नवेगाव व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांची पाठ.. वाघोबा दिसेना.. वाघोबा दिसेना! नवेगाव व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांची पाठ ब्रँड अँबेसिडर नेमण्याची मागणी : विविध उपक्रम कोहमारा नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाकडे पर्यटकांना आकर्षित करून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, येथील जलाशयात नौकाविहाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्याच धर्तीवर नवेगाव व्याघ्र प्रकल्पातसुद्धा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्यासाठी एखादा मास्टर प्लॅन तयार करून प्रसंगी ब्रँड अँबेसिडर नेमावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील निसर्गाच्या सान्निध्यात असलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान घोषित झाल्यानंतर सडक मार्गाबरोबरच रेल्वे मार्गाची सुविधा असल्याने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटक येत होते. अरण्य ऋषी म्हणून परिचित असलेले मारुती चितमपल्ली या ठिकाणी वन अधिकारी म्हणून रुजू झाले व त्यांच्या सोबतीला निसर्ग मित्र म्हणून परिचित असलेले येथील माधव पाटील डोंगरवार यांनी मिळून 'सोने पे सुहागा' करीत या भागात आढळणाऱ्या विविध वन्यजीव, फुलपाखरे, फुलझाडे, पक्षी, झाडे यांच्या नोंदी घेऊन व अभ्यास करून त्यांची जगाला ओळख करून दिली. 'रोजनिषीतील एक दिवस' हा धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याने सर्वसामान्य पर्यटकांबरोबरच शैक्षणिक सहलीचे लोंढेचे लोंढे या भागात येत होते. बंदिस्त वन्यप्राणी हे येथील मुख्य आकर्षण हल्ली ते आता नाही. कालांतराने अवकळा आली व पर्यटकांची संख्या रोडावली. आता नवेगावबांधला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येथील सामाजिक सेलिब्रिटी येणे गरजेचे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजिवांबरोबरच वाघोबाचा मुक्त संचार पाहण्यासाठी सेलिब्रिटी, राजकारणी, चित्रपट तारेतारका, आंतरराष्ट्रीय खेळाडू भेट देतात व त्यांचे नाव ऐकून इतर पर्यटकही त्याठिकाणी भेट देतात. कान्हा व्याघ्र प्रकल्पाची तीच स्थिती असून, नागझिरा अभयारण्यातही पर्यटक बऱ्यापैकी भेट देतात. त्यामानाने नवेगाव व्याघ्र प्रकल्पात मात्र पर्यटक भेट देताना दिसून येत नाही. या प्रकल्पात भ्रमंती करण्यासाठी एकूण चार गेट असून, ऑनलाइनसह ऑफलाइन बुकिंगची सुविधाही उपलब्ध आहे. वन कर्मचाऱ्यांबरोबरच गाईड व जिप्सी गेटवर उपस्थित असतात. कार्यकर्ते, निसर्गमित्र मंडळ, पर्यटनप्रेमींनी पुढाकार घेत स्थानिक आमदार-खासदारांकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाच्या वतीने मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी एमटीडीसी रिसॉर्ट जलाशयात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पर्यटकांची संख्या नक्की वाढेल असा आशावाद व्यक्त व्यापक प्रसिद्धीची गरज पर्यटकांची पहिली पसंत ही मुक्त संचार करणारा वाघोबा पाहण्याची असते. मात्र, व्याघ्र प्रकल्पाच्या नावाप्रमाणे वाघ दिसत नसल्याने पर्यटक निराशा व्यक्त करीत आहेत. नवेगाव व्याघ्र प्रकल्पात मागील दोन-तीन वर्षांपासून जंगली हत्तीची एंट्री झाल्याने व हा परिसर त्यांना भावल्याने काही काळ ते येथे तळ ठोकून असतात. त्यातून पर्यटकांना आकर्षित करता येईल का त्याचीही चाचपणी वन विभागाने करावी. सोबतच सेलिब्रिटींना पाहुणे म्हणून बोलावून किंवा ब्रँड अँबेसिडर नेमून व्यापक प्रसिद्धी करावी. सोबतच वन व वन्य जिवांचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्याघ्र प्रकल्पात विविध उपक्रम राबवावे, जेणेकरून पर्यटक आकर्षित होतील व पर्यटनातून रोजगार निर्माण होईल अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. केला जात आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यानाबरोबरच आता नवेगाव वन्यजीव अभयारण्य जोडून नव्याने नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला आहे. कान्हा, ताडोबा या प्रकल्पांना जोडणारा दुवा म्हणून या व्याघ्र प्रकल्पाकडे पाहिले जाते.
नवेगाव व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांची पाठ.. वाघोबा दिसेना.. वाघोबा दिसेना! नवेगाव व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांची पाठ ब्रँड अँबेसिडर नेमण्याची मागणी : विविध उपक्रम कोहमारा नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाकडे पर्यटकांना आकर्षित करून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, येथील जलाशयात नौकाविहाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्याच धर्तीवर नवेगाव व्याघ्र प्रकल्पातसुद्धा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्यासाठी एखादा मास्टर प्लॅन तयार करून प्रसंगी ब्रँड अँबेसिडर नेमावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील निसर्गाच्या सान्निध्यात असलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान घोषित झाल्यानंतर सडक मार्गाबरोबरच रेल्वे मार्गाची सुविधा असल्याने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटक येत होते. अरण्य ऋषी म्हणून परिचित असलेले मारुती चितमपल्ली या ठिकाणी वन अधिकारी म्हणून
रुजू झाले व त्यांच्या सोबतीला निसर्ग मित्र म्हणून परिचित असलेले येथील माधव पाटील डोंगरवार यांनी मिळून 'सोने पे सुहागा' करीत या भागात आढळणाऱ्या विविध वन्यजीव, फुलपाखरे, फुलझाडे, पक्षी, झाडे यांच्या नोंदी घेऊन व अभ्यास करून त्यांची जगाला ओळख करून दिली. 'रोजनिषीतील एक दिवस' हा धडा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याने सर्वसामान्य पर्यटकांबरोबरच शैक्षणिक सहलीचे लोंढेचे लोंढे या भागात येत होते. बंदिस्त वन्यप्राणी हे येथील मुख्य आकर्षण हल्ली ते आता नाही. कालांतराने अवकळा आली व पर्यटकांची संख्या रोडावली. आता नवेगावबांधला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येथील सामाजिक सेलिब्रिटी येणे गरजेचे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजिवांबरोबरच वाघोबाचा मुक्त संचार पाहण्यासाठी सेलिब्रिटी, राजकारणी, चित्रपट तारेतारका, आंतरराष्ट्रीय खेळाडू भेट देतात व त्यांचे नाव ऐकून इतर पर्यटकही
त्याठिकाणी भेट देतात. कान्हा व्याघ्र प्रकल्पाची तीच स्थिती असून, नागझिरा अभयारण्यातही पर्यटक बऱ्यापैकी भेट देतात. त्यामानाने नवेगाव व्याघ्र प्रकल्पात मात्र पर्यटक भेट देताना दिसून येत नाही. या प्रकल्पात भ्रमंती करण्यासाठी एकूण चार गेट असून, ऑनलाइनसह ऑफलाइन बुकिंगची सुविधाही उपलब्ध आहे. वन कर्मचाऱ्यांबरोबरच गाईड व जिप्सी गेटवर उपस्थित असतात. कार्यकर्ते, निसर्गमित्र मंडळ, पर्यटनप्रेमींनी पुढाकार घेत स्थानिक आमदार-खासदारांकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाच्या वतीने मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी एमटीडीसी रिसॉर्ट जलाशयात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने पर्यटकांची संख्या नक्की वाढेल असा आशावाद व्यक्त व्यापक प्रसिद्धीची गरज पर्यटकांची पहिली पसंत ही मुक्त संचार करणारा वाघोबा पाहण्याची असते. मात्र, व्याघ्र प्रकल्पाच्या नावाप्रमाणे वाघ दिसत नसल्याने पर्यटक निराशा
व्यक्त करीत आहेत. नवेगाव व्याघ्र प्रकल्पात मागील दोन-तीन वर्षांपासून जंगली हत्तीची एंट्री झाल्याने व हा परिसर त्यांना भावल्याने काही काळ ते येथे तळ ठोकून असतात. त्यातून पर्यटकांना आकर्षित करता येईल का त्याचीही चाचपणी वन विभागाने करावी. सोबतच सेलिब्रिटींना पाहुणे म्हणून बोलावून किंवा ब्रँड अँबेसिडर नेमून व्यापक प्रसिद्धी करावी. सोबतच वन व वन्य जिवांचे महत्त्व पटवून देण्यासाठी व्याघ्र प्रकल्पात विविध उपक्रम राबवावे, जेणेकरून पर्यटक आकर्षित होतील व पर्यटनातून रोजगार निर्माण होईल अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. केला जात आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यानाबरोबरच आता नवेगाव वन्यजीव अभयारण्य जोडून नव्याने नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला आहे. कान्हा, ताडोबा या प्रकल्पांना जोडणारा दुवा म्हणून या व्याघ्र प्रकल्पाकडे पाहिले जाते.
- डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.1
- Post by मनिषा विजय काशीवार1
- हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.2
- Post by Dinesh kambli3
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- Post by कु सुषमा डबराल1
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1