logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी- विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी- विजय पवार गटशिक्षणाधिकारी पाचोरा पाचोरा येथे दहावी परीक्षा संचालक सहविचार सभा संपन्न पाचोरा- शिक्षण विभाग पंचायत समिती पाचोरा अंतर्गत तेरा परीक्षा केंद्रावर इयत्ता दहावीची राज्य मंडळाची परीक्षा होणार आहे. चार हजार पाचशे पंचवीस विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत.सदर परीक्षा केंद्र संचालक व सहाय्यक परीरक्षक यांची सहविचार सभा पाचोरा गटशिक्षणाधिकारी तथा परीरक्षक विजय पवार यांनी आयोजित केली होती.गो से विद्यालयात झालेल्या या सभेत परीक्षा आयोजनाचा आढावा घेऊन सूचना देण्यात आल्या. सर्व परीक्षा केंद्रावर सिसिटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्यासोबत प्रत्येक वर्गात झूम अँप द्वारे संनियंत्रण करण्यात येणार आहे. तालुका नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असुन तेथून थेट केंद्रावर लक्ष ठेवणार असल्याचे तसेच परीक्षा सुरळीत होईल यासाठी नियोजन करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी गैर मार्गाचा अवलंब न करता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असे आवाहन त्यांनी केले.तालुका स्तरावर दोन भरारी पथक आणि तेरा बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे. महसूल विभागाचे स्वतंत्र बैठे पथक यावर्षी नेमण्यात आले आहे. सभेचे प्रास्ताविक भागवत कोरे यांनी केले. आभार राजू सूर्यवंशी यांनी मानले.तहसीलदार विजय बनसोडे व गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे परीक्षा केंद्राना भेटी देणार आहेत. सदर परीक्षा नियंत्रणकामी कैलास बडगुजर, दिलीप अहिरे, नितीन भालेराव, केंद्र प्रमुख अनिल पाटील, सीमा पाटील, जयदीप पाटील, सुनील शिवदे, गिरीश भोयर, सतीश पाटील, संजय पाटील इत्यादी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

11 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
11 hrs ago
7407d2c4-2fe1-4113-9960-2c54dfef1f49

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by SamirQureash Quresh
    1
    Post by SamirQureash Quresh
    user_SamirQureash Quresh
    SamirQureash Quresh
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....
    2
    सिल्लोड तालुक्यातील सावखेडा, कोटनांद्रावाडी,बोरगाव येथे महसूल विभागाच्या व अवैध वाळू चोरांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे दिवस-रात्र जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रास अवैध वाळू उपसा जोरात....
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Farmer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • धाडमध्ये व्यवसायिकांना हप्ता मागणारी गॅंगची पोलिसांनी काढली धिंड गुंडांची धिंड काढल्याने धाड पोलिसांचे होत आहे कौतुक धाड परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांच्या मनात आपली भीती निर्माण करणारे काही टवाळखोरांनी एका मेडिकल संचालकास मारहाण करत हप्ता मागितलं होतं. याच हप्तेखोर गॅंगमधील 3 आरोपींची धाड पोलिसांनी धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनुने (वय ३०) याचे धाड येथे गुरांच्या औषधीचे मेडिकल आहे.मागील 6 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनुने आपल्या मेडिकलकडे जात असतांना 4 जणांनी त्यांना धाड येथील जगदंबा स्वीट मार्ट समोर अडवून धाड मध्ये व्यवसाय करायचं असेल तर आम्हाला हप्ता द्यावं लागेल असे म्हणत मारहाण केली होती. या प्रकरणी धाड ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.दरम्यान, याच गुन्ह्यातील काही आरोपींनी आणखी दोन हॉटेलमध्ये जाऊन धमकावत हप्त्याची मागणी केल्याची चर्चा रंगत आहे.या हप्ताखोर गॅंगमधील आरोपींची दहशत वाढत चालल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. धाडचे ठाणेदार प्रताप भोस यांनी तपास चक्रे फिरवून त्यांनी आरोपींना अटक केली. तसेच ग्रामस्थांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी त्यांनी हप्ताखोर गॅंग मधील 3 आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे,रौशन गणेश शिंदे आणि राहुल दळवी यांची गावातून धिंड काढली. धाड मध्ये दहशत पसरवणारी या हप्ताखोर गॅंगची गावातील मुख्य बाजारपेठेत धिंड काढल्यामुळे ग्रामस्थांचे मनोबल वाढले असून पोलिसांचे देखील कौतुक होत आहे.
    1
    धाडमध्ये व्यवसायिकांना हप्ता मागणारी गॅंगची पोलिसांनी काढली धिंड 
गुंडांची धिंड काढल्याने धाड पोलिसांचे होत आहे कौतुक
धाड परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांच्या मनात आपली भीती निर्माण करणारे काही टवाळखोरांनी एका
मेडिकल संचालकास मारहाण करत हप्ता मागितलं होतं. याच हप्तेखोर गॅंगमधील 3 आरोपींची धाड पोलिसांनी धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुलडाणा तालुक्यातील दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनुने (वय ३०) याचे धाड येथे गुरांच्या औषधीचे मेडिकल आहे.मागील 6 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनुने आपल्या मेडिकलकडे जात असतांना 4 जणांनी त्यांना धाड येथील जगदंबा स्वीट मार्ट समोर अडवून धाड मध्ये व्यवसाय करायचं असेल तर आम्हाला हप्ता द्यावं लागेल असे म्हणत मारहाण केली होती. या प्रकरणी धाड ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.दरम्यान, याच गुन्ह्यातील काही आरोपींनी आणखी दोन हॉटेलमध्ये जाऊन धमकावत हप्त्याची मागणी केल्याची चर्चा रंगत आहे.या
हप्ताखोर गॅंगमधील आरोपींची दहशत वाढत चालल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. धाडचे ठाणेदार प्रताप भोस यांनी तपास चक्रे फिरवून त्यांनी आरोपींना अटक केली. तसेच ग्रामस्थांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी त्यांनी हप्ताखोर गॅंग मधील 3 आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे,रौशन गणेश शिंदे आणि राहुल दळवी यांची गावातून धिंड काढली. धाड मध्ये दहशत पसरवणारी या हप्ताखोर गॅंगची गावातील मुख्य बाजारपेठेत धिंड काढल्यामुळे ग्रामस्थांचे मनोबल वाढले असून पोलिसांचे देखील कौतुक होत आहे.
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Shree Gajanan Vidya Mandir School के और से Mk Deshmukh का Satkar
    1
    Shree Gajanan Vidya Mandir School के और से Mk Deshmukh का Satkar
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by दैनिक,"निळे प्रतीक"
    1
    Post by दैनिक,"निळे प्रतीक"
    user_दैनिक,"निळे प्रतीक"
    दैनिक,"निळे प्रतीक"
    पत्रकार औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अंबादास दानवे सिल्लोड शहरात, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी चे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन, सिल्लोड शहरात शोककळा.. अंत्यविधीसाठी हजारो नागरिकांचा.
    1
    अंबादास दानवे सिल्लोड शहरात, आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी चे निधन,
सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन, सिल्लोड शहरात शोककळा.. अंत्यविधीसाठी हजारो नागरिकांचा.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • बुलढाण्यात जनआक्रोश! हद्दवाढीविरोधात ५ गावांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा.*
    1
    बुलढाण्यात जनआक्रोश! हद्दवाढीविरोधात ५ गावांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा.*
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by SamirQureash Quresh
    2
    Post by SamirQureash Quresh
    user_SamirQureash Quresh
    SamirQureash Quresh
    सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.