logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील पाळधी/धरणगाव/जळगाव | प्रतिनिधी दि. 20 एप्रिल – एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून तिला डिजिटल स्वरूप देणे ही काळाची गरज आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळेल तसेच एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘RuPay On-The-Go’ प्रणालीवर आधारित NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. धरणगाव तालुक्यातील पाळधी बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुमारे 700 लाभार्थ्यांना सवलतीच्या प्रवासाचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळत असून जनजागृतीलाही चालना मिळत आहे. या उपक्रमांतर्गत “अमृत ज्येष्ठ नागरिक योजना”, “महिला सन्मान योजना” तसेच दिव्यांग प्रवासी सवलत योजना यांचा समावेश असून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, “75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना 50 टक्के सवलत आणि दिव्यांग बांधवांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजना शासनाची सामाजिक बांधिलकी दर्शवतात. प्रत्येक पात्र व्यक्तींनी पुढाकार घेऊन आपले कार्ड काढून घ्यावे आणि या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या स्मार्ट कार्डद्वारे ‘वॉलेट टॉप-अप’ सुविधा उपलब्ध असून किमान 100 रुपयांपासून रिचार्ज करता येणार आहे. बसमधील ई-तिकीट मशीन, संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप व अधिकृत केंद्रांमार्फत ही सेवा मिळणार आहे. आधार संलग्नतेमुळे प्रवास अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे. जिल्ह्यातील एसटी आगार व बसस्थानकांवर या कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीपीएस ग्रुपचे दिलीप माळी यांनी केले. प्रास्ताविक बसस्थानक नियंत्रक शिवाजी पाटील यांनी केले तर आभार सोपान माळी यांनी मानले. यांची होती उपस्थिती या वेळी शिवाजी पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, दिलीप माळी, सोपान माळी, आबा माळी, ग्रामपंचायत सदस्य चंदू इंगळे, अनिल माळी, समाधान माळी यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग उपस्थित होते.

4 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
4 hrs ago
e83f0da2-07f0-48a6-a56e-ae0c57ee3fe0

डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील पाळधी/धरणगाव/जळगाव | प्रतिनिधी दि. 20 एप्रिल – एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून तिला डिजिटल स्वरूप देणे ही काळाची गरज आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळेल तसेच एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘RuPay On-The-Go’ प्रणालीवर आधारित NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. धरणगाव तालुक्यातील पाळधी बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सुमारे 700 लाभार्थ्यांना

a1c66086-8fbf-4ee0-8401-4594dfa0f7c5

सवलतीच्या प्रवासाचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळत असून जनजागृतीलाही चालना मिळत आहे. या उपक्रमांतर्गत “अमृत ज्येष्ठ नागरिक योजना”, “महिला सन्मान योजना” तसेच दिव्यांग प्रवासी सवलत योजना यांचा समावेश असून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळत आहे. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, “75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना 50 टक्के सवलत आणि दिव्यांग बांधवांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजना शासनाची सामाजिक बांधिलकी दर्शवतात. प्रत्येक पात्र व्यक्तींनी पुढाकार घेऊन आपले कार्ड काढून घ्यावे आणि या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या स्मार्ट कार्डद्वारे ‘वॉलेट टॉप-अप’ सुविधा उपलब्ध असून किमान 100

49e33dee-168c-4488-b08f-4610112c9584

रुपयांपासून रिचार्ज करता येणार आहे. बसमधील ई-तिकीट मशीन, संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप व अधिकृत केंद्रांमार्फत ही सेवा मिळणार आहे. आधार संलग्नतेमुळे प्रवास अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे. जिल्ह्यातील एसटी आगार व बसस्थानकांवर या कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीपीएस ग्रुपचे दिलीप माळी यांनी केले. प्रास्ताविक बसस्थानक नियंत्रक शिवाजी पाटील यांनी केले तर आभार सोपान माळी यांनी मानले. यांची होती उपस्थिती या वेळी शिवाजी पाटील, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, दिलीप माळी, सोपान माळी, आबा माळी, ग्रामपंचायत सदस्य चंदू इंगळे, अनिल माळी, समाधान माळी यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग उपस्थित होते.

More news from Jalgaon and nearby areas
  • राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    1
    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    8 hrs ago
  • शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
    1
    शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल
    2
    माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल
    user_Samadhan More
    Samadhan More
    Dhule, Maharashtra•
    9 hrs ago
  • पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा अजमेर | १९ एप्रिल २०२६ राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची थरारक माहिती: वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी) बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील) कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज) बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे. बचावकार्य आणि उपचार: घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाची हालचाल: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे. आनंदाचा क्षण दु:खात बदलला मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…
    1
    पुष्कर घाटी बस दुर्घटना | राजस्थानमध्ये भीषण अपघात, कुटुंबावर शोककळा
अजमेर | १९ एप्रिल २०२६
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर घाटी परिसरात रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पीसांगन येथे एका मायरा (विवाह सोहळ्या) साठी निघालेली खासगी बस अचानक अनियंत्रित होऊन सुमारे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळली.
या बसमध्ये गुर्जर समाजातील एकाच कुटुंबातील ३१ ते ३३ जण प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत २ महिलांचा मृत्यू झाला असून २५ ते ३१ जण जखमी झाले आहेत. काही वृत्तांनुसार एका लहान बालकाचाही मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघाताची थरारक माहिती:
वेळ: १९ एप्रिल २०२६, दुपार
ठिकाण: अजमेर-पुष्कर मार्ग, पुष्कर घाटी (पुष्करपासून सुमारे ३ किमी आधी)
बसमध्ये प्रवासी: ३१–३३ (बहुतेक एकाच कुटुंबातील)
कारण: ड्रायव्हरचे नियंत्रण सुटणे किंवा यांत्रिक बिघाड (प्राथमिक अंदाज)
बस झाडे आणि झुडुपांमध्ये अडकली, त्यामुळे ती पूर्णपणे खोल दरीत कोसळण्यापासून काही प्रमाणात वाचली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र गंभीर जखमींची संख्या वाढली आहे.
बचावकार्य आणि उपचार:
घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलिस आणि SDRF पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना दोरखंडांच्या सहाय्याने वर काढून रुग्णवाहिकेतून अजमेर येथील JLN रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रशासनाची हालचाल:
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली असून उत्तम उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. बसचा फिटनेस व विमा याबाबतही तपास सुरू आहे.
आनंदाचा क्षण दु:खात बदलला
मायराच्या आनंदासाठी निघालेलं कुटुंब काही क्षणांतच शोकसागरात बुडालं आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना अतिशय दुःखद असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.
अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी अपडेट मिळवत राहा…
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • 👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    1
    👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    user_अरबाज शेख
    अरबाज शेख
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Subhash Suryavanshi
    1
    Post by Subhash Suryavanshi
    user_Subhash Suryavanshi
    Subhash Suryavanshi
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या लताबाई सोनार यांची स्थायी समिती सभापतीपदी, तर उज्वला ठाकरे यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपसभापती पदासाठी शोभा भील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली
    1
    धुळे महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या लताबाई सोनार यांची स्थायी समिती सभापतीपदी, तर उज्वला ठाकरे यांची महिला बालकल्याण समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपसभापती पदासाठी शोभा भील यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.