Shuru
Apke Nagar Ki App…
Anis qureshi sillod
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य ऐतिहासिक आरक्षण मेळाव्यात गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या अभ्यास समितीकडून तात्काळ अहवाल घेऊन तो केंद्र सरकारकडे शिफारसीसाठी पाठवावा आणि गोर बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारला जाईल आणि हे फडणवीस सरकारला परवडणार नाही, असा स्पष्ट इशारा चव्हाण यांनी दिला. गोर बंजारा समाज हा आदिम सभ्यता जपणारा असून अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करतो, त्यामुळे त्यांना या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात या मागणीवर समाज ठाम आहे. या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गोर बंजारा समाजाच्या वतीने ५७ महामोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान अनेक तरुणांनी आमरण उपोषण केले आणि किमान ५ तरुणांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, तसेच समृद्धी महामार्गही रोखण्यात आला होता. त्यानंतर सरकारने अनुसूचित जमाती आयोगासाठी अभ्यास समिती नेमली, मात्र सात महिने उलटूनही या समितीने आपला अभ्यास सुरू केलेला नाही. याच शासकीय दिरंगाईमुळे गोर बंजारा आरक्षण कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत संभाजीनगरमध्ये हा महामेळावा आयोजित केला. या कार्यक्रमाची सुरुवात पारंपारीक निसर्गपूजा म्हणजेच 'जळभोग' लावून आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून झाली. प्रा. डॉ. दामोदर राठोड हिमायदनगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १० हजार समाज बांधव व भगिनी उपस्थित होते आणि त्यांनी भविष्यात एकजुटीने एसटी आरक्षणासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी आमदार राजेश भाऊ राठोड, माजी आमदार निलय नाईक, कर्नाटक बिदरचे उद्योजक जयसिंग राठोड, नांदेडच्या शशिकला काशिनाथ राठोड, आरक्षण अभ्यासक प्रा. मोहन भाऊ चव्हाण, निवृत्त माहिती संचालक मोहन भाऊ राठोड, परभणीचे प्रा. डॉ. बबन पवार, कर्नाटकचे माजी न्यायाधीश ॲड. सुभाषचंद्र राठोड, राष्ट्रीय समन्वयक दिगंबर राठोड, सिम्पलताई राठोड, राष्ट्रीय महासचिव प्रा. डॉ. अनिल भाऊ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या आकाशी जाधव, डॉ. अभय जाधव, कबीरदास महाराज पोरिया गड, कर्नाटकचे आयएएस अनिल राठोड, मध्य प्रदेशचे देवराज नायक, निवृत्त अधिकारी उत्तम चव्हाण, उद्योजक गणेश चव्हाण, देविदास राठोड, विनोद जाधव आणि अरुण राठोड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.3
- जालना येथे शासकीय डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर एका डॉक्टरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शासकीय डॉक्टरवर झालेल्या या हल्ल्यानंतर डॉक्टरांनी एकत्र येत आपली एकजूट दाखवून दिली आहे.1
- छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. येथे थेट 'हल्लाबोल' आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे.1
- पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, 'जनलक्ष्य न्यूज'चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार - २०२६" प्रदान करण्यात आला आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. प्रमोद बारी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे खासदार कल्याण काळे यांनी सिल्लोडचे गटविकास अधिकारी (बिडिओ) रत्नाकर पगार यांना चांगलेच खडसावले आहे. सिल्लोड येथे खासदार कल्याण काळे यांची कार्यकर्त्यांसह आढावा बैठक सुरू होती. या आढावा बैठकीमध्ये बिडिओ रत्नाकर पगार यांनी कार्यकर्त्यांना धमकी दिली. या धमकीला उत्तर देताना खासदार कल्याण काळे यांनी अधिकारी पगार यांना चांगलेच खडसावले. दरम्यान, खासदार कल्याण काळे यांनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना खडसावल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.1
- औरंगाबादमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यपद्धती आणि विकासकामांबाबत विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला नसून, तो केवळ काही मोजक्याच व्यक्तींना मिळाल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध नोंदविला. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी विविध कथित गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, विरोधकांकडून झालेल्या या आरोपांवर आमदार अब्दुल सत्तार किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही।1
- दक्षिणी विएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या फू क्वोक बेटाजवळ शनिवारी एक अत्यंत वेदनादायक दुर्घटना घडली. ३२ भारतीय पर्यटक आणि चालक दलाच्या ४ सदस्यांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट समुद्रात उलटली. या भीषण अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही बोट एका बेटाच्या सफरीवरून परतत होती. किनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच, समुद्रातील प्रचंड लाटा आणि खराब हवामानामुळे बोट उलटली. या दुर्घटनेनंतर स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाने तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले आणि २१ लोकांना सुखरूप बाहेर काढले।1