वाशिम जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील काटेपूर्णा नदीपात्रात बुडालेल्या एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तात्काळ शोधून बाहेर काढला आहे. ज्ञानेश्वर दादाराव सोळंके, रा. सीरसो गायरान, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी आसरा माता देवस्थान येथे 'रोठा'साठी आले होते. मंदिरालगत असलेल्या काटेपूर्णा नदीपात्रात ज्ञानेश्वर सोळंके आंघोळीसाठी उतरले होते. त्यांनी नदीपात्रात बांधलेल्या दोरखंडाचा आधार घेत पलीकडील काठावरही गेले होते, मात्र परत येत असताना नदीच्या मध्यभागी पोहोचल्यावर अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. काही क्षणातच ते पाण्याखाली दिसेनासे झाल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी तात्काळ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. याच घटनेची माहिती दोनद येथील सचिन कावरे आणि मुर्तीजापूर येथील बंटी पिंपळे यांनीही पथकाला दिली होती. माहिती मिळताच दीपक सदाफळे यांनी त्यांचे सहकारी मयूर सळेदार, शेखर केवट, रोशन सपकाळ, अक्षय भड, साहील देशमुख, सचिन कुकडे, पवन भड आणि हर्षल वानखडे यांना शोध व बचाव साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले. पथकाने घटनास्थळी पोहोचताच तातडीने नदीपात्राचे ट्रेसिंग सुरू केले आणि अवघ्या काही मिनिटांतच नदीच्या तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला. यावेळी एपीआय गजानन राठोड, पीएसआय अभिषेक वनघरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, चालक नागेश दांडी तसेच मृताचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या पथकाच्या जलद आणि धाडसी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
वाशिम जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील काटेपूर्णा नदीपात्रात बुडालेल्या एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तात्काळ शोधून बाहेर काढला आहे. ज्ञानेश्वर दादाराव सोळंके, रा. सीरसो गायरान, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी आसरा माता देवस्थान येथे 'रोठा'साठी आले होते. मंदिरालगत असलेल्या काटेपूर्णा नदीपात्रात ज्ञानेश्वर सोळंके आंघोळीसाठी उतरले होते. त्यांनी नदीपात्रात बांधलेल्या दोरखंडाचा आधार घेत पलीकडील काठावरही गेले होते, मात्र परत येत असताना नदीच्या
मध्यभागी पोहोचल्यावर अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. काही क्षणातच ते पाण्याखाली दिसेनासे झाल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी तात्काळ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. याच घटनेची माहिती दोनद येथील सचिन कावरे आणि मुर्तीजापूर येथील बंटी पिंपळे यांनीही पथकाला दिली होती. माहिती मिळताच दीपक सदाफळे यांनी त्यांचे सहकारी मयूर सळेदार, शेखर केवट, रोशन सपकाळ, अक्षय
भड, साहील देशमुख, सचिन कुकडे, पवन भड आणि हर्षल वानखडे यांना शोध व बचाव साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले. पथकाने घटनास्थळी पोहोचताच तातडीने नदीपात्राचे ट्रेसिंग सुरू केले आणि अवघ्या काही मिनिटांतच नदीच्या तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला. यावेळी एपीआय गजानन राठोड, पीएसआय अभिषेक वनघरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, चालक नागेश दांडी तसेच मृताचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या पथकाच्या जलद आणि धाडसी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
- वाशिम जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद येथील काटेपूर्णा नदीपात्रात बुडालेल्या एका ३५ वर्षीय इसमाचा मृतदेह पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तात्काळ शोधून बाहेर काढला आहे. ज्ञानेश्वर दादाराव सोळंके, रा. सीरसो गायरान, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी आसरा माता देवस्थान येथे 'रोठा'साठी आले होते. मंदिरालगत असलेल्या काटेपूर्णा नदीपात्रात ज्ञानेश्वर सोळंके आंघोळीसाठी उतरले होते. त्यांनी नदीपात्रात बांधलेल्या दोरखंडाचा आधार घेत पलीकडील काठावरही गेले होते, मात्र परत येत असताना नदीच्या मध्यभागी पोहोचल्यावर अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात बुडाले. काही क्षणातच ते पाण्याखाली दिसेनासे झाल्याने त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांनी तात्काळ मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. याच घटनेची माहिती दोनद येथील सचिन कावरे आणि मुर्तीजापूर येथील बंटी पिंपळे यांनीही पथकाला दिली होती. माहिती मिळताच दीपक सदाफळे यांनी त्यांचे सहकारी मयूर सळेदार, शेखर केवट, रोशन सपकाळ, अक्षय भड, साहील देशमुख, सचिन कुकडे, पवन भड आणि हर्षल वानखडे यांना शोध व बचाव साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले. पथकाने घटनास्थळी पोहोचताच तातडीने नदीपात्राचे ट्रेसिंग सुरू केले आणि अवघ्या काही मिनिटांतच नदीच्या तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढत पोलिसांच्या ताब्यात दिला. यावेळी एपीआय गजानन राठोड, पीएसआय अभिषेक वनघरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, चालक नागेश दांडी तसेच मृताचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या पथकाच्या जलद आणि धाडसी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.3
- शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीने अकोला जिल्ह्यातील आपला चार दिवसांचा मुक्काम पूर्ण केला आहे. आज पहाटे ही पालखी पातूर शहरातून वाशिम जिल्ह्याकडे प्रस्थान करते झाली. पातूर घाटातून वाशिमकडे मार्गस्थ झालेल्या या पालखी सोहळ्याचे विहंगम ड्रोन दृश्य खास प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये गजानन महाराजांच्या भक्तिमय पालखी सोहळ्याचे सुंदर दृश्य अनुभवता येते.1
- धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळ समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या विचारातून प्रेरणा घेऊन, पावडे यांनी आपल्या छोट्याशा घरातून हा शैक्षणिक प्रकल्प साकारला आहे. त्यांच्याकडे मोठी इमारत किंवा इतर मोठ्या सुविधा नसतानाही, त्यांनी हे कार्य हाती घेतले आहे. शिक्षणाची तळमळ, समाजासाठीची निष्ठा आणि मुलांचे भविष्य घडवण्याची जिद्द या उपक्रमाला चालना देत आहे. पावडे यांच्या मते, घर छोटं असलं तरी स्वप्नं मोठी आहेत; कारण याच ठिकाणाहून उद्याचे अधिकारी, शिक्षक आणि समाजाचे आधारस्तंभ घडणार आहेत.1
- आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर संतांच्या पालखी सोहळ्यांच्या आयोजनासाठी राज्य प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक, गर्दी व्यवस्थापन, वैद्यकीय पथके, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांना समन्वयाने काम करून पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.1
- अमरावती ते बडनेरा मुख्य रस्त्यावर, समर्थ शाळेजवळच्या चौकातील ट्रॅफिक विभागाचे सिग्नल बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नगरसेवक मिलिंद बांबल यांनी मागणी केली आहे की हे बंद असलेले सिग्नल तातडीने सुरू करण्यात यावे. बांबल यांनी इशारा दिला आहे की, जर त्यांची ही मागणी पूर्ण झाली नाही, तर ते आंदोलन करतील.1
- खामगाव येथे युवक काँग्रेसने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडल्याच्या निषेधार्थ हा 'गलथान कारभार' असल्याची टीका करण्यात आली. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका करत, यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले. या प्रकरणी मोदी सरकारच्या अपयसाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.3
- अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे दर रविवारी व्यसनाधीन व्यक्तींना मोफत व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात. येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक दशरथ ठाकरे हे गेल्या १५ वर्षांपासून शेषराव महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहेत. या व्यसनमुक्ती आश्रमाच्या भिंतींवर 'दारूत रंगला संसार भंगला' अशा म्हणी रेखाटलेल्या असून, दशरथ ठाकरे प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीला मोफत सल्ला देतात. ते व्यसनाची सवय कशी लागते आणि ती कशी सोडवता येते, याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक व्यसनाधीन व्यक्ती येथे येऊन व्यसनमुक्त झाले आहेत. दशरथ ठाकरे यांनी 'व्यसनमुक्ती सप्ताह' साजरा करत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीचे धडे दिले आहेत. त्यांनी राज्यभर 'नशा मुक्ती जनजागृती अभियान'ही राबवले, ज्याला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि यासाठी त्यांचा अनेक ठिकाणी सत्कारही करण्यात आला.4
- दर्यापूर पोलिसांनी ‘ऑपरेशन सुरक्षा कवच’ या विशेष मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे यशस्वीरित्या आयोजन केले. या रॅलीचा मुख्य उद्देश युवकांना व्यसनांच्या विळख्यातून दूर ठेवणे हा होता. पोलिसांनी या माध्यमातून ‘नशामुक्त दर्यापूर’ चा प्रभावी संदेश देत, एक प्रकारे नशामुक्तीचा एल्गारच पुकारला.1