logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अतिक्रमण हटवण्यामागचा उद्देश काय? – “काम केल्याचे दाखवणे की खरा विकास?”-गणेश वाळके.. परळी वैजनाथ प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे सध्या नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम जोरात सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे सर्वाधिक फटका छोट्या व्यापाऱ्यांना बसत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चहा टपऱ्या, रसवंतीगृहे, पान स्टॉल, वडापाव गाड्या अशा लहान व्यवसायांवर कारवाई होत असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. गणेश वाळके यांनी या कारवाईवर टीका करताना म्हटले की, “अतिक्रमण हटवण्यामागचा उद्देश नेमका काय? पदावर आहोत आणि काम करत आहोत हे दाखवण्यासाठीच ही मोहीम राबवली जात आहे का?” त्यांनी असा आरोपही केला की, काही ठिकाणी ओळखीच्या व्यक्तींवर कारवाई होत नाही, तर सर्वसामान्य लहान व्यावसायिकांवरच बुलडोजर चालवला जात आहे. ते पुढे म्हणाले की, “जर जनतेने तक्रार केली तर ‘अर्ज द्या, कारवाई करू’ असे सांगितले जाते. मग या सध्याच्या कारवाईसाठी कोणाचा अर्ज होता?” सध्या बेरोजगारीची परिस्थिती गंभीर असताना, जे थोडेफार व्यवसाय सुरू आहेत तेही बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी नमूद केले. परळी शहरात ट्रॅफिकची समस्या प्रामुख्याने मोंढा मार्केट परिसरातच आहे. इतर भागात गर्दी कमी असताना देखील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे, त्यामुळे ही मोहीम केवळ दिखाऊ असल्याचा आरोप होत आहे. गणेश वाळके यांनी प्रशासनाला आवाहन केले की, “खरा विकास करायचा असेल तर आधी ठोस विकास आराखडा जनतेसमोर मांडावा आणि त्यानंतरच कारवाई करावी. अन्यथा अशा पाडापाडीमुळे सामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढत जाईल.” या कारवाईमुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

2 hrs ago
user_परळी वार्ता
परळी वार्ता
Newspaper publisher परळी, बीड, महाराष्ट्र•
2 hrs ago
1fbee0aa-280f-4e4b-bc43-7f22abea9073

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गॅसवर स्वयंपाक का केला ? आशा किरकोळ वादातून आईसह दोन चिमुकल्यांची आत्महत्या.... लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे धक्कादायक घटना.... सासू-सुनेच्या वादाने घेतलं भीषण रूप.....
    1
    गॅसवर स्वयंपाक का केला ? आशा किरकोळ वादातून आईसह दोन चिमुकल्यांची आत्महत्या.... 
लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे धक्कादायक घटना.... सासू-सुनेच्या वादाने घेतलं भीषण रूप.....
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra MAX PARBHANI LIVE 1
    1
    LIVE “श्री. अशोकराव गोंगे यांच्या जयगुरुदेव ॲग्रो एजन्सीचा भव्य शुभारंभ समारंभ संपन्न.” #maxparbhani #parbhani #pathri #maharashtra  MAX PARBHANI LIVE 1
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे
    1
    लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    8 hrs ago
  • 17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.
    1
    17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर 
संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    9 hrs ago
  • नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    1
    नागरिकांनो उत्स्फूर्तपणे स्व-गणना करा - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    6 min ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    27 min ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 📍खळबळ जनक घटना लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ
    1
    📍खळबळ जनक घटना 
लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.