Shuru
Apke Nagar Ki App…
सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
Raj Kumar
सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
More news from महाराष्ट्र and nearby areas
- गणेशोत्सवात जाधव संकुलातील नागरिकांच्या नशिबी गढूळ पाणी! “दोन दिवसांत प्रश्न सोडवा, अन्यथा अधिकाऱ्यांना हेच पाणी पाजन्याचा इशारा एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण सुरू असताना, प्रभाग क्रमांक १० मधील जाधव संकुलातील नागरिकांना मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. नळातून गढूळ तसेच उग्र वासाचे पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, प्रभाग सभापतींच्याच प्रभागात नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जाधव संकुल परिसरातील नळांना गढूळ आणि उग्र वासाचे पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवाच्या काळातच नागरिकांच्या घरात शुद्ध पाण्याऐवजी गढूळ पाणी पोहोचत असल्याने महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला. “दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर हेच गढूळ मिश्रित पाणी अधिकाऱ्यांना पाजू आणि याच पाण्याने त्यांना अंघोळ घालू,” असा संतप्त इशारा महिलांनी दिल्याने प्रशासनासमोर आता पाणीप्रश्न सोडविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, परिसरातील काही नागरिक तसेच चिमुकल्यांना उलटी-जुलाबाचा त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मथुराई सोसायटीतील माधुरी जाधव (२६), रिद्धी कुश्वाह (५), स्वप्नील निकम (१५), साई गांगुर्डे (६), प्रतीक्षा पाटील (५) यांना उलटी-जुलाबाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच सविता आमजिरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, या आरोग्याच्या तक्रारींचे कारण दूषित पाणीच आहे, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाने पाण्याचे नमुने तातडीने तपासून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. सोसायटीतील ड्रेनेजचे चेंबर कोरडे असल्याचे दिसून येत असले तरी, ड्रेनेजचे दूषित पाणी पिण्याच्या जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन खोदून पाहणे पुरेसे नसून, परिसरातील ड्रेनेज चेंबर, जलवाहिनी आणि त्यांचे परस्पर कनेक्शन यांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. “गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक नसणे ही मोठी शोकांतिका आहे,” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी शोभा जाधव, मंगला चव्हाण, सुनीला कुश्वाह, योगिता निकम, उमरवती पंडित, उर्मिला सोळंकी, कल्याणी गांगुर्डे, सुवर्णा पगार, सुमन हांडे, पद्मावती आव्हाड, सुलोचना पोटे, सुनीता पाटील, योगिता गिरासे यांच्यासह महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या उत्सवात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासन न देता तातडीने जलवाहिनी व ड्रेनेजची तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.4
- सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके1
- NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.. NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..1
- निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक4
- Post by सोनू पटेल4
- नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांचा पायी रूट मार्च १२ अधिकारी व २४० पोलीस जवानांचा सहभाग; नागरिकांना शांतता व सुव्यवस्थेचे आवाहन श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत, उत्साहात आणि सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा, या उद्देशाने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ६.१५ वाजेदरम्यान भव्य पायी रूट मार्च काढण्यात आला. एसीपी अंबड विभाग सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रूट मार्चची सुरुवात अंबड पोलीस ठाण्यापासून झाली. देवांग सर्कल, पेलिकन पार्क, मोरवाडी गाव चौक, , उत्तमनगर बस स्टॉप, पवननगर, रायगड चौक, सावतानगर बस स्टॉप, दिव्या अँडलॅब, शिवनेरी फार्मा, त्रिमूर्ती चौक, पेठे हायस्कूल मार्गे पाटीलनगर उद्यान येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली. या रूट मार्चमध्ये अंबड पोलीस ठाण्याचे ११ पोलीस अधिकारी व ५३ पोलीस अंमलदार, ५३ होमगार्ड, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६, धुळे बी कंपनीचे १ अधिकारी व १९ जवान, तसेच रॅपिड ॲक्शन फोर्सचे ११८ जवान, अशा एकूण १२ अधिकारी व २४० जवानांनी सहभाग घेतला. रूट मार्चदरम्यान पी ए सिस्टीम द्वारे नागरिकांना गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या. पोलिसांच्या या रूट मार्चमुळे परिसरात सुरक्षिततेचा संदेश पोहोचला असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे चित्र दिसून आले. हा पायी रूट मार्च शांततेत व सुरळीतपणे पार पडला.4