डफरीन अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर आ.संजय खोडके यांची आरोग्य प्रशासनासमवेत आढावा बैठक आयकॉन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क *डफरीन रुग्णालयातील अतिरिक्त दोन एनआयसीयु तातडीने सुरु करण्याचे नियोजन करा - आ.संजय खोडके* *आ.सौ.सुलभाताई खोडके व आ. संजय खोडके यांनी वाढविले डफरीनमधील आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल* *जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या फायर सेफ्टीला घेऊन विशेष तज्ज्ञ नियुक्त करण्याच्या सुचना* *अमरावती ( प्रतिनिधी ) दिनांक - २७ ऑगस्ट :-* जिल्हा स्त्री रुग्णालय,अमरावतीमधील नवजात बालकांच्या अतिदक्षता कक्षात नुकतीच २४ ऑगस्ट रोजी आग लागल्याच्या दुर्दैवी घटनेमध्ये तीन बालकांचा करूण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर समाजमन अजूनही सुन्न असून डफरीनच्या कामकाजावर सुद्धा त्याचा परिणाम जाणवत आहे. झालेली घटना अत्यंत दुःखद व दुर्दैवी असली तरी अन्य रुग्णांवर व आरोग्यसेवेवर त्याचा परिणाम होऊ नये, तसेच डफरीन रुग्णालयातील आरोग्य सेवा सुरळीत चालण्याला घेऊन आमदार - सौ.सुलभाताई खोडके व विधान परिषद आमदार - संजय खोडके यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन ))येथे भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. *डफरीनमध्ये एकूण तीन नवजात शिशू अतिदक्षता कक्ष आहे. त्यापैकी एक एनआयसीयु जळाले असल्याने आता अतिरिक्त दोन एनआयसीयू तात्काळ सुरु करण्याचे नियोजन करण्याबाबत सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने सुचना करण्यात आल्यात*. जिल्हा स्त्री रुग्णालयातील एनआयसीयु अग्निकांडानंतर तेथे उपचार घेणाऱ्या नवजात बाळांना खाजगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. तसेच सद्यापरिस्थितीत रुग्णालयातील नवजात बाळांना अतिदक्षतेच्या सुविधेअभावी बाहेर पाठविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आल्याने आमदार -संजय खोडके व आमदार - सौ. सुलभाताई खोडके यांनी डफरीन प्रशासनाशी चर्चा केली. गेल्या वर्षभरापूर्वीच कार्यान्वित झालेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नवजात बालकांच्या अतिदक्षतेच्या उपचारासाठी तीन एनआयसीयू कक्ष स्थापित करण्यात आले आहे. या तीन कक्षांमधील जळालेल्या कक्षात १० नवजात बालकांवर उपचार करण्याची क्षमता होती. त्याला आता आग लागण्याने उर्वरित १२ मिनीबेड व १७ मिनिबेड एनआयसीयु तातडीने कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आल्या. डफरीन रुग्णालयातील नवजात बाळांना अतिदक्षतेच्या उपचारासाठी बाहेर पाठवू नये, म्ह्णून अतिरिक्त दोन एनआयसीयू कक्ष लवकरात लवकर सर्व अद्यावत संसाधने व दक्षतापूर्वकरित्या सज्ज करण्याबाबत सुद्धा यावेळी सांगण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी डफरीन मधील जळालेल्या एनआयसीयु कक्षाचे अत्यंत बारकाईने अवलोकन केले. आगीचे स्वरूप अत्यंत भीषण व गंभीर असल्यामुळे आगीचे मूळ कारण अद्यापपर्यंत समजू शकत नसले तरी घटनेत जिवीतास धोका पोहोचविणे हे अत्यंत दुःखद आहे. त्यामुळे पुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये , यासाठी डफरीन रुग्णालयातील विद्युतीकरण, उपकरणे याबाबत असलेल्या तांत्रिक उणिवा लगेच दूर करून फायर ऑडिट, रुग्णांची सुरक्षितता, अग्निशमन व्यवस्था, आवश्यक वैद्यकीय सुविधा तसेच आपत्कालीन व्यवस्था तातडीने अद्यावत करण्याच्या सूचना आमदार - संजय खोडके यांनी केल्यात. डफरीन रुग्णालयातील अग्निकांडाच्या घटनेनंतर सद्या तेथील आरोग्य सेवा प्रभावित व विस्कळीत झाली असल्याच्या खोट्या अफवा पसरविल्यात जात आहे. परंतु डफरीनची आरोग्य सेवा सध्या सुरळीत सुरू असून रुग्णांना आवश्यक उपचार व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीद्वारे गैरसमज निर्माण करू नयेत, असे आवाहन आमदार - संजय खोडके यांनी केले. डफरीन रुग्णालयातील जळालेल्या एनआयसीयु लवकरात लवकर दुरुस्त करून सुसज्ज करण्यासाठी सुद्धा डफरीन रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून अत्यंत गुणात्मक व दर्जेदार काम करण्याच्या सुचना सुद्धा आमदार महोदयांनी केल्या. डफरीनमध्ये अग्निशमन यंत्रणा सदैव तत्पर ठेवण्याकरिता व फायर सेफ्टीला घेऊन विशेष तज्ज्ञ नियुक्त करण्याची सूचना सुद्धा यावेळी करण्यात आली. डफरीन रुग्णालयातील स्वच्छतेच्या कामात कुठलीही हयगय व कुचराई खपवून घेणार नाही. यासाठी संबंधित विभागाने विशेष लक्ष घालून चोख कामगिरी बजाविण्याची सूचना सुद्धा आमदार - संजय खोडके यांनी केली. यावेळी आमदार महोदयांनी डफरीन रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफ, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य वाढविले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. अशा संवेदनशील प्रसंगी सर्वांनी संयम राखून आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार - सौ.सुलभाताई खोडके यांनी केले. सदर प्रकरणात आता रुग्णालयातील सर्व परिस्थितीवर शासन -प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या आरोग्य विषयक व रुग्ण कल्याण संदर्भात सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी डफरीन यंत्रणेला दिल्यात . यावेळी आरोग्य सेवा उपसंचालक अकोला सुशील कुमार वाकचौरे, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक तथा डफरीन रुग्णालय अमरावतीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक - डॉ. विनोद पवार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावतीचे वैद्यकीय अधीक्षक - डॉ. अमोल नरोटे, नवजात शिशु तज्ज्ञ - डॉ. विजया बोरा, एन. आय. सी. यु. इन्चार्ज - डॉ. प्रिती इंगळे, बालरोग तज्ज्ञ - डॉ. निलेश पाचबुद्धे,विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय बायो मेडिकल इंजिनियर - अमोल वाडेकर,जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासकीय अधिकारी - संदीप गोपाळराव तारगे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे - उपअभियंता एन. प्रकाश रेड्डी , सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत शाखा उपअभियंता -विनोद गहुकर, शाखा अभियंता- शंतनू गुल्हाने, मनपा मुख्य अग्नीशमन अधिकारी- दिनेश हंबर्डे, अजय पंधरे,आदींसह आरोग्य सेवेतील प्रशासकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.

- मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा; खासदार सोनवणे यांची मागणी मराठवाड्यात यंदा पावसाची स्थिती प्रतिकूल असून अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करून दुष्काळी मदत व आवश्यक सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.1
- नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी माननीय मुख्यमंत्री श्री, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना धीर देत, घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे, असा विश्वास दिला.1
- छत्रपती संभाजीनगर...शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छत्रपती संभाजीनगर... शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुप्टा आक्रमक; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ANC : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज टीचर्स असोसिएशन अर्थात मुप्टा संघटना आक्रमक झाली आहे. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात, या मागणीसाठी शेकडो शिक्षकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी, यासह इतर विविध मागण्या शिक्षकांनी प्रशासनासमोर मांडल्या. यासंदर्भात मुप्टाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. शिक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे आता शिक्षण विभाग या मागण्यांवर काय निर्णय घेतो, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. बाईट- मुप्टा शिक्षक संघटना अध्यक्ष राजेंद्र जाधव2
- 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService1
- ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे सुविधेचा अभाव, मा.आमदार उदयसिंग राजपूत यांनी तीव्र शब्दात नाराजी1
- पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ1
- ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह. 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन पाहायला मिळाले. एका बाजूला मुस्लिम बांधवांनी भव्य आणि शांततापूर्ण जुलूस काढला, तर दुसऱ्या बाजूला 'अल-कुरेशी बॉईज'च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवण्यात आला आहे. पाहूया या विशेष कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ढोरकीन शहरात आज भव्य जुलूस काढण्यात आला. तसेच 'अल-कुरेशी बॉईज, ढोरकीन' यांच्या पुढाकाराने राजाबाग सवार दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. "चला रक्तदान मोहीम राबवूया... रक्तदान करून जीव वाचवूया" हा संदेश देत तरुणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. संकलित झालेले रक्त 'दत्ताजी भाले रक्तकेंद्र' यांच्या माध्यमातून गरजूंसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मौलाना काशिफ रजा, मौलाना अबू, सुफियान कुरेशी, निसार कुरेशी, जावेद कुरेशी, अय्यूब कुरेशी, जब्बार कुरेशी, जुबेर कुरेशी, मोईन कुरेशी, इरफान कुरेशी, मुक्रम कुरेशी, इम्रान कुरेशी, मुजीब कुरेशी, इस्माईल कुरेशी, अजिम कुरेशी, युनुस कुरेशी, फकिर कुरेशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.1
- चार लाख भाविकांनी खुलताबाद येथे पैगंबर मोहम्मद सल्ललाहुअलैह व सल्लम यांचे पोशाख व मू ए मुबारक चे दर्शन घेतले,1