जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीमुक्ती नव्हे स्त्री सन्मान कार्यक्रम; ३४५ महिलांचा गौरव जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीमुक्ती नव्हे स्त्री सन्मान कार्यक्रम; ३४५ महिलांचा गौरव विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान, मार्गदर्शन व प्रबोधन जागतिक महिला दिनानिमित्त अंबड येथे स्त्रीमुक्ती नव्हे स्त्री सन्मान’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३४५ महिलांचा सन्मान करण्यात आला. अंबडच्या नगराध्यक्ष श्रीमती देवायानी कुलकर्णी, मत्स्योदरी महिला मिडटाऊनच्या श्रीमती कीर्ती जोशी, अॅड. आशा गाडेकर, संरक्षण अधिकारी श्रीमती मीनाक्षी शिंदे, आशा तालुका संघटक श्रीमती रेखा जाधव, ब्रह्मकुमारी संस्थेच्या श्रीमती ज्योती भोरे, कैलाश राठी, शिवाजी गाडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विश्वप्रार्थनेने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित महिलांचे आगमन होताच नोंदणी करून त्यांचे स्वागत नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या पौष्टिक बीट, गाजर, पेंड व खजूर ज्यूसने करण्यात आले. त्यानंतर योगशिक्षिका श्रीमती स्वप्नजा तुपकर आणि श्रीमती शिल्पा शेलगावकर यांनी योगिक ध्यानसाधना घेतली. ‘विठ्ठल विठ्ठल’च्या ठेक्यावर पवनमुक्त हालचाली आणि विविध प्रकारच्या टाळ्यांच्या व्यायामामुळे वातावरण प्रसन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या पुणे येथील उद्योजिका तथा कीर्तनकार श्रीमती विभावरी येवले यांनी समाजप्रबोधनासाठी कार्य करणारे मुंबई जीवनविद्या मिशनचे प्रवर्तक सद्गुरू वामनराव पै यांच्या कार्याची माहिती दिली. महिलांचा आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक विकास साधण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ महाराज यांच्या शिकवणींचा आधार घेत आजच्या सामाजिक व मानसिक परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. यावेळी अंबड तालुका न्यायालयाच्या जेएमएफसी-३ न्यायाधीश श्रीमती श्वेता एस. परिहार यांनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावून महिलांना शुभेच्छा दिल्या व विधी सुविधांबाबत मार्गदर्शन केले. न्यायाधीशांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे आकर्षण वाढले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते केक कापून महिलांना उत्साहपूर्ण वातावरणात महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित सर्व महिलांसाठी चटणी, सॅलड व दुपारचे स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवा चित्राल यांनी केले व आभारप्रदर्शन केले.

- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली1
- अयोग्य मार्गदर्शनामुळे बांबू शेती करूण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले1
- भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.1
- महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..1
- देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।1
- यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1
- mujeeb shaikh1
- राज्यात 17 ते 25 मार्च दरम्यान पाऊस-हवामान अभ्यास पंजाब डक यांचा अंदाज1