logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

on 9 May
user_Sharad Dayedar
Sharad Dayedar
Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
on 9 May

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वाशिम जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील काटेपूर्णा नदीपात्रात बुडालेल्या एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तात्काळ शोधून बाहेर काढला आहे. ज्ञानेश्वर दादाराव सोळंके, रा. सीरसो गायरान, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी आसरा माता देवस्थान येथे 'रोठा'साठी आले होते. मंदिरालगत असलेल्या काटेपूर्णा नदीपात्रात ज्ञानेश्वर सोळंके आंघोळीसाठी उतरले होते. त्यांनी नदीपात्रात बांधलेल्या दोरखंडाचा आधार घेत पलीकडील काठावरही गेले होते, मात्र परत येत असताना नदीच्या मध्यभागी पोहोचल्यावर अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. काही क्षणातच ते पाण्याखाली दिसेनासे झाल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी तात्काळ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. याच घटनेची माहिती दोनद येथील सचिन कावरे आणि मुर्तीजापूर येथील बंटी पिंपळे यांनीही पथकाला दिली होती. माहिती मिळताच दीपक सदाफळे यांनी त्यांचे सहकारी मयूर सळेदार, शेखर केवट, रोशन सपकाळ, अक्षय भड, साहील देशमुख, सचिन कुकडे, पवन भड आणि हर्षल वानखडे यांना शोध व बचाव साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले. पथकाने घटनास्थळी पोहोचताच तातडीने नदीपात्राचे ट्रेसिंग सुरू केले आणि अवघ्या काही मिनिटांतच नदीच्या तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला. यावेळी एपीआय गजानन राठोड, पीएसआय अभिषेक वनघरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, चालक नागेश दांडी तसेच मृताचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या पथकाच्या जलद आणि धाडसी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
    3
    वाशिम जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील काटेपूर्णा नदीपात्रात बुडालेल्या एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तात्काळ शोधून बाहेर काढला आहे. ज्ञानेश्वर दादाराव सोळंके, रा. सीरसो गायरान, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी आसरा माता देवस्थान येथे 'रोठा'साठी आले होते.

मंदिरालगत असलेल्या काटेपूर्णा नदीपात्रात ज्ञानेश्वर सोळंके आंघोळीसाठी उतरले होते. त्यांनी नदीपात्रात बांधलेल्या दोरखंडाचा आधार घेत पलीकडील काठावरही गेले होते, मात्र परत येत असताना नदीच्या मध्यभागी पोहोचल्यावर अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. काही क्षणातच ते पाण्याखाली दिसेनासे झाल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी तात्काळ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. याच घटनेची माहिती दोनद येथील सचिन कावरे आणि मुर्तीजापूर येथील बंटी पिंपळे यांनीही पथकाला दिली होती.

माहिती मिळताच दीपक सदाफळे यांनी त्यांचे सहकारी मयूर सळेदार, शेखर केवट, रोशन सपकाळ, अक्षय भड, साहील देशमुख, सचिन कुकडे, पवन भड आणि हर्षल वानखडे यांना शोध व बचाव साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले. पथकाने घटनास्थळी पोहोचताच तातडीने नदीपात्राचे ट्रेसिंग सुरू केले आणि अवघ्या काही मिनिटांतच नदीच्या तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला. यावेळी एपीआय गजानन राठोड, पीएसआय अभिषेक वनघरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, चालक नागेश दांडी तसेच मृताचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या पथकाच्या जलद आणि धाडसी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
    user_न्युज मराठी 24x7 वाशिम
    न्युज मराठी 24x7 वाशिम
    Local News Reporter मंगरूळपीर, वाशिम, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • अकोला जिल्ह्यातील लाल बंगला परिसरात पहिल्याच पावसामुळे नाल्यांचे पाणी थेट रस्त्यावर आले.
    1
    अकोला जिल्ह्यातील लाल बंगला परिसरात पहिल्याच पावसामुळे नाल्यांचे पाणी थेट रस्त्यावर आले.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • अमरावती ते बडनेरा मुख्य रस्त्यावर, समर्थ शाळेजवळच्या चौकातील ट्रॅफिक विभागाचे सिग्नल बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नगरसेवक मिलिंद बांबल यांनी मागणी केली आहे की हे बंद असलेले सिग्नल तातडीने सुरू करण्यात यावे. बांबल यांनी इशारा दिला आहे की, जर त्यांची ही मागणी पूर्ण झाली नाही, तर ते आंदोलन करतील.
    1
    अमरावती ते बडनेरा मुख्य रस्त्यावर, समर्थ शाळेजवळच्या चौकातील ट्रॅफिक विभागाचे सिग्नल बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नगरसेवक मिलिंद बांबल यांनी मागणी केली आहे की हे बंद असलेले सिग्नल तातडीने सुरू करण्यात यावे. बांबल यांनी इशारा दिला आहे की, जर त्यांची ही मागणी पूर्ण झाली नाही, तर ते आंदोलन करतील.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन कवच' या विशेष मोहिमेअंतर्गत, धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस स्टेशनने आमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी एक भव्य जनजागृती बाईक रॅली आयोजित केली. या रॅलीच्या माध्यमातून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांना नशेपासून दूर राहण्याचे तसेच व्यसनमुक्त, सुदृढ आणि सुरक्षित समाज घडविण्याचे प्रभावी आवाहन करण्यात आले. दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परिसरातून निघालेली ही बाईक रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली. रॅलीदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'नशा सोडा, जीवन जोडा', 'आमली पदार्थांना ठाम नकार', 'व्यसनमुक्त युवक, सशक्त भारत' अशा विविध जनजागृतीपर संदेशांचे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी युवकांना आमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच त्यांना नशेच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य व राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. या जनजागृती रॅलीमध्ये ठाणेदार गिरीश ताथोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, महिला व पुरुष पोलीस अधिकारी, अमलदार आणि सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत दत्तापूर पोलिसांच्या जनहिताच्या या मोहिमेचे कौतुक केले. 'ऑपरेशन कवच' अंतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणारा आणि समाजाला व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रेरित करणारा ठरला. यावेळी समाजातील प्रत्येक नागरिकाने आमली पदार्थांविरोधात सजग राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
    1
    राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन कवच' या विशेष मोहिमेअंतर्गत, धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस स्टेशनने आमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्यासाठी एक भव्य जनजागृती बाईक रॅली आयोजित केली. या रॅलीच्या माध्यमातून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांना नशेपासून दूर राहण्याचे तसेच व्यसनमुक्त, सुदृढ आणि सुरक्षित समाज घडविण्याचे प्रभावी आवाहन करण्यात आले.

दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परिसरातून निघालेली ही बाईक रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरली. रॅलीदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'नशा सोडा, जीवन जोडा', 'आमली पदार्थांना ठाम नकार', 'व्यसनमुक्त युवक, सशक्त भारत' अशा विविध जनजागृतीपर संदेशांचे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी युवकांना आमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच त्यांना नशेच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य व राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती रॅलीमध्ये ठाणेदार गिरीश ताथोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, महिला व पुरुष पोलीस अधिकारी, अमलदार आणि सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत दत्तापूर पोलिसांच्या जनहिताच्या या मोहिमेचे कौतुक केले. 'ऑपरेशन कवच' अंतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणारा आणि समाजाला व्यसनमुक्तीच्या दिशेने प्रेरित करणारा ठरला. यावेळी समाजातील प्रत्येक नागरिकाने आमली पदार्थांविरोधात सजग राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    18 hrs ago
  • राज्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राचा मान कायम राखण्यासाठी आज, रविवार (28 जून 2026) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मोहिमेतून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे कडक आवाहन केले आहे. ही मोहीम राज्यभर युद्धपातळीवर राबविण्यात येणार असून, यासाठी 89,489 लसीकरण बुथ, 26,530 ट्रान्झिट पथके, 13,518 मोबाईल पथके आणि 586 रात्रपाळी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. दुर्गम भागांपासून शहरांपर्यंत प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे. प्रशासनाने पालकांना 'दोन थेंब जीवनाचे' ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी आपल्या 0 ते 5 वर्षांच्या प्रत्येक बालकाला आज जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः, 'दोन थेंब चुकले, तर धोका वाढेल... पोलिओमुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण अत्यावश्यक!' या संदेशातून राज्यात आज 'पोलिओविरुद्ध महासंग्राम' पुकारण्यात आला आहे, जेणेकरून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही.
    1
    राज्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राचा मान कायम राखण्यासाठी आज, रविवार (28 जून 2026) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मोहिमेतून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे कडक आवाहन केले आहे.

ही मोहीम राज्यभर युद्धपातळीवर राबविण्यात येणार असून, यासाठी 89,489 लसीकरण बुथ, 26,530 ट्रान्झिट पथके, 13,518 मोबाईल पथके आणि 586 रात्रपाळी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. दुर्गम भागांपासून शहरांपर्यंत प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे. प्रशासनाने पालकांना 'दोन थेंब जीवनाचे' ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी आपल्या 0 ते 5 वर्षांच्या प्रत्येक बालकाला आज जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजण्याचे आवाहन केले आहे.

विशेषतः, 'दोन थेंब चुकले, तर धोका वाढेल... पोलिओमुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण अत्यावश्यक!' या संदेशातून राज्यात आज 'पोलिओविरुद्ध महासंग्राम' पुकारण्यात आला आहे, जेणेकरून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    2 hrs ago
  • अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे दर रविवारी व्यसनाधीन व्यक्तींना मोफत व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात. येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक दशरथ ठाकरे हे गेल्या १५ वर्षांपासून शेषराव महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहेत. या व्यसनमुक्ती आश्रमाच्या भिंतींवर 'दारूत रंगला संसार भंगला' अशा म्हणी रेखाटलेल्या असून, दशरथ ठाकरे प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीला मोफत सल्ला देतात. ते व्यसनाची सवय कशी लागते आणि ती कशी सोडवता येते, याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक व्यसनाधीन व्यक्ती येथे येऊन व्यसनमुक्त झाले आहेत. दशरथ ठाकरे यांनी 'व्यसनमुक्ती सप्ताह' साजरा करत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीचे धडे दिले आहेत. त्यांनी राज्यभर 'नशा मुक्ती जनजागृती अभियान'ही राबवले, ज्याला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि यासाठी त्यांचा अनेक ठिकाणी सत्कारही करण्यात आला.
    4
    अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे दर रविवारी व्यसनाधीन व्यक्तींना मोफत व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात. येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक दशरथ ठाकरे हे गेल्या १५ वर्षांपासून शेषराव महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहेत.

या व्यसनमुक्ती आश्रमाच्या भिंतींवर 'दारूत रंगला संसार भंगला' अशा म्हणी रेखाटलेल्या असून, दशरथ ठाकरे प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीला मोफत सल्ला देतात. ते व्यसनाची सवय कशी लागते आणि ती कशी सोडवता येते, याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक व्यसनाधीन व्यक्ती येथे येऊन व्यसनमुक्त झाले आहेत.

दशरथ ठाकरे यांनी 'व्यसनमुक्ती सप्ताह' साजरा करत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीचे धडे दिले आहेत. त्यांनी राज्यभर 'नशा मुक्ती जनजागृती अभियान'ही राबवले, ज्याला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि यासाठी त्यांचा अनेक ठिकाणी सत्कारही करण्यात आला.
    user_राजकुमार वानखडे
    राजकुमार वानखडे
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात एका सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे एक मोठी घटना टळली आहे. उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या वॉर्डबाहेर संशयास्पदरित्या हालचाल करणाऱ्या एका तरुणाकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला. सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
    1
    अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात एका सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे एक मोठी घटना टळली आहे. उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या वॉर्डबाहेर संशयास्पदरित्या हालचाल करणाऱ्या एका तरुणाकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला. सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
    user_Akola daily news update
    Akola daily news update
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.