नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी! नांदेड दि. 29 एप्रिल:- नीट (युजी)-2026 प्रवेश परीक्षा काळात प्रतिबंधित वस्तूच्या वापरांवर प्रशासनाचे कडक लक्ष असून, इलेक्ट्रॉनिक, ब्लूटूथ वापर बंदी करण्यासाठी परीक्षार्थींची वैद्यकीय तपासणी होणार आहे. जर परीक्षा केंद्रावर प्रतिबंधीत करण्यात आलेल्या वस्तू परीक्षार्थीकडे आढळून आल्यास तो अनुचित साधनांचा वापर मानला जाईल. नियमानुसार व कायद्यानुसार संबंधित उमेदवाराविरुध्द कारवाई करण्यात येईल. याची नोंद सर्व परीक्षार्थीनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली मार्फत आयोजित नीट (युजी)-2026 प्रवेश परीक्षा नांदेड जिल्ह्यात 3 मे 2026 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. सदरील परीक्षेकरिता नांदेड जिल्ह्यात एकूण 46 केंद्र असून त्यापैकी नांदेड शहरात 24 परीक्षा केंद्रे तसेच ग्रामीण भागात 22 परीक्षा केंद्र अशी एकूण 46 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत.NEET UG-2026 प्रवेश परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी 3 मे 2026 रोजी परीक्षा केंद्रावर सकाळी ठीक 11 वाजता रिपोर्टींग करावे. स.11 ते 1.30 ही वेळ परिक्षार्थीची तपासणीची वेळ राहील. परीक्षा केंद्रावर परीक्षा कालावधीत परीक्षार्थी मार्फत कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब होऊ नये. जसे की, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा, ब्लूटूथचा वापर तसेच मनगटी डिजिटल घडयाळीचा वापर करण्याचे परीक्षार्थी यांनी कटाक्षाने टाळावे तसेच वरील बाबींना आळा घालण्यासाठी परीक्षार्थी यांची परीक्षा केंद्रावर वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत कान, नाक, घसा संबंधाने (ENT) तज्ञांकडून तपासणी केली जाणार आहे याची सर्व परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत नीट (युजी)-2026 प्रवेश परीक्षा केंद्रामध्ये खालील वस्तू घेऊन जाण्याची परवानगी असणार नाही. उदा. मजकूर साहित्य, मुद्रित किंवा लिखित कागदाचे तुकडे, भूमिती पेन्सिल, बॉक्स, प्लास्टिक पाऊच, कॅल्क्युलेटर, स्केल, लेखन पॅड, पेन ड्राईव्ह, कॅल्क्युलेटर लॉंग टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन स्कॅनर इत्यादी कोणतीही स्टेशनरी वस्तू उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर आणू नये. NEET (UG)-2026 प्रवेश परीक्षा केंद्रावर ड्रेस कोड संदर्भाने आयोगाने दिलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन परीक्षार्थी यांनी करावे. जसे की, वजनाने भारी असलेला पोशाख फुलबाहीचा शर्ट प्रतिबंधित असून सांस्कृतिक व पारंपारिक पोशाखास तपासणी संदर्भाने परीक्षेच्या दिवशी सकाळी 11.30 वा. च्या अगोदर परीक्षा केंद्रावरील यंत्रणेकडून तपासणी करून घ्यावी. तसेच परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना परीक्षार्थी यांनी ओळख पटविण्यासाठी आपला पूर्ण चेहरा दोन्ही कानांसह दिसेल याची योग्य ती काळजी घ्यावी. परीक्षार्थी यांनी परीक्षा केंद्रावर इतर वस्तू जसे की वॉलेट, गॉगल, हॅन्डबॅग, बेल्ट, कॅप, कोणतेही मनगटी घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा, कोणतेही दागिने, कोणतेही खादयपदार्थ खुल्या स्वरुपातील किंवा पॅकेजडं, पाणी बॉटल (पारदर्शक पाणी बॉटल वगळून) इ. कोणत्याही लपवून आणण्याजोग्या वस्तू मायक्रोचीप, कॅमेरा, ब्लूटूथ, इ. उपकरण संप्रेषण साधने इतर कोणतीही वस्तू जी अनुचित साधनांसाठी वापरली जाऊ शकते त्या सर्व वस्तू प्रतिबंधित करण्यात आलेल्या आहेत त्याची परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

- Post by Today One Live1
- नांदेड शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या विरोधात महानगरपालिका तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड शहरांमधील अतिक्रमण हटवण्याचे काम प्रगतीपथावर अवैद्यरीत्या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी तथा नागरिकांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर अतिक्रमण केलेल्या सर्व ठिकाणी अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडून काढण्यात आले, रस्त्यावर अवैद्यरित्या टपऱ्या व इतर दुकाने मांडून ठेवलेल्या त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई मध्ये जाण्यात आले, अतिक्रमण कराल तर कठोर कारवाई होईल अशा सज्जन इशारासह प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांना ठणकावून चांगले आहे, परंतु सरकारी जमिनीवर कब्जा करणाऱ्या विरोधात सुद्धा मोठ्या प्रमाणात कठोर कारवाई कधी करणार.? असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. शहरात अनेक टीका सरकारी जागेवर कब्जा करून बसणारे काही गुंड प्रवृत्तीचे प्रकार राजकीय पदाधिकारी व इतर समाजाचा ठेका देणारे लोक यांनी मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीवर कब्जा केलेला आहे. प्रताप सरकारी जमीन बिल्डरांच्या घशात घालून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये यांचा आर्थिक व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे. यांच्या विरोधात स्थानिक प्रशासन कारवाई करणार का हे सुद्धा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. ? स्थानिक प्रशासनाचे अर्धवट सोडलेले काम देखील सध्या चर्चेत आलेले असून रखडलेले रस्ते रखडलेले ड्रेनेजलाइन पाण्याच्या लाईन नाल्या ,अस्वच्छता, कचऱ्याने तुडुंब भरलेल्या नाल्या सुद्धा आतापर्यंत नालेसफाई करण्यात आलेली नाही मागील प्रशासकीय कार्यकाळात सुद्धा कुठल्याही प्रकारे नालेसफाई करण्यात आलेली नाही आजही तेच हाल असून नालेसफाई कधी करणार एखादा महापौर येण्याची वाट बघत आहे का प्रशासन असे देखील सवाल मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहे, 300 कोटी रुपयाच्या जवळपास वार्षिक खर्च करून देखील स्वच्छता ही होत नसताना देखील बघण्यास मिळत नाही. यावर प्रशासन लक्ष देईल का. सोमेश कॉलनी, कला मंदिर, एसपी ऑफिसच्या पाठचा रस्ता, कैकाडी गल्ली, गुजराती हायस्कूल परिसर, गोवर्धन घाट मधील परिसर, आता इतर ठिकाणी ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या वर आणि रस्ता खाली अशी अवस्था आज रस्त्याची झालेली आहे मग वाहनधारक वाहन चालवणार कशी.....? अशा प्रकारे बोगस निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कठोर दंडात्मक कारवाई होईल का शासन करणार का असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे. अवैधरित्या जड वाहतूक शहरी भागामध्ये बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करून फिरत आहे. या हायवा टिप्पर गाड्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. या निरापराधाच्या नुकसान भरपाई शासन कधी करणार. आणि जड वाहतूक बंद असताना वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई कधी करणार. याकडे नांदेडकरांचे लक्ष आहे.! अनेक समस्यांना वाचा फोडणारा युवा राज्य न्यूज चैनल. वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाज म्हणून उभा आहे4
- कछरा का दिकत1
- लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ माहा आंदोलन आझाद मैदान मुंबई4
- जळकोट1
- टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत प्रियंका मुंडे सरपंचपदी विजयी; 132 मतांनी दणदणीत विजय, गावात जल्लोष1
- Post by नागनाथ ससाने1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २९ एप्रिल नांदेड: इतिहासाचा वारसा जपणारा नांदेड येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सध्या प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिक लोकांच्या अतिक्रमणामुळे शेवटच्या घटका मोजत आहे. पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे या ऐतिहासिक वास्तूकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने, हा किल्ला आता केवळ अस्वच्छता आणि अवैध प्रकारांचा अड्डा बनला असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गटारगंगेच्या विळख्यात किल्ला पाण्याच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होते. मात्र, आता परिस्थिती उलट झाली आहे. स्थानिक रहिवाशांनी किल्ल्याच्या भोवतालच्या परिसरात चक्क गटारीचे आणि नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला धोका निर्माण झाला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेचा अभाव आणि साचलेले सांडपाणी यामुळे ऐतिहासिक वास्तूची विटंबना होत आहे. अवैध कब्जे आणि सुरक्षेचा अभाव किल्ल्याच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या ताबा मिळवण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे दिसून येत आहे. किल्ल्यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे या ठिकाणी 'तवाळगिरी' करणाऱ्या युवकांचा वावर वाढला असून, पर्यटकांना दमदाटी करणे आणि त्यांच्याशी उद्धटपणे बोलण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. कर्मचाऱ्यांची मनमानी आणि माहिती फलकांची दुरवस्था मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू आहे. ऐतिहासिक वस्तूंची जोपासना करण्याऐवजी त्यांची विटंबना केली जात आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. संवर्धनाची गरज: प्रशासन कधी जागे होणार? नांदेडच्या वैभवात भर टाकणारा हा भुईकोट किल्ला आता पूर्णपणे ढासळण्याच्या स्थितीत आहे. पुरातत्व विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन अवैध बांधकामे हटवावीत आणि किल्ल्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी इतिहासप्रेमींकडून केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पुरातत्व विभाग या सर्व प्रकारावर काय भूमिका घेणार आणि या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वेळीच पावले उचलली नाहीत, तर नांदेडचा हा ऐतिहासिक वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.3