श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा जाहीर श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचा उत्तर महाराष्ट्र दौरा जाहीर पाचोरा (प्रतिनिधी) – शिवसेना नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातील संघटन बळकटीकरणासाठी विभागीय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून, या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान कामगारांचे विविध प्रश्न, संघटन विस्तार तसेच आगामी लढ्यांची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. संघटनेचे पदाधिकारी कामगारांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार असून, त्या सोडवण्यासाठी पुढील कृती आराखडा तयार केला जाणार आहे. या दौऱ्यात प्रदेश कार्याध्यक्ष श्री. बाबासाहेब चव्हाण, प्रदेश संघटक श्री. नानासाहेब बच्छाव, सफाई कामगार सेलचे प्रदेश अध्यक्ष श्री. संतोष मकवाना तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. जितेंद्र जैन उपस्थित राहणार आहेत. 📅 दि. ५ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मंगलम हॉल येथे कार्यक्रम होणार असून, त्यानंतर धुळे येथे दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत जेष्ठ नागरिक भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. नंदुरबार येथे मुक्काम असेल. 📅 दि. ६ एप्रिल २०२६ रोजी नंदुरबार येथे सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत हॉटेल शुगर अँड स्पाइस येथे कार्यक्रम होईल. त्यानंतर नाशिक येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडणार असून, शिर्डी येथे सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत अंतिम बैठक आयोजित करण्यात आली आहे. या दौऱ्यास सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटन बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 👉 “आपली एकजूट हीच आपली खरी ताकद आहे” 👉 “संघटन बळकट करा – कामगारांच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहूया” 👉 “एकत्र या – संघटित व्हा – हक्कांसाठी लढा!” — प्रसिद्धी विभाग श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना, उत्तर महाराष्ट्र

- जळगाव शहरात अवकाळी पाऊसला सुरवात लोकांची तारांबळ आणि धावपळ1
- सिडकोत रिक्षा चालकांचा आक्रमक पवित्रा; प्रवाशांना अडवणाऱ्यांवर कडक कारवाई छत्रपती संभाजीनगर शहरात रिक्षा चालकांनी गॅस टंचाईच्या निषेधार्थ बेमुदत बंद पुकारला असून, या पार्श्वभूमीवर सिडको चौक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. संपादरम्यान काही रिक्षा चालकांनी आक्रमक भूमिका घेत प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, काही चालकांनी सिटी बस तसेच सुरू असलेल्या रिक्षा अडवून प्रवाशांना प्रवास करण्यास मज्जाव केला. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने वाहनांतून खाली उतरवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. घटनेची माहिती मिळताच सिडको वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणत प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कारवाई करण्यात आली. काहींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.1
- जळगाव: आज ३० मार्च रोजी जळगाव जिल्ह्यासह प्रामुख्याने धरणगाव आणि जळगाव तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने झोडपून काढले. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेकडो शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, काढणीला आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पिकांचे मोठे नुकसान आज झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गहू, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकांसह केळी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत, तर गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पालकमंत्र्यांची तत्परता शेतकऱ्यांचे हे मोठे नुकसान लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (गुघे साहेब) आणि स्थानिक पातळीवरील सर्व तहसीलदारांना फोनवरून संपर्क साधून, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उद्यापासून पंचनाम्यांना सुरुवात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार, उद्यापासूनच बाधित क्षेत्रातील पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. "एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशा पद्धतीने प्रशासनाने काम करावे," अशा स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना आवाहन जळगाव व धरणगाव तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे, त्यांनी तातडीने आपल्या भागातील संबंधित तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊन शासनाकडून मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.2
- Post by गणेश मौर्य1
- औरळा नगरीत श्री लक्ष्मी देवीचा जन्मोत्सव: शिस्त आणि भक्तीचा आदर्श संगम!2
- धुळे शहरासह परिसरात आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील वलवाडी शिवार, कुसुंबे तसेच साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्याची नोंद आहे. सायंकाळी सुमारे 4:30 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही भागात हलकी ते मध्यम गारपीट झाल्याने हवामानात अचानक बदल जाणवला. या अवकाळी पावसामुळे शेतपिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.1
- आज ३० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली यात विजांचा मोठा कडकडाट सुरू झाला होता आमठाणा येथे एका झाडावर वीज पडल्याची घटना घडली असून सदरील प्रकार बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे.1
- सावळदबारा येथे अवकाळी पावसाचा थैमान; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सावळदबारा (प्रतिनिधी): परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतात उभ्या पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. वाऱ्याचा वेगही जास्त असल्यामुळे झाडांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पिके घेतली असताना ऐन कापणीच्या तोंडावर आलेल्या या पावसामुळे चिंता वाढली आहे. याशिवाय काही भागात वीजपुरवठा खंडित झाला असून रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.1