logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त शिरूर मध्ये शोभा यात्रा. सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग शिरूर: “भगवान महावीर की जय”च्या गजरात शिरूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत सर्वधर्मीयांच्या सहभागामुळे शहरात एकात्मतेचे आणि सौहार्दाचे दर्शन घडले. कापड बाजार येथील जैन मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी लहान मुलांचे ध्वज पथक लक्ष वेधून घेत होते. त्यामागोमाग पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या जैन बांधव आणि महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती. “भगवान महावीर की जय”च्या घोषणांनी आणि त्यांच्या जीवनावर आधारित गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. कापड बाजार, राम आळी, मारुती आळी, सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, सोनार आळी, कुंभार आळी, आडत बाजार आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण चौक या मार्गाने मिरवणूक जैन स्थानकाजवळ पोहोचली. मार्गात ठिकठिकाणी बिस्किटे, चॉकलेट्स व थंडपेयांचे वाटप करून भाविकांचे स्वागत करण्यात आले. जैन संत रमणीक  महाराज,  सतेंद्र महाराज,संघपती भरत चोरडिया, जैन युवा परिषदचे प्रकाश बाफना, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळचे सदस्य चंदूलाल चोरडिया,  माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बोरा,चंद्रकांत बोरा, गोरक्षण पांजरापोळचे माजी अध्यक्ष रमणलाल बोरा,  महामंत्री वसंत गादिया, रमाकांत बोरा,  देवल शहा, माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल, प्रितेश कोठारी, सुनील धाडिवाल, सुनील कांतीलाल बाफना, नितीन दुगड, विनोद बोथरा, अतुल बोथरा,श्रेणिक नहार ,आदी सहभागी झाले होते. जैन स्थानकाजवळ संघपती भरत चोरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रशांत गादिया यांनी ध्वजगीत म्हटले. यावेळी जैन संत रमणिक महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाज प्रगतीसाठी परस्पर सहकार्य आवश्यक आहे. एकमेकांचे पाय ओढण्याऐवजी मदतीचा हात देणे हीच खरी मानवता आहे,” असा संदेश त्यांनी दिला. सुभाष चौक येथे महावीर जयंती शोभायात्रा देखावा अंतर्गत भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित आकर्षक देखावा सादर करण्यात आला. अनुष्का धन्यकुमार भटेवरा यांनी त्याची सजावट केली होती. तसेच माजी नगरसेवक विनोद भालेराव यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले, जय बाळाजू ग्रुपचा वतीने ड्रायफ्रूट चे वाटप करण्यात आले.तर जीनेद्र ग्रुपतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित ‘महावीर गाथा’ व्याख्यानमालेनेही नागरिकांना विचारप्रवृत्त केले. जैन संत व प्रख्यात कथाकार रमणीक मुनिजी महाराज यांच्या प्रभावी वाणीतून ही व्याख्यानमाला २४ ते ३१ मार्चदरम्यान दररोज रात्री पार पडली.

3 hrs ago
user_Satish Dhumal
Satish Dhumal
Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago
482b4bbf-f56b-49a0-8504-3980fc3d06ca

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त शिरूर मध्ये शोभा यात्रा. सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग शिरूर: “भगवान महावीर की जय”च्या गजरात शिरूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत सर्वधर्मीयांच्या सहभागामुळे शहरात एकात्मतेचे आणि सौहार्दाचे दर्शन घडले. कापड बाजार येथील जैन मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी लहान मुलांचे ध्वज पथक लक्ष वेधून घेत होते. त्यामागोमाग पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या जैन बांधव आणि महिला भगिनींची मोठी उपस्थिती होती. “भगवान महावीर की जय”च्या घोषणांनी आणि त्यांच्या जीवनावर आधारित गीतांनी संपूर्ण

13a57172-c79c-4843-841d-db8adcfe6186

वातावरण भक्तिमय झाले होते. कापड बाजार, राम आळी, मारुती आळी, सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, सोनार आळी, कुंभार आळी, आडत बाजार आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण चौक या मार्गाने मिरवणूक जैन स्थानकाजवळ पोहोचली. मार्गात ठिकठिकाणी बिस्किटे, चॉकलेट्स व थंडपेयांचे वाटप करून भाविकांचे स्वागत करण्यात आले. जैन संत रमणीक  महाराज,  सतेंद्र महाराज,संघपती भरत चोरडिया, जैन युवा परिषदचे प्रकाश बाफना, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळचे सदस्य चंदूलाल चोरडिया,  माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बोरा,चंद्रकांत बोरा, गोरक्षण पांजरापोळचे माजी अध्यक्ष रमणलाल बोरा,  महामंत्री वसंत गादिया,

64f1781a-bf1e-4305-a598-27a32bbef481

रमाकांत बोरा,  देवल शहा, माजी नगरसेवक प्रकाश धाडीवाल, प्रितेश कोठारी, सुनील धाडिवाल, सुनील कांतीलाल बाफना, नितीन दुगड, विनोद बोथरा, अतुल बोथरा,श्रेणिक नहार ,आदी सहभागी झाले होते. जैन स्थानकाजवळ संघपती भरत चोरडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रशांत गादिया यांनी ध्वजगीत म्हटले. यावेळी जैन संत रमणिक महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाज प्रगतीसाठी परस्पर सहकार्य आवश्यक आहे. एकमेकांचे पाय ओढण्याऐवजी मदतीचा हात देणे हीच खरी मानवता आहे,” असा संदेश त्यांनी दिला. सुभाष चौक येथे महावीर जयंती शोभायात्रा देखावा अंतर्गत भगवान महावीर यांच्या जीवनावर

94fad5a0-9003-4a7a-ae46-9d4897ebfcad

आधारित आकर्षक देखावा सादर करण्यात आला. अनुष्का धन्यकुमार भटेवरा यांनी त्याची सजावट केली होती. तसेच माजी नगरसेवक विनोद भालेराव यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले, जय बाळाजू ग्रुपचा वतीने ड्रायफ्रूट चे वाटप करण्यात आले.तर जीनेद्र ग्रुपतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित ‘महावीर गाथा’ व्याख्यानमालेनेही नागरिकांना विचारप्रवृत्त केले. जैन संत व प्रख्यात कथाकार रमणीक मुनिजी महाराज यांच्या प्रभावी वाणीतून ही व्याख्यानमाला २४ ते ३१ मार्चदरम्यान दररोज रात्री पार पडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24}: येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साई गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छता समितीचे सभापती एजाज बागवान, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे, नियोजन व विकास गृहनिर्माण समिती सभापती स्वाती साठे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका संगीता मल्लाव, रिंकू जगताप, स्वीटी शिंदे, नगरसेवक सागर नरवडे, निलेश पवार, अमोल चव्हाण आदींसह संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा, विश्वस्त सुवालाल पोखरणा, पूजा पोखरणा, आदित्य पोखरणा, आदिती पोखरणा, नोटरी देवराम धुमाळ, प्रा. अलका बेलोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, महेश कटारिया, वृषाली मुसळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात असल्याचे कौतुक नगराध्यक्षा पाचर्णे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे प्रास्ताविकात अध्यक्ष विकास पोखरणा यांनी सांगितले. इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी वाढल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थितांची मनं जिंकली. रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाट्य, विठ्ठल-रुक्मिणी आणि पंढरीच्या वारीवरील सादरीकरण, तसेच हिंदी व मराठी गीतांचे गायन आणि चित्रपट गीतांवरील नृत्यांनी रंगत आणली. शाळेच्या बँड पथकाने ड्रमसह वादन सादर करत कार्यक्रमाला वेगळी उंची दिली. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेच्या शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी केले. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.
    4
    शिरूर { डेली न्यूज  पोस्ट 24}: येथील व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साई गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छता समितीचे सभापती एजाज बागवान, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव, पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे, नियोजन व विकास गृहनिर्माण समिती सभापती स्वाती साठे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका संगीता मल्लाव, रिंकू जगताप, स्वीटी शिंदे, नगरसेवक सागर नरवडे, निलेश पवार, अमोल चव्हाण आदींसह संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा, विश्वस्त सुवालाल पोखरणा, पूजा पोखरणा, आदित्य पोखरणा, आदिती पोखरणा, नोटरी देवराम धुमाळ, प्रा. अलका बेलोटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, महेश कटारिया, वृषाली मुसळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जात असल्याचे कौतुक नगराध्यक्षा पाचर्णे यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे प्रास्ताविकात अध्यक्ष विकास पोखरणा यांनी सांगितले. इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थितांची मनं जिंकली. रामायणातील प्रसंगांवर आधारित नृत्यनाट्य, विठ्ठल-रुक्मिणी आणि पंढरीच्या वारीवरील सादरीकरण, तसेच हिंदी व मराठी गीतांचे गायन आणि चित्रपट गीतांवरील नृत्यांनी रंगत आणली. शाळेच्या बँड पथकाने ड्रमसह वादन सादर करत कार्यक्रमाला वेगळी उंची दिली.
कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन शाळेच्या शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी केले. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Shubham Jadhav
    1
    Post by Shubham Jadhav
    user_Shubham Jadhav
    Shubham Jadhav
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • “दादा नसले तरी त्यांची उपस्थिती आजही जाणवते” “मनामनांत जिवंत दादा; आठवणींचा उजाळा कायम” “दादा शरीरानं नाहीत, पण प्रत्येकाच्या श्वासात आहेत”
    1
    “दादा नसले तरी त्यांची उपस्थिती आजही जाणवते”
“मनामनांत जिवंत दादा; आठवणींचा उजाळा कायम”
“दादा शरीरानं नाहीत, पण प्रत्येकाच्या श्वासात आहेत”
    user_Shaurya Varta News
    Shaurya Varta News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *कामगाराचा मृत्यू जबाबदार कोण? वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकाम पुन्हा चर्चेत*
    1
    *कामगाराचा मृत्यू जबाबदार कोण? वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकाम पुन्हा चर्चेत*
    user_R A News
    R A News
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - सामान्य नागरिकांना जप्तीच्या नोटिसा, मग सत्ताधाऱ्यांना अभय का ? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.... पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला थकबाकीवरून नोटीस बजावल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यालयाची तब्बल ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, अभय योजनेचा लाभ देऊनही अद्याप कराचा भरणा झालेला नसल्याचे समोर आले आहे. शहर भाजप कार्यालयाचा एकूण ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांचा कर थकीत आहे, तर अभय योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार रुपयांची सवलत देखील देण्यात आली. मात्र सवलत वजा जाता ५ लाख ९२ हजार ९८५ रुपये अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.त्यांनी सन २०२२ पासून या मालमत्तेचा कर भरलेला नाही. सामान्य नागरिकांनी किरकोळ कर थकवला तरी महापालिका प्रशासन तातडीने घरांना सील ठोकणे किंवा दुकानांची जप्ती करणे अशी कठोर कारवाई करते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाबाबत प्रशासन उदार असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य करदात्यांसाठी एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा, अशा दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या मुख्य कार्यालयावरील या मोठ्या थकबाकीबाबत विचारले असता, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच पार पाडली की काय, असा संशय बळावला आहे.... #पिंपरीचिंचवड #पीसीएमसी #भाजपकार्यालय #करथकबाकी #महापालिका #करवसुली #राजकारण #सत्ताधारीपक्ष #प्रशासनप्रश्नचिन्ह #दुटप्पीनिती #नागरिकआक्रोश #मालमत्ताकर #अभययोजना #स्थानिकबातम्या #PimpriChinchwad #PCMC #BJP #BJPOffice #PropertyTax #TaxDues #MunicipalCorporation #LocalPolitics #CivicIssues #TaxRecovery #Governance #DoubleStandards #PublicOutrage #MaharashtraNews
    1
    पिंपरी चिंचवड : -
सामान्य नागरिकांना जप्तीच्या नोटिसा, मग सत्ताधाऱ्यांना अभय का ? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह....
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला थकबाकीवरून नोटीस बजावल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप कार्यालयाची तब्बल ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असून, अभय योजनेचा लाभ देऊनही अद्याप कराचा भरणा झालेला नसल्याचे समोर आले आहे.
शहर भाजप कार्यालयाचा एकूण ७ लाख ५७ हजार ७५० रुपयांचा कर थकीत आहे, तर अभय योजनेअंतर्गत १ लाख ६४ हजार रुपयांची सवलत देखील देण्यात आली. मात्र सवलत वजा जाता ५ लाख ९२ हजार ९८५ रुपये अद्यापही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.त्यांनी सन २०२२ पासून या मालमत्तेचा कर भरलेला नाही. सामान्य नागरिकांनी किरकोळ कर थकवला तरी महापालिका प्रशासन तातडीने घरांना सील ठोकणे किंवा दुकानांची जप्ती करणे अशी कठोर कारवाई करते. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाबाबत प्रशासन उदार असल्याचे चित्र दिसत आहे. सामान्य करदात्यांसाठी एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा, अशा दुटप्पी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या मुख्य कार्यालयावरील या मोठ्या थकबाकीबाबत विचारले असता, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. त्यामुळे महापालिकेने ही प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच पार पाडली की काय, असा संशय बळावला आहे....
#पिंपरीचिंचवड #पीसीएमसी #भाजपकार्यालय #करथकबाकी #महापालिका #करवसुली #राजकारण #सत्ताधारीपक्ष #प्रशासनप्रश्नचिन्ह #दुटप्पीनिती #नागरिकआक्रोश #मालमत्ताकर #अभययोजना #स्थानिकबातम्या
#PimpriChinchwad #PCMC #BJP #BJPOffice #PropertyTax #TaxDues #MunicipalCorporation #LocalPolitics #CivicIssues #TaxRecovery #Governance #DoubleStandards #PublicOutrage #MaharashtraNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Vruttshakti Digital News
    1
    Post by Vruttshakti Digital News
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Shubham Jadhav
    1
    Post by Shubham Jadhav
    user_Shubham Jadhav
    Shubham Jadhav
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.