logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांना सर्वोतोपरी सहकारी सहकार्य - पालकमंत्री नरहरी झिरवाळ प्लास्टिक पॅरालिसिस प्रकल्पाचे लोकार्पण हिंगोली, दिनांक 17 : हिंगोलीच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या सकारात्मक उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. हिंगोली एमआयडीसी येथे प्लास्टिक पॅरालिसिस ऑईल फॅक्टरीचे लोकार्पण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते (ता.१६) रोजी झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सतीश टापरे आदी उपस्थित होते. प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने अशा प्रकल्पांना महत्त्व आहे. स्थानिक पातळीवर उद्योगांना चालना मिळाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच औद्योगिक विकासाला गती मिळण्यास मदत होईल, असे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्योजक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. प्रकल्पाची कार्यपद्धती आणि कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

3 hrs ago
user_Ganesh Sutar
Ganesh Sutar
सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
3 hrs ago

औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांना सर्वोतोपरी सहकारी सहकार्य - पालकमंत्री नरहरी झिरवाळ प्लास्टिक पॅरालिसिस प्रकल्पाचे लोकार्पण हिंगोली, दिनांक 17 : हिंगोलीच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या सकारात्मक उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. हिंगोली एमआयडीसी येथे प्लास्टिक पॅरालिसिस ऑईल फॅक्टरीचे लोकार्पण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते (ता.१६) रोजी झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सतीश टापरे आदी उपस्थित होते. प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने अशा प्रकल्पांना महत्त्व आहे. स्थानिक पातळीवर उद्योगांना चालना मिळाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच औद्योगिक विकासाला गती मिळण्यास मदत होईल, असे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्योजक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. प्रकल्पाची कार्यपद्धती आणि कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन! सेनगाव/विश्वनाथ देशमुख तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
    2
    देशभक्तीपर गीतांच्या वातावरणात कोळसा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा! "विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही"-संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ यांचे आश्वासन!
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यालयात दि.१७ सप्टेंबर गुरुवार रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.विविध अभिनव उपक्रम,सांगीतिक प्रबोधन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने या सोहळ्याला विशेष रंगत आणली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ८:०० वाजता संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाने झाली.यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.५ सप्टेंबर शिक्षकदिनी स्वयंशासन दिनाचा उपक्रम राबविण्यात आला होता.यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु.पूनम धोंडगे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सौरभ बिडगर यांनी विद्यालयाचा प्रशासकीय प्रभार अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळला.या दोन्ही विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाचे आणि कौशल्याचे कौतुक करत संस्थेच्या वतीने व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात केकत उंबरा (जि. वाशिम) येथील चेतन सेवांकुर म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप यांच्या देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांची मने जिंकली.तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देऊन सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचाही यावेळी संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला सेनगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.के.गव्हाणे, केंद्रप्रमुख डी.आर.पायघन आणि शाखा अभियंता टी. व्ही. पिनगाळे आदी मान्यवरांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ,सचिव अंकुशराव बेंगाळ,उपाध्यक्षा सौ.आनंदीताई बेंगाळ,प्राचार्य अभिषेकभैया बेंगाळ,मुख्याध्यापक व्ही. एम.सरकटे,मुख्याध्यापक आर.बी.शिंदे,पर्यवेक्षक पी.पी.कसाब,परीक्षा विभागप्रमुख चोपडे सर, नर्सिंग कॉलेज,बीसीए व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, तसेच केशवराव कापसे, पांडुरंग मोहिते,प्रितेश शिंदे व श्री.भोपाळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख व्याख्यात्या ह.भ.प. कुमारी भाग्यश्री मोहिते (परभणी) यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श राज्यकारभाराचे आणि राजमाता जिजाऊंच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास मांडला. "मुला-मुलींनी निष्ठेने राहून समाज व देशाची सेवा करावी," असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री.भास्करराव बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.ते म्हणाले की,"संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी सर्व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी सुविधांची कमतरता कधीही पडू देणार नाही.यापुढेही आणखी काही आधुनिक व हायटेक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,"असे ठाम आश्वासन त्यांनी यावेळी दिले.आर.बी.शिंदे यांनी केले उत्कृष्ट सूत्रसंचालन
या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन मुख्याध्यापक आर.बी.शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि कोळसा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.
    1
    इतिहास प्रसिद्ध आजेगाव येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा 
सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करून मराठवाडा मुक्ती संग्रामात शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मराठवाड्यात मोठा रणसंग्राम झाला होता यामध्ये सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी देखील निजामाच्या शत्रु सोबत सैन्यांची लढाई झाली होती यामध्ये शूरवीर जवान हुतात्मा बहिर्जी शिंदे यांना वीरमरण आले होते त्यांच्या पश्चात उभारण्यात आलेल्या हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी आज ध्वजारोहण करण्यात आले.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • शक्ती पिठ बधीत शेतकरी महिला आक्रमक, पालकमंत्री यांनी बदलला मार्ग सरकारवर लाडक्या बहिणी इतक्या भडकल्या की कॅबिनेट मंत्री झिरवळ साहेबांना मार्ग बदलावा लागला, या लाडक्या बहिणींचे संसार कुटुंब उध्वस्त होणार आहेत, कारण पिढ्यानपिढ्या जोपासलेली काळी आई नको असलेल्या शक्तीपीठ महामार्गामध्ये सरकार गुडूप करू पाहत आहे, मात्र जीव गेला तरी यावे जमिनीचा एक इंच तुकडा देणार नाही असं या सरकारच्या वयोवृद्ध लाडक्या बहिणी म्हणाल्या आहेत, खरंच सरकारने लाडक्या बहिणींचा शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून छळ सुरू केला आहे
    1
    शक्ती पिठ बधीत शेतकरी महिला आक्रमक, पालकमंत्री यांनी बदलला मार्ग 
सरकारवर लाडक्या बहिणी इतक्या भडकल्या की कॅबिनेट मंत्री झिरवळ साहेबांना मार्ग बदलावा लागला, या लाडक्या बहिणींचे संसार कुटुंब उध्वस्त होणार आहेत, कारण पिढ्यानपिढ्या जोपासलेली काळी आई नको असलेल्या शक्तीपीठ महामार्गामध्ये सरकार गुडूप करू पाहत आहे, मात्र जीव गेला तरी यावे जमिनीचा एक इंच तुकडा देणार नाही असं या सरकारच्या वयोवृद्ध लाडक्या बहिणी म्हणाल्या आहेत, खरंच सरकारने लाडक्या बहिणींचा शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून छळ सुरू केला आहे
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician Aundha (Nagnath), Hingoli•
    1 hr ago
  • पोत्रा येथे पवित्रेश्वर महादेव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्य दिप प्रज्वलन कार्यक्रम आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त  आज दि.17 सप्टेंबर रोजी कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील पवित्रेश्वर महादेव मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिषेक करून आरती केल्यानंतर दीप प्रज्वलन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव देशमुख ,भाजपा ज्येष्ठ नेते वसंतराव मुलगीर ,शंकरराव मुलगीर ,बुथ प्रमुख विकास रानगिरे ,भाऊराव चेभेले, शत्रुघ्न मुलगीर, बोल्डाचे बूथ प्रमुख साहेबराव ढोकणे, तेलंगवाडी बुथ प्रमुख भगवान खुडे ,दशरथ ससाने, रामराव मुलगीर,शिवशंकर मुलगीर,विकास भारती, सिताराम मुलगीर, दिगंबर रणवीर, भाऊ महाराज ,किशन मुलगीर ,सत्यम राणगिरे,देवानंद मुलगीर,पप्पू भुसनर,आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते .
    1
    पोत्रा येथे पवित्रेश्वर महादेव मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्य  दिप प्रज्वलन कार्यक्रम

आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त  आज दि.17 सप्टेंबर रोजी कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील पवित्रेश्वर महादेव मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिषेक करून आरती केल्यानंतर दीप प्रज्वलन केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव देशमुख ,भाजपा ज्येष्ठ नेते वसंतराव मुलगीर ,शंकरराव मुलगीर ,बुथ प्रमुख विकास रानगिरे ,भाऊराव चेभेले, शत्रुघ्न मुलगीर, बोल्डाचे बूथ प्रमुख साहेबराव ढोकणे, तेलंगवाडी बुथ प्रमुख भगवान खुडे ,दशरथ ससाने, रामराव मुलगीर,शिवशंकर मुलगीर,विकास भारती, सिताराम मुलगीर, दिगंबर रणवीर, भाऊ महाराज ,किशन मुलगीर ,सत्यम राणगिरे,देवानंद मुलगीर,पप्पू भुसनर,आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते .
    user_Shankar mulgir
    Shankar mulgir
    Reporter कळमनुरी, हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • 17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया. 17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.
    1
    17 सप्टेंबर2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची प्रतिक्रिया.
17 सप्टेंबर 2026 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संजय कुमार चव्हाण सर यांची विशेष प्रतिक्रिया.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार मंठा, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • संगणक टायपिंग परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करा; जिल्हा टंकलेखन संगणक टायपिंग संघटना व AISF चा प्रचंड मोर्चा संगणक टायपिंग परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करा; जिल्हा टंकलेखन संगणक टायपिंग संघटना व AISF चा प्रचंड मोर्चा
    1
    संगणक टायपिंग परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करा; 
जिल्हा टंकलेखन संगणक टायपिंग संघटना व AISF चा प्रचंड मोर्चा
संगणक टायपिंग परीक्षेचा निकाल तातडीने जाहीर करा; 
जिल्हा टंकलेखन संगणक टायपिंग संघटना व AISF चा प्रचंड मोर्चा
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए
    1
    स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए 
SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    Beverage Store उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील‌ भावनिक क्षण! सेनगाव/विश्वनाथ देशमुख मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले. मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले. दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.
    1
    पहाटे ३ वाजता पाटोद्यात बाप-लेकाची भेट;संघर्ष योध्दा मनोजदादा जरांगे पाटील आणि त्यांच्या वडिलांमधील‌ भावनिक क्षण!
सेनगाव/विश्वनाथ देशमुख 
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे वडील रावसाहेब जरांगे यांच्यातील भेटीचा एक अत्यंत भावूक क्षण बीडमधील पाटोदा नगरीत पाहायला मिळाला. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे ठीक तीन वाजता झालेल्या या दोन मिनिटांच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले.
मराठा आरक्षणाच्या संवाद दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांचे पाटोदा येथे मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आगमन झाले. एवढ्या उशिराही त्यांना ऐकण्यासाठी हजारो बांधवांनी मोठी गर्दी केली होती. रात्री अडीच वाजेपर्यंत सभा आटोपल्यानंतर,पहाटे तीनच्या सुमारास मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी त्यांचे वडील स्वतः त्या ठिकाणी पोहोचले.
दिवस-रात्र समाजाच्या हक्कासाठी प्रकृतीची पर्वा न करता लढणाऱ्या मुलाला समोर पाहून वडिलांचे डोळे भरून आले.तर वडिलांना समोर पाहताच मनोज जरांगे यांच्या चेहऱ्यावरही कमालीचे भाव दाटून आले.या दोन-तीन मिनिटांच्या संक्षिप्त भेटीत दोघांमध्ये फारसे शब्द बोलले गेले नाहीत;पण बापाने मुलाच्या पाठीवर टाकलेली मायेची थाप आणि दोघांच्या डोळ्यांतील मूक संवाद शब्दांच्या पलीकडचा होता. लाखो बांधवांसाठी लढणाऱ्या नेत्याला पहाटेच्या शांततेत मिळालेली ही पित्याची साथ सध्या सर्वत्र चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.
    user_Vishwanath Deshmukh
    Vishwanath Deshmukh
    सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.