माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! अचानक भेटीत आढळलेल्या त्रुटींवर आता कारवाई होणार का? सुरगाणा तालुक्यातील पालकांचे लक्ष सुरगाणा तालुक्यातील माणी येथील सेंट्रल किचनला आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भोजनाची तपासणी करताना पोळी कच्ची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मंत्री उइके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यानच पोळी कच्ची आढळल्याने भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंत्री उइके यांच्या अचानक पाहणीमुळे सेंट्रल किचनमधील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. मंत्री स्वतः नाराज झाले असताना संबंधित सेंट्रल किचनवर ठोस कारवाई होणार का, की केवळ सूचना देऊन प्रकरण मिटणार? असा सवाल सुरगाणा तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने पाहणीतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! माणीच्या सेंट्रल किचनमध्ये कच्ची पोळी; पाहणीदरम्यान मंत्री उइके संतापले! अचानक भेटीत आढळलेल्या त्रुटींवर आता कारवाई होणार का? सुरगाणा तालुक्यातील पालकांचे लक्ष सुरगाणा तालुक्यातील माणी येथील सेंट्रल किचनला आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भोजनाची तपासणी करताना पोळी कच्ची असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मंत्री उइके यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे, यासाठी शासनाकडून सेंट्रल किचनच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात येते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यानच पोळी कच्ची आढळल्याने भोजनाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंत्री उइके यांच्या अचानक पाहणीमुळे सेंट्रल किचनमधील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या दर्जाबाबत प्रशासनाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. मंत्री स्वतः नाराज झाले असताना संबंधित सेंट्रल किचनवर ठोस कारवाई होणार का, की केवळ सूचना देऊन प्रकरण मिटणार? असा सवाल सुरगाणा तालुक्यातील पालकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने पाहणीतील त्रुटींची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.1
- पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी महापौरांचे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; स्काडा महिनाअखेर, बारा बंगला केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार वादंग झाला. सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कृत्रिम पाणीटंचाईचा ठपका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीसह कारवाईची मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपलाही सभागृहात घरचा आहेर मिळाला. भूषण राणे यांनी पवननगरचा पाणीपुरवठा कोणाच्या तरी दबावाखाली वळविला जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बडगुजर यांनी पाणी वितरण व्यवस्था आणि पंपिंग यंत्रणेतील दोषांमुळेच पाणीप्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला. यावेळी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याचा मुद्दा उपस्थित केला. पाणीपुरवठा व्यवस्थेतील 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महासभेत पाचारण केले. 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे, तर बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले. पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत आयुक्तांनी व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, चर्चेनंतर महापौरांनीही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, तसेच व्हॉल्व्हमनच्या विभागनिहाय तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ठोस नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही महापौरांनी प्रशासनाला बजावले. चौकट : आदेशांची वेळमर्यादा व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कार्यकारी व कनिष्ठ अभियंत्यांवर महासभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त आणि महापौरांनी अधिकाऱ्यांना वेळमर्यादा देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नाशिककरांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.1
- सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके1
- NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.. NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..1
- निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक4
- *चांदवड येथे ऋषिपंचमी उत्साहात साजरी; चंद्रेश्वर महादेव व सप्तर्षींच्या दर्शनासाठी महिलांची अलोट गर्दी!* अँकर :पवित्र भाद्रपद महिन्यात येणाऱ्या ऋषिपंचमीचे औचित्य साधून चांदवड येथील ऐतिहासिक व नयनरम्य श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज महिला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पावन भूमीत भल्या पहाटेपासूनच महिलांनी सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. ऋषिपंचमी हा दिवस भारतीय संस्कृतीत कृतज्ञता, आत्मशुद्धी आणि श्रद्धेचा मानला जातो. वर्षभरात नकळत घडलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मानवी जीवनाला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महिला या दिवशी कठोर व्रत पाळतात. कंदमुळे, अळूची पाने आणि पिकांचे सात्विक अन्न ग्रहण करून, आघाड्याच्या वनस्पतिने दंतधावण करत नदी किंवा कुंडावर स्नान करून हे व्रत पूर्ण केले जाते. चांदवड येथील चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात आज सकाळी श्री सप्तर्षींची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यानंतर परिसर "हर हर महादेव" आणि ऋषीमुनींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. शिस्तबद्ध रांगेत उभ्या राहून महिलांनी प्रथम सप्तर्षींचे दर्शन घेत मनोभावे पूजन केले आणि त्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करून आपल्या कुटुंबाच्या आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना केली. भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर ऋषीमुनींबद्दलची श्रद्धा आणि व्रत पूर्ण केल्याचे आत्मिक समाधान स्पष्ट दिसत होते. ज्ञानाची परंपरा जपणारा आणि ऋषीमुनींच्या त्यागाचे स्मरण करून देणारा हा पावन सण चांदवडकरांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात साजरा केला.1
- नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी नकाशा बदलाचा फटका; बोरगावातील शेतकऱ्यांचे पीक-पाहणी रखडले भूमी अभिलेख कार्यालयाने तात्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांची अडचण दूर करण्याची मागणी प्रतिनिधी | बोरगाव लक्ष्मण बागुल बोरगाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना नकाशामध्ये झालेल्या बदलामुळे पीक-पाहणी नोंदणी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नकाशातील बदलामुळे शेतजमिनीची प्रत्यक्ष स्थिती आणि अभिलेखातील माहिती यामध्ये तफावत निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक-पाहणी नोंदणी ही शेतकऱ्यांच्या विविध शासकीय योजना, पीक कर्ज, विमा तसेच इतर कृषीविषयक बाबींसाठी महत्त्वाची असल्याने नकाशातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरगाणा येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे तात्काळ दखल घेऊन नकाशाची आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. भूमी अभिलेख विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नकाशातील त्रुटी तपासाव्यात आणि शेतकऱ्यांना पीक-पाणी नोंदणी करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.1