*ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या तक्रारी व निवेदनांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करा* अहिल्यानगर प्रतिनिधी : ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणारी निवेदने, तक्रारी, अर्ज व विविध प्रशासकीय मागण्यांवर तातडीने आणि विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. *ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या तक्रारी व निवेदनांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करा* अहिल्यानगर प्रतिनिधी : ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणारी निवेदने, तक्रारी, अर्ज व विविध प्रशासकीय मागण्यांवर तातडीने आणि विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 03 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्राद्वारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील विलंबाबाबत गंभीर दखल घेतली आहे. नागपूर खंडपीठातील रिट याचिका क्र. 5669/2026, श्री. प्रविण केशव रणदिवे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणातील दि. 27 जुलै 2026 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने संबंधित निवेदने व तक्रारींवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 11 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील कलम 10(1) नुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने सोपविलेले काम तत्परतेने व शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे अपेक्षित आहे. सामान्यतः कोणतीही फाईल सात कामकाजाच्या दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींकडे प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या अर्जांची नोंद, प्राप्तीची तारीख, संबंधित प्रकरणाची सद्यस्थिती आणि केलेली कार्यवाही याबाबत पारदर्शक नोंद ठेवणे आवश्यक आहे. विनाकारण विलंब झाल्यास संबंधित जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कार्यवाही करावी. अहिल्यानगर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये शासनाच्या या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रलंबित अर्ज व तक्रारींचा विशेष आढावा घेऊन नागरिकांना कार्यवाहीची माहिती व आवश्यक असल्यास लेखी उत्तर देण्यात यावे, अशी मागणी दिपक पाचपुते, जिल्हाध्यक्ष – ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूह, अहिल्यानगर यांनी केली आहे. नागरिकांच्या अर्जांवर वेळेत निर्णय होणे हा सुशासनाचा महत्त्वाचा भाग असून, ग्रामपंचायत स्तरावर त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने नियमित देखरेख करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे
*ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या तक्रारी व निवेदनांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करा* अहिल्यानगर प्रतिनिधी : ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणारी निवेदने, तक्रारी, अर्ज व विविध प्रशासकीय मागण्यांवर तातडीने आणि विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. *ग्रामपंचायतीतील नागरिकांच्या तक्रारी व निवेदनांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करा* अहिल्यानगर प्रतिनिधी : ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणारी निवेदने, तक्रारी, अर्ज व विविध प्रशासकीय मागण्यांवर तातडीने आणि विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 03 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्राद्वारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील विलंबाबाबत गंभीर दखल घेतली आहे. नागपूर खंडपीठातील रिट याचिका क्र. 5669/2026, श्री. प्रविण केशव रणदिवे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणातील दि. 27 जुलै 2026 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने संबंधित निवेदने व तक्रारींवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 11 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील कलम 10(1) नुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने सोपविलेले काम तत्परतेने व शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे अपेक्षित आहे. सामान्यतः कोणतीही फाईल सात कामकाजाच्या दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींकडे प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या अर्जांची नोंद, प्राप्तीची तारीख, संबंधित प्रकरणाची सद्यस्थिती आणि केलेली कार्यवाही याबाबत पारदर्शक नोंद ठेवणे आवश्यक आहे. विनाकारण विलंब झाल्यास संबंधित जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कार्यवाही करावी. अहिल्यानगर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये शासनाच्या या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रलंबित अर्ज व तक्रारींचा विशेष आढावा घेऊन नागरिकांना कार्यवाहीची माहिती व आवश्यक असल्यास लेखी उत्तर देण्यात यावे, अशी मागणी दिपक पाचपुते, जिल्हाध्यक्ष – ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरी समूह, अहिल्यानगर यांनी केली आहे. नागरिकांच्या अर्जांवर वेळेत निर्णय होणे हा सुशासनाचा महत्त्वाचा भाग असून, ग्रामपंचायत स्तरावर त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने नियमित देखरेख करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे
- 🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन! मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार! निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 📍 निफाड नगरपंचायत 🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन! मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार! निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 📍 निफाड नगरपंचायत1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक4
- Post by सोनू पटेल4
- पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.1
- *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते. चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली. भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते. ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.1
- देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा तालिबान करायचा ठरवले आहे का? सुप्रसिद्ध अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांना पुण्यात गावगुंडांकडून रोखले जाते, धमकावले जाते आणि लुटण्याचा प्रयत्न केला जातो. ही घटना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कायदा-सुव्यवस्थेवरील अपयशाचे उदाहरण आहे. अभिनेत्री असलेली महिला आज महाराष्ट्रात सुरक्षित नसेल, तर सर्वसामान्य महिला कशी सुरक्षित असेल? हा तार्किक प्रश्न निर्माण होतो. पुणे शहर आणि परिसरात दररोज किमान एक तरी अशी घटना घडते, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. फडणवीस स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी जितका प्रयत्न करतात, तितकाच प्रयत्न नागरिकांच्या सुरक्षेसाठी का करत नाहीत? हा सर्वसामान्य पुणेकरांचा आणि एकूणच महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने काँग्रेस पक्षाचा सवाल आहे. फडणवीस, तुम्हाला जमत असेल तर खुर्ची खाली करा आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्या!1
- पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी महापौरांचे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; स्काडा महिनाअखेर, बारा बंगला केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार वादंग झाला. सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कृत्रिम पाणीटंचाईचा ठपका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीसह कारवाईची मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपलाही सभागृहात घरचा आहेर मिळाला. भूषण राणे यांनी पवननगरचा पाणीपुरवठा कोणाच्या तरी दबावाखाली वळविला जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बडगुजर यांनी पाणी वितरण व्यवस्था आणि पंपिंग यंत्रणेतील दोषांमुळेच पाणीप्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला. यावेळी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याचा मुद्दा उपस्थित केला. पाणीपुरवठा व्यवस्थेतील 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महासभेत पाचारण केले. 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे, तर बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले. पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत आयुक्तांनी व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, चर्चेनंतर महापौरांनीही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, तसेच व्हॉल्व्हमनच्या विभागनिहाय तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ठोस नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही महापौरांनी प्रशासनाला बजावले. चौकट : आदेशांची वेळमर्यादा व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कार्यकारी व कनिष्ठ अभियंत्यांवर महासभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त आणि महापौरांनी अधिकाऱ्यांना वेळमर्यादा देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नाशिककरांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.1
- डेहनोली गावात गणेशोत्सवात साकारला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहनोलीचा देखावा "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, येथल्या मनामनात नांदते मराठी"...... या उक्तीप्रमाणे मराठी भाषेचा महिमा आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र सध्याच्या काळात ही मराठी भाषा जी आपली मातृभाषा आहे ती मराठी आणि जिच्यामुळे आमच्या ओठावर मराठी भाषा रेंगाळायला लागली ती मराठी शाळा वाचविणे आज काळाची गरज आहे. महाराष्ट्राची मराठमोळी संस्कृती, मराठी भाषा, मराठी परंपरा टिकविण्याचा सुंदर प्रयत्न ठाणे जिल्ह्यातील सह्याद्री डोंगराच्या खाली असलेल्या मुरबाड तालुक्यातील डेहनोली गावात सध्या गणेशोत्सवाच्या काळात पाहायला मिळत आहे. मराठी शिकूया, मराठी जगूया, मराठी जपूया या ब्रीदवाक्याखाली प्रत्येक गावपाड्याचं प्राण असलेली सुंदर- सुबक -आकर्षक अशी मराठी शाळा गणपती बाप्पाच्या आसनाला वेध घेत साकारली आहे. डेहनोली गावातील लक्ष्मण दगडू आगिवले यांच्या निवासस्थानी २९ व्या वर्षाचा घरगुती गणेशोत्सव साजरा करत असताना 'मराठी शाळा वाचवा',मराठी आपली अस्मिता या धर्तीखाली हा सुंदर देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्यामध्ये इयत्ता १ ली ते ७ वी चे जुने वर्ग, वर्गात बसलेली मुले, क्रीडांगण, जुने पारंपरिक खेळ खेळताना रमलेले विद्यार्थी, मराठी शाळेला शितल गारवा देणारे मोठे झाड, समोर साकारलेलं डेहनोली नावाचे कौलारू घरांचे सुंदर गाव, पथदिवे, शाळेत जाणारी मुले, घराकडे जाणारी मुले, झोपाळा, घसरगुंडी, कोयबा खेळ, टबू असे जुने खेळ खेळणारे विद्यार्थी, गावातला गोठा, गोठ्यातल्या म्हैसी, हंबरणाऱ्या गायी म्हैसी,आजूबाजूला हिरवीगार झाडे- झुडपे अशी सुंदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहनोलीचा देखावा या गावात बघायला मिळतो. मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार भरत दळवी यांनी या गणेशोत्सवाला भेट देऊन या सजावटीचे कौतुक केले आणि सजावटकारांचा सत्कारही केला. या गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते दिगंबर आगिवले यांच्या संकल्पनेखाली हा सुंदर प्रबोधनात्मक देखावा तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचं राज्य आहे. त्यामुळे इंग्रजी शिकताना मराठी भाषेला विसरू नका, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, जगल्या पाहिजेत हा मोलाचा संदेश या देखाव्यातून मिळतो. या देखाव्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वैभव आगिवले, यज्ञा अगिवले , नमन आगिवले यांनी तब्बल आठवडाभर मेहनत घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेहनोली, मराठी शाळा टिकवा -वाचवा हा देखावा तयार केला आहे. एकदा या देखाव्याला आपण नक्कीच भेट द्यावी. या देखाव्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला digambaragivale music या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल.1