logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दुसऱ्यांना सुद्धा आई असते हे तुमच्या पक्षातील लोकांना सांगा - राज ठाकरे मुंबई। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा २० वा वर्धापनदिन. त्यानिमित्त आयोजित मेळाव्यात माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील सहकाऱ्यांना संबोधित केलं. १) माझ्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी सेनेतून झाली. तिथे काम करत इथपर्यंत आलो. अमित आणि त्याचे सहकारी उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. २) NEET परीक्षेतील गोंधळाच्या नंतर देशभर विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्यानंतरचा विद्यार्थ्यांचा हा पहिला मेळावा. मी जेंव्हा कामाला सुरुवात केली तेंव्हा काळ वेगळा होता, तेंव्हाचे विद्यार्थ्यांच्या समोरचे प्रश्न वेगळे होते, आजचे प्रश्न वेगळे आहेत. सगळं स्वरूपच बदललं आहे. मी टेलिग्राम ते इंस्टाग्राम काळ पाहिला आहे. ३) आज 'जेन झी' आंदोलनानंतर 'जेन झी' बद्दल खूप बोललं जात आहे. पण जेन झी म्हणजे फक्त शहरातील जेन झी असा समज करून घेऊ नका. जसे त्यांचे प्रश्न आहेत ते समजून घेतले पाहिजेत तसे ग्रामीण महाराष्ट्रातील पण याच वयोगटातील जे तरुण-तरुणी आहेत. त्यांचे प्रश्न काय आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सहकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ४) सगळ्याच कल्पना आता बदलल्या आहेत. आमच्या लहानपणी सांगायचे की रोज डोक्याला तेल लावा मग बुद्धी तल्लख होते. पण सध्या राज्याचे जे उच्चशिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत ते त्यांच्या डोक्यावरच्या प्रत्येक केसाला तेल लावतात तरीही त्यांच्या बुद्धीत फारसा फरक पडला नाही. ते म्हणाले दिल्लीत आंदोलनाच्या दरम्यान जी दगडफेक झाली त्या दगडांवरचे फूटप्रिंट घेऊन ते आधार कार्डशी लिंक करून दगडफेक करणाऱ्याना शोधणार. काय बोलताय ? फूटप्रिंट आणि फिंगरप्रिंटमधला फरक नाही कळत ? अशा माणसांबद्दलचा 'जेन झी' च्या मनात राग असणारच ना. कोल्हापूरकरांनी पुण्याला यांना पाठवलं की विद्येच्या माहेरघरात जाऊन काही फरक पडेल पण काहीही फरक पडला नाही यांच्यात. ५) आज सकाळीच पंतप्रधानांचं निवेदन पाहिलं. त्यात त्यांनी म्हणलं आहे ते मान्य आहे. त्यांच्याबद्दल जी भाषा वापरली गेली ती अयोग्यच होती. अशी भाषा कोणी कोणाच्या बाबत वापरूच नये. हे चूकच आहे. पण हे तुमच्या लोकांना पण सांगा. २०१२ पासून ज्या ट्रोलच्या सेना तुमच्या पक्षाने पोसल्यात त्या महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी ते आमच्यासकट सगळ्यांना घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करतात. आज महाराष्ट्रात कलाकारांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर ट्रोल केलं जातं. या सगळ्याबद्दल तुमच्या लोकांना पण कधीतरी सांगा. जे पेराल तेच उगवतं. पंतप्रधान म्हणाले की माझ्या आईबद्दल चुकीचं बोललं गेलं. ते चूकच आहे. असं होता कामा नये. पण दुसऱ्यांना सुद्धा आई असते हे तुमच्या पक्षातील लोकांना सांगा. तुमच्या पक्षाने जे ट्रोल पोसलेत त्यांना सांगा. तुम्ही म्हणालात की 'मुलांना माफ केलं आहे'. पण तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार ? ज्यांनी विद्यार्थ्यांवर लाठ्या मारल्या, ज्यांनी विद्यार्थ्यांची डोकी फोडली आणि हे सगळं करा असं ज्यांनी सांगितलं ते कधी माफी मागणार ? ६) जे आंदोलन झालं ते फक्त NEET परीक्षांतील गोंधळामुळे झालं आहे असं नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन मुलांच्या, तरुण-तरुणींच्या मनात काय खदखदतंय याचा विचार करा. आज रस्ते धड नाहीत, सगळीकडे पाणी तुंबतं, मैदानं नाहीत, बागा नाहीत, धड शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत, सर्वत्र खाजगीकरण सुरु आहे. सगळ एकाच उद्योगपतीच्या घशात टाकणं सुरु आहे. आज आमदार, खासदार ५०, १०० कोटी देऊन फोडले जात आहेत. डिजिटल इंडियाची घोषणा करणारं सरकार आमदार खासदार फोडताना कार्ड कुठे स्वाईप करता ? या सगळ्या परिस्थितीचा राग आज विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या, तरुण-तरुणींच्या मनात आहे, आणि त्याचा हा उद्रेक होता. आणि अजून सुद्धा उद्रेक बाहेर येणार आहे. कोणाला सत्तेवरून खेचणं आणि कोणालातरी सत्तेत आणणं हा विषय नाहीये. देशातील तरुणांच्या भविष्याचा विषय आहे. ७) ग्रामीण भागातील तरुण-तरुणींच्या मनात काय सुरु असेल ? ते काय विचार करत असतील ? आज त्यांच्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जे आत्महत्या करत आहेत ते तरुण-तरुणींच्या नात्यातील, ओळखीतील लोकं असतील. त्यांच्या अंत्यविधीला जाताना या मुलांच्या मनात काय विचार येत असेल ? आपल्या घरच्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून ही मुलं गाव सोडून शहरांत येतात. नोकरीसाठी वणवण करतात. आणि इथे येऊन सुद्धा काय तर शहरं बकाल झालेली आहेत हे पाहतात. ८) या सरकारने 'स्मार्ट सिटी'चा गाजावाजा केला. कुठे आहेत त्या स्मार्ट सिटी ? इथलं एकही शहर धड नाही. आज मुलं परदेशात जात आहेत. का तर इथे त्यांना राहावंसं वाटत नाही. शहरं बकाल आहेत, मुलाबाळांना कुठे बाहेर नेण्याची सोय नाही. परदेशात उत्तम रस्ते, मैदानं, बागा, स्वच्छता, खेळांची संकुल सगळं काही आहे. या सगळ्यामुळे या मुलांना परदेशात जाऊन स्थायिक व्हावंसं वाटतं. आणि आपल्याला याचं काहीच वाटत नाही ? ९) सरकारने लोकसभेत मान्य केलं आहे की या देशातील उद्योजक हा देश सोडून जात आहेत. मोदींच्या आयुष्यावरच्या सिनेमात मोदींची भूमिका करणारा विवेक ओबेरॉय हा दुबईत राहतो. मोदींच्या काळात कसं सगळं छान झालं, कसा देश बदलला असल्या गप्पा मारणारा आर माधवन कुटुंबासकट दुबईत जाऊन राहतो. जर मोदींनी सगळं कसं छान केलं आहे असं वाटतंय ना मग तुम्ही का परदेशात स्थायिक होत आहात ? हे लोक इथे येणार सरकार स्पॉन्सर्ड फिल्ममधे काम करणार आणि पुन्हा दुबईला जाणार. उद्योगपती परदेशात जात आहेत १०) पंतप्रधान म्हणतात विद्यार्थी चुकीच्या रस्त्यावर भरकटलेत. ते भरकटले नाहीयेत तर त्यांना तिकडे ढकललं जात आहे. ओशोंच एक सुंदर वाक्य मध्ये ऐकलं, ते म्हणाले, "कौन कहता है देश का युवक गलत रास्ते पर भटक रहा है। अगर रास्ता बननेवालेने गलत रास्ता बनाया है तो युवकों का क्या उसमें दोष ?" या मुलांच्या अपेक्षा मारल्या जात आहेत. त्यांना आसपास आपल्यासाठी काहीच चाललं नाहीये हे दिसल्यावर त्यांनी काय करायचं ? ११) आज देशातील तरुण-तरुणी माझं सगळं चांगलं होऊ दे, मला नोकरी मिळू दे, माझं लग्न होऊ दे म्हणून देवळात जाऊन देवाकडे प्रार्थना करतात. त्या देवाच्या देवळातच चोरी होत आहे. राम मंदिर या देशातील करोडो लोकांच्या भावनेचा विषय. पण त्याच देवळातून पैशाचा अपहार होणार असेल तर या मुलांनी कुणाकडे बघायचं ? मोदी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला स्वतः एकटे आत होते आणि स्वतः एकट्याने पूजा केली. मग मोदी राम मंदिरातील अपहाराबद्दल का बोलत नाहीत ? का अयोध्येत खासदार निवडून नाही आला म्हणून यांचा संबंध संपला ? १२) या देशातील तरुण-तरुणी श्रद्धाळू आहेत जे योग्य आहे पण त्यांना धर्मांध बनवू नका. त्यांना शिक्षणाच्या वाटेवर न्या. त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नका. फक्त जय श्रीराम म्हणून काय होणार ? देशात गोरक्षक गाड्या पकडतात आणि नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात अभिमानाने सांगतात की जगात बीफ एक्स्पोर्टमध्ये भारताचा नंबर पहिला आहे. गायी मारल्याशिवाय बीफ एक्स्पोर्ट होईल का ? मग गोरकाक्षांनी काय करायचं ? १३) देशातील एक लाख शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे नाहीत... १५,००० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही... १० लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत.२००४ मध्ये शिक्षणावर ३.२% खर्च होत होता, आज २०२६ मध्ये २.८%. खर्च होत आहे. १४) सिद्धिविनायक मंदिरात अपहार झाल्याचं या मंदिराच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदेंना पत्र लिहून कळवलं आहे. दानपेटीतुन १८ कोटी रुपये लुटले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना सरकारवर विश्वास ठेवता येत नाही, म्हणून ते देवळात जाणार तर त्या देवळातच चोरी सुरु आहे, या मुलांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर ? १५) माझ महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील सहकाऱ्यांना सांगणं आहे की सदस्य नोंदणी कराच पण या विद्यार्थ्यांच्या मनात नक्की काय सुरु आहे हे पण समजून घ्या.

1 hr ago
user_Amit Omprakash tiwari
Amit Omprakash tiwari
मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 📍 आज जोगेश्वरी के बांद्रा प्लॉट में गटर की समस्या को लेकर स्थानीय लोगों ने अपनी परेशानी जाहिर की जोगेश्वरी में गटर, गंदगी, पानी और बिजली की समस्या से स्थानीय लोग लंबे समय से परेशान हैं। जगह-जगह खुले गटर, जमा गंदा पानी और कचरे के कारण लोगों का रोज़मर्रा का जीवन प्रभावित हो रहा है। वहीं, बिजली से जुड़ी समस्याओं को लेकर भी स्थानीय नागरिकों ने अपनी नाराज़गी जाहिर की। मुंबई हिंदी न्यूज़ की टीम ने मौके पर पहुंचकर स्थानीय लोगों से बात की। लोगों ने अपनी परेशानियां खुलकर बताईं और संबंधित विभागों से जल्द समाधान की मांग की। क्या आपके इलाके में भी ऐसी समस्या है? अपनी राय हमें कमेंट में ज़रूर बताएं
    1
    📍 आज जोगेश्वरी के बांद्रा प्लॉट में गटर की समस्या को लेकर स्थानीय लोगों ने अपनी परेशानी जाहिर की
जोगेश्वरी में गटर, गंदगी, पानी और बिजली की समस्या से स्थानीय लोग लंबे समय से परेशान हैं। जगह-जगह खुले गटर, जमा गंदा पानी और कचरे के कारण लोगों का रोज़मर्रा का जीवन प्रभावित हो रहा है। वहीं, बिजली से जुड़ी समस्याओं को लेकर भी स्थानीय नागरिकों ने अपनी नाराज़गी जाहिर की।
मुंबई हिंदी न्यूज़ की टीम ने मौके पर पहुंचकर स्थानीय लोगों से बात की। लोगों ने अपनी परेशानियां खुलकर बताईं और संबंधित विभागों से जल्द समाधान की मांग की।
क्या आपके इलाके में भी ऐसी समस्या है? अपनी राय हमें कमेंट में ज़रूर बताएं
    user_Mumbai Hindi news
    Mumbai Hindi news
    Local Politician मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    26 min ago
  • राज ठाकरे यांचा भाजपच्या ट्रोल टीमवर जोरदार हल्लाबोल | Raj Thackeray राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान भाजपच्या ट्रोल टीमवर जोरदार निशाणा साधला. "मोदीजी, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. ट्रोल टीमने जे पेरलं, तेच त्यांच्या अंगावर आलं." असे म्हणत त्यांनी सडेतोड टीका केली. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. 👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times ला Subscribe करा.
    1
    राज ठाकरे यांचा भाजपच्या ट्रोल टीमवर जोरदार हल्लाबोल | Raj Thackeray
राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान भाजपच्या ट्रोल टीमवर जोरदार निशाणा साधला.
"मोदीजी, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा. ट्रोल टीमने जे पेरलं, तेच त्यांच्या अंगावर आलं." असे म्हणत त्यांनी सडेतोड टीका केली.
या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times ला Subscribe करा.
    user_Police Vision Times
    Police Vision Times
    Journalist मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Raj Thakre Raj Thakre mantri
    1
    Raj Thakre
Raj Thakre mantri
    user_Mukesh Mukesh raj
    Mukesh Mukesh raj
    Mumbai, Maharashtra•
    2 hrs ago
  • अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पालघर जिल्ह्यातील मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची गुणवत्ता, दुरुस्तीची कामे आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार निरंजन डावखरे, आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये,जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किनी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यादरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोर–मासवण–पालघर, पालघर–सरावली–बोईसर तसेच बोईसर–चिंचणी–डहाणू या प्रमुख मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गांवरील रस्त्यांची अवस्था, सुरू असलेली विकासकामे आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यानंतर डहाणू येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्प, प्रलंबित कामे, पावसामुळे झालेली हानी, दुरुस्तीची प्रगती आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. पालघर जिल्ह्यातील रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
    4
    अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी
अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कडून रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी  पालघर जिल्ह्यातील  मार्गांची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची गुणवत्ता, दुरुस्तीची कामे आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार निरंजन डावखरे, आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये,जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किनी  तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यादरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोर–मासवण–पालघर, पालघर–सरावली–बोईसर तसेच बोईसर–चिंचणी–डहाणू या प्रमुख मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. 
या मार्गांवरील रस्त्यांची अवस्था, सुरू असलेली विकासकामे आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांचा त्यांनी आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यानंतर डहाणू येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक पार पडली. उपविभागीय अधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते विकास प्रकल्प, प्रलंबित कामे, पावसामुळे झालेली हानी, दुरुस्तीची प्रगती आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासकामांमध्ये गुणवत्ता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
पालघर जिल्ह्यातील रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वास यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
    user_आपले मानवाधिकार
    आपले मानवाधिकार
    Yoga instructor मुंबई, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुंब्रा का पहला सिग्नल शुरू! कौसा नाका पर डॉक्टर मुमताज शाह और यातायात विभाग मुंब्रा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल अहेर ने किया उद्घाटन NCP AP गुट के सभी नगरसेवक और पदाधिकारी और कार्यकर्ता के उपस्थिति में किया सत्कार मुंब्रा का पहला सिग्नल शुरू! कौसा नाका पर डॉक्टर मुमताज शाह और यातायात विभाग मुंब्रा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल अहेर ने किया उद्घाटन NCP AP गुट के सभी नगरसेवक और पदाधिकारी और कार्यकर्ता के उपस्थिति में किया सत्कार
    1
    मुंब्रा का पहला सिग्नल शुरू! कौसा नाका पर डॉक्टर मुमताज शाह और यातायात विभाग मुंब्रा के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल अहेर ने किया उद्घाटन NCP AP गुट के सभी नगरसेवक और पदाधिकारी और कार्यकर्ता के उपस्थिति में किया सत्कार

    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Aleem Inamdar
    1
    Post by Aleem Inamdar
    user_Aleem Inamdar
    Aleem Inamdar
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • रिज़वी कॉलेज ने शांतिपूर्ण छात्र हस्ताक्षर अभियान के माध्यम से लोकतांत्रिक अभिव्यक्ति की अनूठी मिसाल पेश की रिज़वी कॉलेज ने शांतिपूर्ण छात्र हस्ताक्षर अभियान के माध्यम से लोकतांत्रिक अभिव्यक्ति की अनूठी मिसाल पेश की मुंबई: देशभर में छात्र मुद्दों को लेकर बढ़ती भावनाओं के बीच रिज़वी कॉलेज ने एक अलग और जिम्मेदार पहल करते हुए छात्रों को कॉलेज परिसर के भीतर शांतिपूर्ण हस्ताक्षर अभियान और लिखित विरोध-पत्र के माध्यम से अपनी बात रखने का अवसर दिया। कॉलेज ने छात्रों की आवाज़ दबाने के बजाय उन्हें संविधानसम्मत, सुरक्षित और सम्मानजनक मंच उपलब्ध कराया, जहां वे अपनी चिंताओं को व्यक्त कर सकें और साथ ही उनकी सुरक्षा, गरिमा तथा शैक्षणिक वातावरण भी सुरक्षित रहे। संस्थान का मानना है कि लोकतंत्र और अनुशासन साथ-साथ चल सकते हैं तथा शिक्षण संस्थानों का दायित्व केवल ज्ञान देना ही नहीं, बल्कि छात्रों को नैतिकता और संवैधानिक जिम्मेदारी के साथ अपनी बात रखना भी सिखाना है। रिज़वी एजुकेशनल कॉम्प्लेक्स की निदेशक एडवोकेट रुबीना अख्तर हसन रिज़वी ने कहा, "मैं सम्मानजनक विरोध में विश्वास रखती हूं। गाली-गलौज, व्यक्तिगत आरोप या अपमानजनक भाषा न तो नैतिक है और न ही हमारे अल्पसंख्यक शिक्षण संस्थानों के मूल्यों के अनुरूप। सरकार की नीतियों से मतभेद हो सकते हैं और मुस्लिम समुदाय की भावनाएं भी कुछ मुद्दों पर आहत हो सकती हैं, लेकिन माननीय प्रधानमंत्री का व्यक्तिगत अपमान करना उचित नहीं है। असहमति भी गरिमा के साथ व्यक्त की जानी चाहिए।" उन्होंने कहा, "सड़क पर प्रदर्शन की इच्छा को शांतिपूर्ण दिशा देने के लिए मैंने छात्रों से संस्थान के भीतर ही विरोध-पत्र लिखवाया और उस पर हस्ताक्षर करवाए। एक वकील होने के नाते मेरी पहली जिम्मेदारी अपने संस्थान, शिक्षकों और छात्रों की सुरक्षा करना है। नेतृत्व का अर्थ अपने लोगों की रक्षा करते हुए उनकी आवाज़ को उचित मंच देना है।" उन्होंने आगे कहा, "हमने विरोध को रोका नहीं, बल्कि उसका तरीका बदला। हर छात्र को अपनी बात रखने का अधिकार है, लेकिन संस्थान की जिम्मेदारी है कि वह उन्हें यह भी सिखाए कि इस अधिकार का उपयोग सम्मान, अनुशासन और गरिमा के साथ कैसे किया जाए।" एडवोकेट रुबीना रिज़वी ने कहा कि उनके संस्थानों में नैतिकता और संस्कार सर्वोपरि हैं। "यदि कुछ छात्र कहीं और भी विरोध में शामिल हुए होंगे तो मुझे विश्वास है कि उन्होंने भी शांतिपूर्ण और मर्यादित तरीके से अपनी बात रखी होगी। हम अपने छात्रों को किसी का अपमान करना या आक्रामक होना नहीं सिखाते, बल्कि जिम्मेदार, सम्मानजनक और साहसी नागरिक बनना सिखाते हैं।" उन्होंने इस पहल को सफल बनाने में सहयोग देने वाले सभी प्राचार्यों, उप-प्राचार्यों, शिक्षकों, गैर-शिक्षकीय कर्मचारियों और रिज़वी परिवार के सभी सदस्यों का आभार व्यक्त किया। उन्होंने कहा, "मैं हमारे सभी प्राचार्यों, उप-प्राचार्यों, शिक्षकों, गैर-शिक्षकीय कर्मचारियों और रिज़वी परिवार के प्रत्येक सदस्य का हृदय से धन्यवाद करती हूं। आपके सहयोग से छात्रों को शांतिपूर्ण, नैतिक और लोकतांत्रिक वातावरण में अपनी बात रखने का अवसर मिला।" उन्होंने छात्रों की भी सराहना करते हुए कहा, "मुझे अपने छात्रों पर गर्व है कि उन्होंने यह साबित किया कि मजबूत विचार बिना नफरत के भी व्यक्त किए जा सकते हैं, असहमति बिना असम्मान के भी हो सकती है और लोकतंत्र अनुशासन एवं गरिमा से और मजबूत बनता है। उन्होंने दिखाया कि उकसावे से अधिक ताकत कलम में होती है।" रिज़वी कॉलेज प्रबंधन ने कहा कि शिक्षण संस्थानों की भूमिका जिम्मेदार नागरिक तैयार करने की है। यह पहल संवैधानिक मूल्यों, नैतिक नेतृत्व और शांतिपूर्ण लोकतांत्रिक भागीदारी को बढ़ावा देने के साथ-साथ छात्रों के हितों की रक्षा करने की प्रतिबद्धता को दर्शाती है।
    1
    रिज़वी कॉलेज ने शांतिपूर्ण छात्र हस्ताक्षर अभियान के माध्यम से लोकतांत्रिक अभिव्यक्ति की अनूठी मिसाल पेश की
रिज़वी कॉलेज ने शांतिपूर्ण छात्र हस्ताक्षर अभियान के माध्यम से लोकतांत्रिक अभिव्यक्ति की अनूठी मिसाल पेश की
मुंबई: देशभर में छात्र मुद्दों को लेकर बढ़ती भावनाओं के बीच रिज़वी कॉलेज ने एक अलग और जिम्मेदार पहल करते हुए छात्रों को कॉलेज परिसर के भीतर शांतिपूर्ण हस्ताक्षर अभियान और लिखित विरोध-पत्र के माध्यम से अपनी बात रखने का अवसर दिया।
कॉलेज ने छात्रों की आवाज़ दबाने के बजाय उन्हें संविधानसम्मत, सुरक्षित और सम्मानजनक मंच उपलब्ध कराया, जहां वे अपनी चिंताओं को व्यक्त कर सकें और साथ ही उनकी सुरक्षा, गरिमा तथा शैक्षणिक वातावरण भी सुरक्षित रहे।
संस्थान का मानना है कि लोकतंत्र और अनुशासन साथ-साथ चल सकते हैं तथा शिक्षण संस्थानों का दायित्व केवल ज्ञान देना ही नहीं, बल्कि छात्रों को नैतिकता और संवैधानिक जिम्मेदारी के साथ अपनी बात रखना भी सिखाना है।
रिज़वी एजुकेशनल कॉम्प्लेक्स की निदेशक एडवोकेट रुबीना अख्तर हसन रिज़वी ने कहा,
"मैं सम्मानजनक विरोध में विश्वास रखती हूं। गाली-गलौज, व्यक्तिगत आरोप या अपमानजनक भाषा न तो नैतिक है और न ही हमारे अल्पसंख्यक शिक्षण संस्थानों के मूल्यों के अनुरूप। सरकार की नीतियों से मतभेद हो सकते हैं और मुस्लिम समुदाय की भावनाएं भी कुछ मुद्दों पर आहत हो सकती हैं, लेकिन माननीय प्रधानमंत्री का व्यक्तिगत अपमान करना उचित नहीं है। असहमति भी गरिमा के साथ व्यक्त की जानी चाहिए।"
उन्होंने कहा,
"सड़क पर प्रदर्शन की इच्छा को शांतिपूर्ण दिशा देने के लिए मैंने छात्रों से संस्थान के भीतर ही विरोध-पत्र लिखवाया और उस पर हस्ताक्षर करवाए। एक वकील होने के नाते मेरी पहली जिम्मेदारी अपने संस्थान, शिक्षकों और छात्रों की सुरक्षा करना है। नेतृत्व का अर्थ अपने लोगों की रक्षा करते हुए उनकी आवाज़ को उचित मंच देना है।"
उन्होंने आगे कहा,
"हमने विरोध को रोका नहीं, बल्कि उसका तरीका बदला। हर छात्र को अपनी बात रखने का अधिकार है, लेकिन संस्थान की जिम्मेदारी है कि वह उन्हें यह भी सिखाए कि इस अधिकार का उपयोग सम्मान, अनुशासन और गरिमा के साथ कैसे किया जाए।"
एडवोकेट रुबीना रिज़वी ने कहा कि उनके संस्थानों में नैतिकता और संस्कार सर्वोपरि हैं।
"यदि कुछ छात्र कहीं और भी विरोध में शामिल हुए होंगे तो मुझे विश्वास है कि उन्होंने भी शांतिपूर्ण और मर्यादित तरीके से अपनी बात रखी होगी। हम अपने छात्रों को किसी का अपमान करना या आक्रामक होना नहीं सिखाते, बल्कि जिम्मेदार, सम्मानजनक और साहसी नागरिक बनना सिखाते हैं।"
उन्होंने इस पहल को सफल बनाने में सहयोग देने वाले सभी प्राचार्यों, उप-प्राचार्यों, शिक्षकों, गैर-शिक्षकीय कर्मचारियों और रिज़वी परिवार के सभी सदस्यों का आभार व्यक्त किया।
उन्होंने कहा,
"मैं हमारे सभी प्राचार्यों, उप-प्राचार्यों, शिक्षकों, गैर-शिक्षकीय कर्मचारियों और रिज़वी परिवार के प्रत्येक सदस्य का हृदय से धन्यवाद करती हूं। आपके सहयोग से छात्रों को शांतिपूर्ण, नैतिक और लोकतांत्रिक वातावरण में अपनी बात रखने का अवसर मिला।"
उन्होंने छात्रों की भी सराहना करते हुए कहा,
"मुझे अपने छात्रों पर गर्व है कि उन्होंने यह साबित किया कि मजबूत विचार बिना नफरत के भी व्यक्त किए जा सकते हैं, असहमति बिना असम्मान के भी हो सकती है और लोकतंत्र अनुशासन एवं गरिमा से और मजबूत बनता है। उन्होंने दिखाया कि उकसावे से अधिक ताकत कलम में होती है।"
रिज़वी कॉलेज प्रबंधन ने कहा कि शिक्षण संस्थानों की भूमिका जिम्मेदार नागरिक तैयार करने की है। यह पहल संवैधानिक मूल्यों, नैतिक नेतृत्व और शांतिपूर्ण लोकतांत्रिक भागीदारी को बढ़ावा देने के साथ-साथ छात्रों के हितों की रक्षा करने की प्रतिबद्धता को दर्शाती है।
    user_INDDIV
    INDDIV
    मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • चंद्रशेखर आज़ाद बोले – मुझे 15 मिनट की जगह सिर्फ 5 मिनट बोलने दिया गया! | संसद में हंगामा 🚨 लोकसभा की कार्यवाही के दौरान चंद्रशेखर आज़ाद ने आरोप लगाया कि उन्हें पूरा समय नहीं दिया गया। उन्होंने कहा कि 15 मिनट के बजाय उन्हें केवल कुछ मिनट ही बोलने का अवसर मिला। इस वीडियो में जानिए उनके बयान की मुख्य बातें और सदन में हुई चर्चा
    1
    चंद्रशेखर आज़ाद बोले – मुझे 15 मिनट की जगह सिर्फ 5 मिनट बोलने दिया गया! | संसद में हंगामा 🚨

लोकसभा की कार्यवाही के दौरान चंद्रशेखर आज़ाद ने आरोप लगाया कि उन्हें पूरा समय नहीं दिया गया। उन्होंने कहा कि 15 मिनट के बजाय उन्हें केवल कुछ मिनट ही बोलने का अवसर मिला। इस वीडियो में जानिए उनके बयान की मुख्य बातें और सदन में हुई चर्चा
    user_Qureshi Sakeel WJNP News
    Qureshi Sakeel WJNP News
    Media Consultant मुंबई, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.