीएनएस अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराव वानखेडे करत आहेत. दरम्यान, काल मध्यरात्रीच्या सुमारास याच परिसराला लागून असलेल्या आदर्श नगर भागात तीन अज्ञात चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी, लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. ​भरवस्तीत सायंकाळच्या वेळी मंगळसूत्र लांबवणे आणि मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या दोन्ही घटनांतील संशयित आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

8 hrs ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
8 hrs ago

यशोधरा नगरात महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवणारे २ भामटे पसार; आदर्श नगरात घरफोडीचा प्रयत्न ​खामगाव : दूध घेऊन पायी घराकडे परतणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी बळजबरीने हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना यशोधरा नगर भागात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, खामगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, शंकर नगर येथील रहिवासी सौ. शशीकला जनार्दन सपकाळ (वय ५६) या गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० ते ७:१५ वाजेच्या सुमारास दूध घेऊन पायी घराकडे परत जात होत्या. दरम्यान, यशोधरा नगर परिसरात समोरून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात भामट्यांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळसूत्राची शॉर्ट गंठण पोत किंमत अंदाजे ७९ हजार २४५ रुपये बळजबरीने हिसकावून पोबारा केला. ​घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ खामगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सौ. शशिकला सपकाळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी कलम ३०४(२), ३(५) बीएनएस अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भीमराव वानखेडे करत आहेत. दरम्यान, काल मध्यरात्रीच्या सुमारास याच परिसराला लागून असलेल्या आदर्श नगर भागात तीन अज्ञात चोरट्यांनी चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रयत्न अयशस्वी ठरला असला तरी, लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. ​भरवस्तीत सायंकाळच्या वेळी मंगळसूत्र लांबवणे आणि मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या दोन्ही घटनांतील संशयित आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे. आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.
    1
    इलेक्ट्रिक मोटर पंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी केला पर्दाफाश
रिसोड : शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन चोरीचे इलेक्ट्रिक मोटरपंप आणि काळ्या-पिवळ्या रंगाचा प्रवासी ऑटो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणार येथून चोरी केलेले मोटरपंप विक्रीसाठी रिसोड येथे आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाशिम नाका परिसरात सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये तेजराव दीपक तोडे, ओम राजू बोरकर, विजय भारत घाटोळे हे तिघे लोणार येथील रहिवासी असून, अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे हा सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी आहे.
आरोपींकडून दोन इलेक्ट्रिक मोटरपंप आणि प्रवासी ऑटो जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याची माहिती आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
लोणार येथील मोटरपंप चोरीचा पुढील तपास लोणार पोलीस करीत आहेत.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन! दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
    1
    पत्रकारांनी निर्भीडपणे काम करा; तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन!
दिलीप माने यांची ग्वाही; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गंगाखेड शाखा कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
सत्याच्या बाजूने निर्भीड पत्रकारिता करा, कोणत्याही आमिषाला, दबावाला किंवा भीतीला बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा गंगाखेडच्या कार्यालयाचे उद्घाटन दि. २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले. यावेळी पत्रकारांनी संघटितपणे काम करण्याचे आवाहनही माने यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव होते. उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष दिलीप माने, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार जावेद इनामदार, तुकाराम अय्या आणि प्रा. डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते.
    user_मराठवाडा संवाद न्युज
    मराठवाडा संवाद न्युज
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी.. जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ देण्याची मागणी त्यांनी केली. *हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींची मागणी* जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.
    1
    जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी..


जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधी द्या; खासदार डॉ. कल्याण काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..
हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींचा निधी, घाणेवाडी तलावाच्या सांडव्यांची तातडीने दुरुस्ती; शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक सर्वसमावेशक करण्याची मागणी..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : जालना जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शिक्षण, सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मागण्यांची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालये तसेच इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ देण्याची मागणी त्यांनी केली.
*हातवन प्रकल्पासाठी १५० कोटींची मागणी*
जालना तालुका व जिल्ह्यातील हातवन बृहत् लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार काळे यांनी केली.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 min ago
  • *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
    2
    *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी*

*बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी*
बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    बांधकाम कंत्राटदार बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    1
    संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..

दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..
दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!.. सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार.. संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!.. सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने जालना शहरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
    1
    संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!..

सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार..


संजय शर्मा खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी!..
सूडाच्या भावनेतून हत्या केल्याचा प्राथमिक संशय; ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम उलगडणार..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : शहरातील जुना मोंढा परिसरातील जय माँ हॉटेलसमोर गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास ४० वर्षीय संजय शर्मा याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या हत्याकांडाने जालना शहरात खळबळ उडाली होती. घटनेनंतर सदर बाजार पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपी ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    30 min ago
  • ‎मा.खा.नवनीत राणा यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी व स्वर्गीय चरणदासजी इखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन
    1
    ‎मा.खा.नवनीत राणा यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी व स्वर्गीय चरणदासजी इखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप.. रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान.. पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप.. रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान.. पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर
    1
    ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश

नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप..

रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान..
पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर
ईद मिलादुन्नबीचा जालन्यात उत्साह; जुलूसात एकतेचा संदेश
नवीन जालना टांगा स्टँडपासून निघालेला जुलूस जामा मस्जिद येथे समारोप..
रहीम शेठ मिलन मित्रमंडळातर्फे मिठाई वाटप, पोलीस प्रशासनाचा शालहाराने सन्मान..
पैगंबर हजरत मोहम्मद स.अ. यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... अमरावती : - जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्‍यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली
    1
    दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार.....
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर....
दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार.....
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर....
अमरावती : -  जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्‍यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.
राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते.
श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली
    user_Pravin Zolekar Jounarlist...
    Pravin Zolekar Jounarlist...
    Local News Reporter अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.