logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एकत्रित प्रयत्नांचे फलित: धामणगाव (गवळी) जिल्हा परिषद शाळेची परसबाग नागपूर जिल्ह्यात अव्वल! एकत्रित प्रयत्नांचे फलित: धामणगाव (गवळी) जिल्हा परिषद शाळेची परसबाग नागपूर जिल्ह्यात अव्वल! नागपूर/ भिवापूर /नांद प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर/ भिवापूर: (दि १ एप्रिल) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय परसबाग स्पर्धेत भिवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धामणगाव (गवळी) ने आपल्या उत्कृष्ट नियोजनाच्या जोरावर नागपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून फुललेली ही 'सेंद्रिय परसबाग' आता संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे. सेंद्रिय शेतीतून आरोग्याचा धडा शाळेतील या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची ओळख करून देणे, निसर्गप्रेम रुजवणे आणि शालेय पोषण आहारात ताजी व विषमुक्त भाजीपाला पुरवणे हा आहे. मुख्याध्यापक सतीश बाबुराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने कचरा व्यवस्थापन आणि सेंद्रिय खताचा वापर करून पर्यावरण संवर्धनाचा मोठा संदेश दिला आहे. नावीन्यपूर्ण 'गोलाकार' परसबाग या परसबागेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा गोलाकार आकार आणि त्यात तयार केलेले १४ वाफे. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांपासून ते वांगी, मिरची, टमाटर, बटाटे, मुळा, गाजर, चवळी, भेंडी, फुलकोबी आणि फळभाज्यांची लागवड करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर ऊस, पपई, चिकू, आंबा आणि फणस यांसारखी फळझाडेही डोलत आहेत. शिल्लक भाजीपाल्याची गावात विक्री करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारिक ज्ञानाचे धडेही दिले जात आहेत. वन्यजीवांच्या उपद्रवावर मात शाळेची संरक्षक भिंत जंगलाला लागून असल्याने माकडांचा मोठा उपद्रव असतो. मात्र, मदतनीस वैशाली लोहंबरे यांच्यासह विद्यार्थी हिमांशू गुरले आणि ईश्वर मीना सुट्टीच्या दिवशीही बागेचे रक्षण करण्याचे कर्तव्य चोख बजावतात. लोकसहभागातून कायापालट या यशात शिक्षक अनिल डांगे, संदीप उमाठे, योगेश लोहंबरे, स्वयंपाकी गयाबाई मिसाळ यांच्यासह ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. नाजूक गुरले, विजय देशमुख, परसराम हाते यांच्यासह अनेक पालकांनी ट्रॅक्टर व शेती साहित्याच्या मदतीने श्रमदान केले, तर ज्ञानेश्वर लोहंबरे यांनी सेंद्रिय खताचा पुरवठा केला. शाळेने सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन करून ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर केला आहे. शासकीय पारितोषिक आणि कौतुक या यशाबद्दल शाळेला तालुका स्तरावर ११ हजार आणि जिल्हा स्तरावर २१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. या रकमेचा विनियोग परसबागेच्या अधिक आधुनिकीकरणासाठी केला जाणार आहे. या यशाबद्दल माजी सभापती माधुरीताई देशमुख, गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, विस्तार अधिकारी ऋग्वेद भांडारकर, केंद्रप्रमुख मधुकर मडावी यांच्यासह शिक्षण विभागातील मान्यवरांनी शाळेचे विशेष अभिनंदन केले आहे.

3 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
08207355-ce22-4791-8f6f-eef629b354ea

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले. मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    1
    जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले.
मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. 
विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Mahesh RamRaj PandRam
    3
    Post by Mahesh RamRaj PandRam
    user_Mahesh RamRaj PandRam
    Mahesh RamRaj PandRam
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.
    1
    कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    17 min ago
  • खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela #dimplesingh
    1
    खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela  #dimplesingh
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम #KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos
    1
    खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम
#KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.