येवला उत्तर-पूर्व भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंत्री भुजबळ यांना निवेदन; विविध मार्गांच्या पुनर्बांधणी व सिमेंट काँक्रिटीकरणाची सोनवणे यांची मागणी येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील ग्रामीण, इतर जिल्हा व प्रमुख जिल्हा मार्गांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन त्यांच्या तातडीने दुरुस्ती, पुनर्बांधणी, दर्जावाढ, रुंदीकरण तसेच आवश्यकतेनुसार सिमेंट काँक्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सजग नागरी मंच, जलहक्क संघर्ष समिती चे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा येवला-लासलगाव मतदारसंघाचे आमदार मा. श्री. छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील अनेक महत्त्वाचे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून या मार्गांवरून शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. शेतीमाल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठीही हे रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. यापूर्वी भुजबळ यांच्या माध्यमातून या भागात उभारण्यात आलेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाची मोठी सोय झाली होती. मात्र, रस्त्यांचे आयुष्यमान संपुष्टात येणे, अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये अपेक्षित दर्जा न राखल्यामुळे अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ############# दुरुस्ती, पुनर्बांधणी, दर्जावाढ व रुंदीकरणाची मागणी असलेले रस्ते :- रहाडी ते भारम – इतर जिल्हा मार्ग क्र. १८९ रहाडी ते खरवंडी – इतर जिल्हा मार्ग क्र. ११५ रहाडी ते नाराळा (येवला तालुका हद्दीपर्यंत) – ग्रामीण मार्ग क्र. ३५ खरवंडी ते वाघाळे – ग्रामीण मार्ग क्र. १९६ खरवंडी ते रेंडाळे – ग्रामीण मार्ग क्र. ५४ सायगाव ते न्यारखेडा बुद्रुक – ग्रामीण मार्ग क्र. १२२ वाघाळे – आडसुरेगाव – भुलेगाव – खामगाव – इतर जिल्हा मार्ग क्र. २२ तळवाडे – विठ्ठलवाडी जि.प. शाळा ते गवंडगाव – ग्रामीण मार्ग क्र. ११८ राजापूर – पन्हाळ साठे – पिंपळखुटे तिसरे (आहेरवाडीकडे) – प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ७० राजापूर – कोळगाव बंधारा मार्गे कोळगाव – ग्रामीण मार्ग क्र. ९९ गारखेडा – देवठाण – ग्रामीण मार्ग क्र. १२९ ############# दर्जावाढ, संपूर्ण पुनर्बांधणी व सिमेंट काँक्रिटीकरणाची मागणी असलेले प्रमुख जिल्हा मार्ग येवला – नागडे – धामणगाव – सायगाव फाटा – कौटखेडा – तळवाडे – डोंगरगाव – भारम – वाघाळे – प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ७८ डोंगरगाव – कोळम बुद्रुक – कोळम खुर्द – न्यारखेडा खुर्द – न्यारखेडा बुद्रुक – वाई बोथी – नगरसूल – प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ६८ या दोन्ही प्रमुख जिल्हा मार्गांची दर्जावाढ करून आवश्यक रुंदीकरणासह संपूर्ण पुनर्बांधणी व सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे मार्ग येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील अनेक गावांना येवला शहर, नगरसूल, लासलगाव तसेच इतर प्रमुख बाजारपेठांशी जोडणारे मुख्य दळणवळण मार्ग असल्याने या कामांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. ######### " येवला पूर्व भागात रस्त्यांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करावा, नवीन कामे पूर्ण होईपर्यंत सर्व खड्डेमय रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती झाली पाहिजे. निकृष्ठ कामांची गुणवत्ता, दर्जा, आयुष्यमान याचे लेखा लेखा परीक्षण झाले पाहिजे " भागवतराव सोनवणे संयोजक :- सजक नागरी मंच, जलहक्क संघर्ष समिती ################# "जिल्हा वार्षिक योजनेचा निधी उपलब्ध होणार असून लवकरच जिल्हा परिषदे कडे असलेल्या ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती व बांधणी करण्यात येईल.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांच्या प्रस्तावांना चालना देण्यात देऊन अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल" :- छगन भुजबळ, मंत्री, अन्न व नागरी पुरवठा
येवला उत्तर-पूर्व भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंत्री भुजबळ यांना निवेदन; विविध मार्गांच्या पुनर्बांधणी व सिमेंट काँक्रिटीकरणाची सोनवणे यांची मागणी येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील ग्रामीण, इतर जिल्हा व प्रमुख जिल्हा मार्गांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन त्यांच्या तातडीने दुरुस्ती, पुनर्बांधणी, दर्जावाढ, रुंदीकरण तसेच आवश्यकतेनुसार सिमेंट काँक्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सजग नागरी मंच, जलहक्क संघर्ष समिती चे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा येवला-लासलगाव मतदारसंघाचे आमदार मा. श्री. छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागातील अनेक महत्त्वाचे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून या मार्गांवरून शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. शेतीमाल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठीही हे रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. यापूर्वी भुजबळ यांच्या माध्यमातून या भागात उभारण्यात आलेल्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाची मोठी सोय झाली होती. मात्र, रस्त्यांचे आयुष्यमान संपुष्टात येणे, अवजड वाहनांची वाढलेली वाहतूक आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये अपेक्षित दर्जा न राखल्यामुळे अनेक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ############# दुरुस्ती, पुनर्बांधणी, दर्जावाढ व रुंदीकरणाची मागणी असलेले रस्ते :- रहाडी ते भारम – इतर जिल्हा मार्ग क्र. १८९ रहाडी ते खरवंडी – इतर जिल्हा मार्ग क्र. ११५ रहाडी ते नाराळा (येवला तालुका हद्दीपर्यंत) – ग्रामीण मार्ग क्र. ३५ खरवंडी ते वाघाळे – ग्रामीण मार्ग क्र. १९६ खरवंडी ते रेंडाळे – ग्रामीण मार्ग क्र. ५४ सायगाव ते न्यारखेडा बुद्रुक – ग्रामीण मार्ग क्र. १२२ वाघाळे – आडसुरेगाव – भुलेगाव – खामगाव – इतर जिल्हा मार्ग क्र. २२ तळवाडे – विठ्ठलवाडी जि.प.
शाळा ते गवंडगाव – ग्रामीण मार्ग क्र. ११८ राजापूर – पन्हाळ साठे – पिंपळखुटे तिसरे (आहेरवाडीकडे) – प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ७० राजापूर – कोळगाव बंधारा मार्गे कोळगाव – ग्रामीण मार्ग क्र. ९९ गारखेडा – देवठाण – ग्रामीण मार्ग क्र. १२९ ############# दर्जावाढ, संपूर्ण पुनर्बांधणी व सिमेंट काँक्रिटीकरणाची मागणी असलेले प्रमुख जिल्हा मार्ग येवला – नागडे – धामणगाव – सायगाव फाटा – कौटखेडा – तळवाडे – डोंगरगाव – भारम – वाघाळे – प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ७८ डोंगरगाव – कोळम बुद्रुक – कोळम खुर्द – न्यारखेडा खुर्द – न्यारखेडा बुद्रुक – वाई बोथी – नगरसूल – प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ६८ या दोन्ही प्रमुख जिल्हा मार्गांची दर्जावाढ करून आवश्यक रुंदीकरणासह संपूर्ण पुनर्बांधणी व सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे मार्ग येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील अनेक गावांना येवला शहर, नगरसूल, लासलगाव तसेच इतर प्रमुख बाजारपेठांशी जोडणारे मुख्य दळणवळण मार्ग असल्याने या कामांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. ######### " येवला पूर्व भागात रस्त्यांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार करावा, नवीन कामे पूर्ण होईपर्यंत सर्व खड्डेमय रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती झाली पाहिजे. निकृष्ठ कामांची गुणवत्ता, दर्जा, आयुष्यमान याचे लेखा लेखा परीक्षण झाले पाहिजे " भागवतराव सोनवणे संयोजक :- सजक नागरी मंच, जलहक्क संघर्ष समिती ################# "जिल्हा वार्षिक योजनेचा निधी उपलब्ध होणार असून लवकरच जिल्हा परिषदे कडे असलेल्या ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती व बांधणी करण्यात येईल.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांच्या प्रस्तावांना चालना देण्यात देऊन अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल" :- छगन भुजबळ, मंत्री, अन्न व नागरी पुरवठा
- अशोका मेडीकव्हर हाॅस्पीटलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन डॉक्टरांनी आधुनिक नेत्ररोग उपचार पद्धती बाबत माहिती दिली मेडिकल क्षेत्रात मोठी क्रांती! ईएनटी आणि नेत्ररोगाच्या रुग्णांसाठी अशोका मेडिकव्हर ठरतेय वरदान, पत्रकार परिषदेत डॉ माहिती1
- शासकीय कार्यक्रमातून जि.प.-पं.स. सदस्यांना डावलल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांसमोर मंत्र्यांच्या उपस्थितीत तक्रार छत्रपती संभाजीनगर : महा राजस्व अभियानांतर्गत आयोजित शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत जिल्हा परिषद सभापतींनी मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत तक्रार केली. तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. वारंवार अशा प्रकारे लोकप्रतिनिधींना वगळले जात असल्याची खंत व्यक्त करत भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली.1
- ऑन फडणवीस केंद्रात सामनातून दावा.. - ubt चा न्यूजपेपर सामना त्यात मानला वाटेल तसे लिहितात. कोठून स्वप्न पडतात, काहीतरी गेस करतात आणि लिहितात. फडणवीसांना जायचा की नाही, पक्षातील वरिष्ठांनी ठरवले की नाही, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. अशा बकवास बातम्या देऊन सामानाचा खप मर्यादित राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर.. *मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर* - भविष्य सांगायला यांना ठेवलेलं नाही. आम्ही यांच्या बातम्याकडे लक्ष देत नाही. ऑन दिल्लीत सुप्त संघर्ष.. - दिल्लीत सुप्त संघर्ष आहे आणि यांना तडजोडीसाठी बोलावले आहे का? - *आता सामना वैचारिक नाही तर फेकु पेपर झाला आहे.* ऑन मोदी FB लाईव्ह वरून टीका - एकनाथ शिंदे हे लोकांमध्ये जाऊन भेटत होते, रेमसिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होते, ऑक्सिजन, बेड व्यवस्था करीत होते. लाखो कार्यकर्ते रस्त्यावर होते, एकनाथ शिंदे यांना कोरोना झाला होता. तरीही सर्व सामन्यासाठी त्यांनी झोकून दिले. - मोदी काय करता यापेक्षा तुम्ही काय केले यावर लक्ष द्या. मुख्यमंत्री असताना मदतीचा ओघ तरी दिले आहे का? त्याकाळी ऑनलाइनचं यायचे, आता उद्धव ठाकरे यांना लोकांनी त्यांना फेसबुकवर ठेवले... ऑन गणेश नाईक टीका - दर वेळेस काहीतरी बडबड करीत असतो, त्यांना ना पक्षात वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत ही नाही. इतरांनी काय कॉमेंट केले आम्ही लक्ष देत नहीं . शिंदेंनी त्यांच्या जिल्ह्यात काय करावे. ऑन शहा सुनेत्रा पवार पुणे भेट. - शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली. काल पुण्यात अमित शहा यांनी सुनेत्रा वाहिनी यांच्याशी बोलले. प्रत्येक भेटीचे राजकारण करू नये. स्वतः सुनेत्रा वाहिनी आणि शाह हे सक्षम आहे. ऑन उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना आदेश. - धनुष्यबाण चिन्ह हे आम्हालाच मिळेल, कारण आम्ही आमची बाजू मजबुतीने मंडाले आहे. उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास ढासळलेला आहे. ऑन राज ठाकरे आरोप. - मला कल्पना नाही. आरोप असेल तर सरकार चौकशी करेल.1
- अनुपस्थिती व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; १५ ऑगस्टनंतर कठोर कारवाईचा आमदार प्रशांत बंब यांचा इशारा 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत आंबेलोहोळ व खुलताबाद येथे आयोजित समाधान शिबिरात आमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांशी संवाद साधत महसूल विभागाच्या विविध सेवांचा आढावा घेतला. यावेळी ७/१२ उतारे, विविध दाखले, प्रमाणपत्रे तसेच महसुली कामांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. शासनाच्या योजना व सेवा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करत लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा देताना, अनुपस्थिती आणि हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, १५ ऑगस्टनंतर अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला. जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.1
- चांदवड तालुक्यातील एक निसर्गरम्य ठिकाण हाडबिची शेंडी कातरवाडी1