logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.

5 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
5 hrs ago

निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन! मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार! निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 📍 निफाड नगरपंचायत 🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन! मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार! निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला. हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे. यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. 📍 निफाड नगरपंचायत
    1
    🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन!
मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार!
निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला.
हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे.
यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
📍 निफाड नगरपंचायत


🚨 निफाड नगरपंचायतीत अनोखे आंदोलन!
मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडले; टेबलला नोटांचा हार!
निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडून त्यांच्या टेबलला नोटांचा हार घालण्यात आला.
हे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम दादा रंधवे यांनी केल्याचे समोर आले आहे.
यावेळी नगरसेविका रूपाली रंधवे, सुनील पाठक, बिरजू पठाण, रतन गाजरे तसेच युवा काँग्रेसचे सचिन खडताळे उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून नगरपंचायतीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
📍 निफाड नगरपंचायत
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! अचानक भेटीत आढळलेल्या त्रुटींवर आता कारवाई होणार का? सुरगाणा तालुक्यातील पालकांचे लक्ष सुरगाणा तालुक्यातील माणी येथील सेंट्रल किचनला आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भोजनाची तपासणी करताना पोळी कच्ची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मंत्री उइके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यानच पोळी कच्ची आढळल्याने भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंत्री उइके यांच्या अचानक पाहणीमुळे सेंट्रल किचनमधील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. मंत्री स्वतः नाराज झाले असताना संबंधित सेंट्रल किचनवर ठोस कारवाई होणार का, की केवळ सूचना देऊन प्रकरण मिटणार? असा सवाल सुरगाणा तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने पाहणीतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    1
    माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले!
माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले!
अचानक भेटीत आढळलेल्या त्रुटींवर आता कारवाई होणार का? सुरगाणा तालुक्यातील पालकांचे लक्ष
सुरगाणा तालुक्यातील माणी येथील सेंट्रल किचनला आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भोजनाची तपासणी करताना पोळी कच्ची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मंत्री उइके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यानच पोळी कच्ची आढळल्याने भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंत्री उइके यांच्या अचानक पाहणीमुळे सेंट्रल किचनमधील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
मंत्री स्वतः नाराज झाले असताना संबंधित सेंट्रल किचनवर ठोस कारवाई होणार का, की केवळ सूचना देऊन प्रकरण मिटणार? असा सवाल सुरगाणा तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने पाहणीतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* ​ अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ​ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते. ​चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. ​ शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली. ​ भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते. ​ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.
    1
    *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* 
​
अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
​ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते.
​चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
​ शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली.
​ भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते.
​ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • दुचाकी चोरीप्रकरणी संशयीतास अटक; चांदवड येथील पोलिसांच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे दुचाकी चोरीचा तपास तळेगावरोही (ता. चांदवड) येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात चांदवड पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीतास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील रहिवासी फिर्यादी पंकज गोरखनाथ भोकनळ यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस हवालदार राजू गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश हटकर, शिवनाथ शेळके, प्रदिप आजगे, विक्रम बस्ते व भूषण साळवे यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत अत्यंत कौशल्याने तपास केला. या प्रकरणी पोलिसांना संशयित केदु शरद केदारे (रा. तळेगावरोही, ता. चांदवड) अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. संशयीतास बुधवारी (दि. १६) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
    1
    दुचाकी चोरीप्रकरणी संशयीतास अटक; चांदवड येथील पोलिसांच्या पथकाकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे दुचाकी चोरीचा तपास
तळेगावरोही (ता. चांदवड) येथून चोरीला गेलेली मोटारसायकल शोधण्यात चांदवड पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीतास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली असून न्यायालयाने संशयीतास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील रहिवासी फिर्यादी पंकज गोरखनाथ भोकनळ यांची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात ७ सप्टेंबर २०२६ रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस हवालदार राजू गायकवाड, पोलीस अंमलदार योगेश हटकर, शिवनाथ शेळके, प्रदिप आजगे, विक्रम बस्ते व भूषण साळवे यांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत अत्यंत कौशल्याने तपास केला. या प्रकरणी पोलिसांना संशयित केदु शरद केदारे (रा. तळेगावरोही, ता. चांदवड) अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली. संशयीतास बुधवारी (दि. १६) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
    user_Mahendra kantubhai Gujrathi
    Mahendra kantubhai Gujrathi
    Local News Reporter चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरू झालेला वैशाखरे येथील 'घरत' घराण्याचा गणेशोत्सव; १२० व्या वर्षात पदार्पण! माळशेज घाटाच्या निसर्गरम्य पायथ्याशी वसलेल्या वैशाखरे (ता. मुरबाड) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रतिष्ठित 'घरत' कुटुंबाच्या गणेशोत्सवाने यंदा १२० व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे. हा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचालीकडे झुकणारा गणेशोत्सव घरत कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला. या उत्सवाचे औचित्य साधून नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्यास असलेले सर्व बंधू-भगिनी आणि आप्तेष्ट एकत्र आले होते. सकाळी ठीक १० वाजता वेदोक्त मंत्रोच्चारात आणि पारंपरिक विधींनुसार गणरायाची यथोचित पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती करून मनमोहक सजावट व आकर्षक रोषणाईच्या झगमगाटात विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. १९०६ सालापासूनचा समृद्ध वारसा घरत कुटुंबाच्या या गणेशोत्सवाचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. इसवी सन १९०६ मध्ये, स्वातंत्र्यलढ्याच्या काळात घरत कुटुंबातील पहिले कायदेपंडित (वकील) आणि तत्कालीन कुटुंबप्रमुख धर्माजी लक्ष्मण घरत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रप्रेमी विचारांतून आणि प्रेरणेतून या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती. धर्माजी लक्ष्मण घरत यांनी सुरू केलेली ही अखंड भक्तीची आणि समाजप्रबोधनाची परंपरा त्यांच्या पुढील पिढ्यांनी अत्यंत निष्ठेने जपली आहे. १९०६ ते २०२६ अशा तब्बल १२० वर्षांचा प्रदीर्घ आणि अविरत कालावधी पूर्ण करणाऱ्या या गणेशोत्सवामुळे केवळ घरत कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण वैशाखरे पंचक्रोशीत भक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून सुरू झालेला वैशाखरे येथील 'घरत' घराण्याचा गणेशोत्सव; १२० व्या वर्षात पदार्पण!

माळशेज घाटाच्या निसर्गरम्य पायथ्याशी वसलेल्या वैशाखरे (ता. मुरबाड) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रतिष्ठित 'घरत' कुटुंबाच्या गणेशोत्सवाने यंदा १२० व्या वर्षात दिमाखात पदार्पण केले आहे. हा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वाटचालीकडे झुकणारा गणेशोत्सव घरत कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला.
या उत्सवाचे औचित्य साधून नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्यास असलेले सर्व बंधू-भगिनी आणि आप्तेष्ट एकत्र आले होते. सकाळी ठीक १० वाजता वेदोक्त मंत्रोच्चारात आणि पारंपरिक विधींनुसार गणरायाची यथोचित पूजा करण्यात आली. त्यानंतर महाआरती करून मनमोहक सजावट व आकर्षक रोषणाईच्या झगमगाटात विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.
१९०६ सालापासूनचा समृद्ध वारसा
घरत कुटुंबाच्या या गणेशोत्सवाचा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. इसवी सन १९०६ मध्ये, स्वातंत्र्यलढ्याच्या काळात घरत कुटुंबातील पहिले कायदेपंडित (वकील) आणि तत्कालीन कुटुंबप्रमुख धर्माजी लक्ष्मण घरत यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रप्रेमी विचारांतून आणि प्रेरणेतून या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती.
धर्माजी लक्ष्मण घरत यांनी सुरू केलेली ही अखंड भक्तीची आणि समाजप्रबोधनाची परंपरा त्यांच्या पुढील पिढ्यांनी अत्यंत निष्ठेने जपली आहे. १९०६ ते २०२६ अशा तब्बल १२० वर्षांचा प्रदीर्घ आणि अविरत कालावधी पूर्ण करणाऱ्या या गणेशोत्सवामुळे केवळ घरत कुटुंबातच नव्हे, तर संपूर्ण वैशाखरे पंचक्रोशीत भक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन.. अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली. सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    4
    एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन..
एम.एस.जी.एस. शैक्षणिक संकुलात बाप्पांचे जल्लोषात आगमन..
अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात गणपती बाप्पांचे झांज व ढोलताशाच्या गजरात आगमन झाले.  बाप्पांच्या आगमनासाठी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते. खजिनदार मकरंद सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे व संचालक राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली. तसेच प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बाप्पांच्या दर्शन घेतले. सर्वांनी बाप्पांकडे आपल्या व आपल्या देशासाठी शांतता, सुख व समृद्धी ची प्रार्थना केली.सर्वांना मोदक व खिरापत वाटप करण्यात आली.
सदर बाप्पांच्या आगमनासाठी संदीप वाकचौरे, बाळासाहेब सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, शिक्षक दीपक खैरनार, अजहर खतीब, गणेश सोनवणे, मयूर भागवत सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आयएसपी-सीएनपी वेल्फेअर फंड कमिटीतर्फे गणरायाची स्थापना नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) व करन्सी नोट प्रेस (सीएनपी) वेल्फेअर फंड कमिटीतर्फे ७२ वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या प्रति पंढरपूर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेशमूर्तीची स्थापना मंडळाचे अध्यक्ष मंगेश कासवेकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेंद्र टाकेकर, रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, खजिनदार अशोक पेखळे यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सीएनपीचे जॉइंट सेक्रेटरी आप्पाची बी. जगताप, लायब्ररी व स्पोर्ट्स सेक्रेटरी श्रीपाद एस. काजळे, लायब्ररी सेक्रेटरी मुरलीधर बी. जगताप, तालीम सेक्रेटरी मच्छिंद्र डी. जाधव, सदस्य अशोक टी. अहिरे, संतोष शिरसाट, यू. जी. पाटील, सुरेश आव्हाड व खजिनदार विन्सेंट ओहल यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन जनरल सेक्रेटरी अण्णाजी सोनवणे व करमणूक सेक्रेटरी सुधीर पगारे यांनी केले.
    4
    आयएसपी-सीएनपी वेल्फेअर फंड कमिटीतर्फे गणरायाची स्थापना

नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) व करन्सी नोट प्रेस (सीएनपी) वेल्फेअर फंड कमिटीतर्फे ७२ वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या प्रति पंढरपूर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
गणेशमूर्तीची स्थापना मंडळाचे अध्यक्ष मंगेश कासवेकर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेंद्र टाकेकर, रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, खजिनदार अशोक पेखळे यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सीएनपीचे जॉइंट सेक्रेटरी आप्पाची बी. जगताप, लायब्ररी व स्पोर्ट्स सेक्रेटरी श्रीपाद एस. काजळे, लायब्ररी सेक्रेटरी मुरलीधर बी. जगताप, तालीम सेक्रेटरी मच्छिंद्र डी. जाधव, सदस्य अशोक टी. अहिरे, संतोष शिरसाट, यू. जी. पाटील, सुरेश आव्हाड व खजिनदार विन्सेंट ओहल यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन जनरल सेक्रेटरी अण्णाजी सोनवणे व करमणूक सेक्रेटरी सुधीर पगारे यांनी केले.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • शबरी योजनेतील ९९० गायींचे वास्तव काय? ७० हजारांची गाय की कागदोपत्री समृद्धी? एकच गाय चार वेळा खरेदी दाखवल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप; व्यापारी–अधिकाऱ्यांच्या संगनमताची चौकशी करण्याची मागणी
    1
    शबरी योजनेतील ९९० गायींचे वास्तव काय? ७० हजारांची गाय की कागदोपत्री समृद्धी?

 एकच गाय चार वेळा खरेदी दाखवल्याचा शेतकऱ्यांचा गंभीर आरोप; व्यापारी–अधिकाऱ्यांच्या संगनमताची चौकशी करण्याची मागणी
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राजकमल चौक येथील सभास्थळाची महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या. अमरावती जिल्ह्यातील संघटन विस्ताराला नवी दिशा आणि अधिक बळ देणाऱ्या या अभियानाच्या शुभारंभासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
    1
    शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राजकमल चौक येथील सभास्थळाची महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
अमरावती जिल्ह्यातील संघटन विस्ताराला नवी दिशा आणि अधिक बळ देणाऱ्या या अभियानाच्या शुभारंभासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.