*क्लीन येवला, ग्रीन येवला उपक्रमाचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन येवला, ‘क्लीन येवला, ग्रीन येवला’ हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून सातत्यपूर्ण चळवळ बनविण्याची गरज आहे. स्वच्छता आणि हरित संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून येवला शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. तसेच विकासासोबत पर्यावरण संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असून प्रत्येकाने झाडांची जबाबदारी स्वीकारावी असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. येवला नगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विश्वलता महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्लीन येवला, ग्रीन येवला’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत येवला शहरातील आनंद नगर परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. स्वच्छ, सुंदर आणि हरित येवला घडविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी ते बोली होते. यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगासमोर अनेक गंभीर संकटे निर्माण होत आहेत. बदलते हवामान, वाढते तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यांचा परिणाम सर्वच घटकांवर होत आहे. त्यामुळे प्रदूषणाला आळा घालणे, मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आणि लागवड केलेल्या झाडांचे योग्य संगोपन करणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. केवळ वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करून ते जगविण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील झाडांची काळजी घेतली, तर येवला शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक होण्यास निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले. विकासकामांमध्ये पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याचे उदाहरण देताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये उड्डाणपुलाची निर्मिती करताना रस्त्याच्या कामात येणाऱ्या मोठ्या वडाच्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. त्यानंतर या झाडांचे योग्य संगोपन करून ती जगविण्यात आली. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे शक्य असून त्यासाठी इच्छाशक्ती आणि नियोजनाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “विकासाची कामे करताना काही झाडे तोडावी लागली, तर त्याची भरपाई म्हणून केवळ औपचारिक वृक्षलागवड न करता त्यापेक्षा दुप्पट झाडे लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. पर्यावरण ही केवळ शासनाची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले. येवला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधताना मंत्री छगन भुजबळ यांनी पर्यावरण संवर्धनालाही सातत्याने प्राधान्य दिले आहे. स्वच्छता, हरित क्षेत्र वाढविणे, वृक्षलागवड आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. येवला शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार ठेवण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील, असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला. यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, प्रशांत शिंदे, मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, भूषण लाघवे, प्रशांत भंडारे, माँटी मथुरे, भाऊसाहेब धनवटे, समाधान जेजुरकर, सचिन सोनवणे, सुमित थोरात, राजू पवार, महेश गादेकर, दिपक गायकवाड, नवनाथ थोरात, दिपक पवार, आदित्य कानडे, गणेश गवळी, राकेश कुंभारे यांच्यासह विश्वलता महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
*क्लीन येवला, ग्रीन येवला उपक्रमाचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन येवला, ‘क्लीन येवला, ग्रीन येवला’ हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता लोकसहभागातून सातत्यपूर्ण चळवळ बनविण्याची गरज आहे. स्वच्छता आणि हरित संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून येवला शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून विकसित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. तसेच विकासासोबत पर्यावरण संवर्धनही तितकेच महत्त्वाचे असून प्रत्येकाने झाडांची जबाबदारी स्वीकारावी असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. येवला नगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि विश्वलता महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्लीन येवला, ग्रीन येवला’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमांतर्गत येवला शहरातील आनंद नगर परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. स्वच्छ, सुंदर आणि हरित येवला घडविण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यावेळी ते बोली होते. यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगासमोर अनेक गंभीर संकटे निर्माण होत आहेत. बदलते हवामान, वाढते तापमान आणि नैसर्गिक आपत्ती यांचा परिणाम सर्वच घटकांवर होत आहे. त्यामुळे प्रदूषणाला आळा घालणे, मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे आणि लागवड केलेल्या झाडांचे योग्य संगोपन करणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. केवळ वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य होणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करून ते जगविण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील झाडांची काळजी घेतली, तर येवला शहर अधिक हिरवेगार आणि पर्यावरणपूरक होण्यास निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले. विकासकामांमध्ये पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य
देण्याचे उदाहरण देताना माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये उड्डाणपुलाची निर्मिती करताना रस्त्याच्या कामात येणाऱ्या मोठ्या वडाच्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. त्यानंतर या झाडांचे योग्य संगोपन करून ती जगविण्यात आली. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे शक्य असून त्यासाठी इच्छाशक्ती आणि नियोजनाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. “विकासाची कामे करताना काही झाडे तोडावी लागली, तर त्याची भरपाई म्हणून केवळ औपचारिक वृक्षलागवड न करता त्यापेक्षा दुप्पट झाडे लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. पर्यावरण ही केवळ शासनाची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले. येवला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधताना मंत्री छगन भुजबळ यांनी पर्यावरण संवर्धनालाही सातत्याने प्राधान्य दिले आहे. स्वच्छता, हरित क्षेत्र वाढविणे, वृक्षलागवड आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. येवला शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार ठेवण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील, असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला. यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दत्ता निकम, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, प्रशांत शिंदे, मकरंद सोनवणे, अल्केश कासलीवाल, भूषण लाघवे, प्रशांत भंडारे, माँटी मथुरे, भाऊसाहेब धनवटे, समाधान जेजुरकर, सचिन सोनवणे, सुमित थोरात, राजू पवार, महेश गादेकर, दिपक गायकवाड, नवनाथ थोरात, दिपक पवार, आदित्य कानडे, गणेश गवळी, राकेश कुंभारे यांच्यासह विश्वलता महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नेपाळ येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी झालेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
- स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात स्वामी मुक्तानंद विद्यालयात ‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमासह रक्षाबंधन उत्साहात येवला (प्रतिनिधी): स्वामी मुक्तानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येवला येथे रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साही व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. देशाचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात 'एक राखी सैनिकांसाठी' या विशेष उपक्रमांतर्गत सैनिक औक्षण व राखीबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ईशस्तवाने झाली. उपप्राचार्य खेरणार सर यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या उपस्थित आजी-माजी सैनिकांना बांधून त्यांचे औक्षण केले व सन्मान केला. सैनिकांनी सीमेवरील अनुभव सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृत पहिलवान, सचिव डॉ. किरण पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, संचालक अमोल एंडाईत, प्राचार्य सोनवणे आर. बी., उपप्राचार्य खेरणार सर, मुंडे सर, राऊळ सर व शिक्षकवृंद उपस्थित होते. अध्यक्ष व प्राचार्यांनी आपल्या भाषणातून सैनिकांच्या त्यागाचे कौतुक केले. हादगे मॅडम, जाडीई मॅडम व गोसावी मॅडम यांनी सैनिकांविषयी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले, तर राऊत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप लासलगाव (विशेष प्रतिनिधी) : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3] गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन: आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.1
- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- जायखेडा पोलिसांनी पाठलाग करून पिकअप मधून गोवंश जनावरे केली जप्त जायखेडा पोलिसांची पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत ३ लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गोवंश घेऊन जाणारी पिक अप पाठलाग करून ताब्यात घेणेत आली.1
- मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो1
- शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र1
- पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ1
- مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام1