Shuru
Apke Nagar Ki App…
सोनू पटेल
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by सोनू पटेल4
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांचा पायी रूट मार्च १२ अधिकारी व २४० पोलीस जवानांचा सहभाग; नागरिकांना शांतता व सुव्यवस्थेचे आवाहन श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा, या उद्देशाने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६.१५ वाजेदरम्यान भव्य पायी रूट मार्च काढण्यात आला. एसीपी अंबड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रूट मार्चची सुरुवात अंबड पोलीस ठाण्यापासून झाली. देवांग सर्कल, पेलिकन पार्क, मोरवाडी गाव चौक, , उत्तमनगर बस स्टॉप, पवननगर, रायगड चौक, सावतानगर बस स्टॉप, दिव्या अँडलॅब, शिवनेरी फार्मा, त्रिमूर्ती चौक, पेठे हायस्कूल मार्गे पाटीलनगर उद्यान येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली. या रूट मार्चमध्ये अंबड पोलीस ठाण्याचे ११ पोलीस अधिकारी व ५३ पोलीस अंमलदार, ५३ होमगार्ड, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६, धुळे बी कंपनीचे १ अधिकारी व १९ जवान, तसेच रॅपिड ॲक्शन फोर्सचे ११८ जवान, अशा एकूण १२ अधिकारी व २४० जवानांनी सहभाग घेतला. रूट मार्चदरम्यान पी ए सिस्टीम द्वारे नागरिकांना गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या. पोलिसांच्या या रूट मार्चमुळे परिसरात सुरक्षिततेचा संदेश पोहोचला असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे चित्र दिसून आले. हा पायी रूट मार्च शांततेत व सुरळीतपणे पार पडला.4
- सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके1
- NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.. NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..1
- निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक4
- लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरू झालेला वैशाखरे येथील 'घरत' घराण्याचा गणेशोत्सव; १२० व्या वर्षात पदार्पण! माळशेज घाटाच्या निसर्गरम्य पायथ्याशी वसलेल्या वैशाखरे (ता. मुरबाड) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रतिष्ठित 'घरत' कुटुंबाच्या गणेशोत्सवाने यंदा १२० व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे. हा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचालीकडे झुकणारा गणेशोत्सव घरत कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला. या उत्सवाचे औचित्य साधून नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्यास असलेले सर्व बंधू-भगिनी आणि आप्तेष्ट एकत्र आले होते. सकाळी ठीक १० वाजता वेदोक्त मंत्रोच्चारात आणि पारंपरिक विधींनुसार गणरायाची यथोचित पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती करून मनमोहक सजावट व आकर्षक रोषणाईच्या झगमगाटात विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९०६ सालापासूनचा समृद्ध वारसा घरत कुटुंबाच्या या गणेशोत्सवाचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. इसवी सन १९०६ मध्ये, स्वातंत्र्यलढ्याच्या काळात घरत कुटुंबातील पहिले कायदेपंडित (वकील) आणि तत्कालीन कुटुंबप्रमुख धर्माजी लक्ष्मण घरत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रप्रेमी विचारांतून आणि प्रेरणेतून या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती. धर्माजी लक्ष्मण घरत यांनी सुरू केलेली ही अखंड भक्तीची आणि समाजप्रबोधनाची परंपरा त्यांच्या पुढील पिढ्यांनी अत्यंत निष्ठेने जपली आहे. १९०६ ते २०२६ अशा तब्बल १२० वर्षांचा प्रदीर्घ आणि अविरत कालावधी पूर्ण करणाऱ्या या गणेशोत्सवामुळे केवळ घरत कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण वैशाखरे पंचक्रोशीत भक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- आयएसपी-सीएनपी वेल्फेअर फंड कमिटीतर्फे गणरायाची स्थापना नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) व करन्सी नोट प्रेस (सीएनपी) वेल्फेअर फंड कमिटीतर्फे ७२ वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या प्रति पंढरपूर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेशमूर्तीची स्थापना मंडळाचे अध्यक्ष मंगेश कासवेकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेंद्र टाकेकर, रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, खजिनदार अशोक पेखळे यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सीएनपीचे जॉइंट सेक्रेटरी आप्पाची बी. जगताप, लायब्ररी व स्पोर्ट्स सेक्रेटरी श्रीपाद एस. काजळे, लायब्ररी सेक्रेटरी मुरलीधर बी. जगताप, तालीम सेक्रेटरी मच्छिंद्र डी. जाधव, सदस्य अशोक टी. अहिरे, संतोष शिरसाट, यू. जी. पाटील, सुरेश आव्हाड व खजिनदार विन्सेंट ओहल यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन जनरल सेक्रेटरी अण्णाजी सोनवणे व करमणूक सेक्रेटरी सुधीर पगारे यांनी केले.4