कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने २० जून रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण सोहळ्याचे वेब कास्टिंग आणि शेतकऱ्यांसाठी एका विशेष 'हळद ज्ञान यज्ञ' कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश हळद पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे आणि नैसर्गिक पद्धतीने दर्जेदार हळद उत्पादनावर भर देणे हा होता. या 'हळद ज्ञान यज्ञात' बारामतीचे तज्ज्ञ जय पाटील आणि त्यांच्या टीमने हळद लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, कीड व रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः 'न्यूट्रि-सर्व' कंपनीच्या प्रयोगांमधून नैसर्गिक शेती आणि निर्यातक्षम हळद उत्पादनासाठी उपयुक्त तंत्र शेतकऱ्यांसमोर मांडण्यात आले. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी 'बायोचार' हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे सांगण्यात आले. वनस्पती अवशेषांपासून कोळसा तयार करून जमिनीचा पोत सुधारण्याचे तंत्र आणि यातून एक लघुउद्योग म्हणून संधी कशी निर्माण करता येईल, यावर ऑनलाइन चर्चासत्राद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा त्यांच्या जीवनमानावर झालेल्या सकारात्मक परिणामांवर आणि मिळालेल्या निधीच्या सुयोग्य विनियोगावर आपले मनोगत व्यक्त केले. कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ प्रा. अनिल ओळंबे, राजेश भालेराव, अजयकुमार सुगावे, डॉ. गीते आणि शिंदे मॅडम यांनी पिकांच्या संरक्षणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून कृषी तज्ज्ञांशी थेट संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून आधुनिक शेतीची माहिती आणि यशोगाथा पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना 'व्हिडिओ क्लिप्स' तयार करण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित शेतकऱ्यांसाठी माहितीपर दिनदर्शिकेचे (Calendar) वितरण करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या या 'ज्ञान यज्ञा'त परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने २० जून रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण सोहळ्याचे वेब कास्टिंग आणि शेतकऱ्यांसाठी एका विशेष 'हळद ज्ञान यज्ञ' कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश हळद पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे आणि नैसर्गिक पद्धतीने दर्जेदार हळद उत्पादनावर भर देणे हा होता. या 'हळद ज्ञान यज्ञात' बारामतीचे तज्ज्ञ जय पाटील आणि त्यांच्या टीमने हळद लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, कीड व रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः 'न्यूट्रि-सर्व' कंपनीच्या प्रयोगांमधून नैसर्गिक शेती आणि निर्यातक्षम
हळद उत्पादनासाठी उपयुक्त तंत्र शेतकऱ्यांसमोर मांडण्यात आले. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी 'बायोचार' हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे सांगण्यात आले. वनस्पती अवशेषांपासून कोळसा तयार करून जमिनीचा पोत सुधारण्याचे तंत्र आणि यातून एक लघुउद्योग म्हणून संधी कशी निर्माण करता येईल, यावर ऑनलाइन चर्चासत्राद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा त्यांच्या जीवनमानावर झालेल्या सकारात्मक परिणामांवर आणि मिळालेल्या निधीच्या सुयोग्य विनियोगावर आपले
मनोगत व्यक्त केले. कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ प्रा. अनिल ओळंबे, राजेश भालेराव, अजयकुमार सुगावे, डॉ. गीते आणि शिंदे मॅडम यांनी पिकांच्या संरक्षणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून कृषी तज्ज्ञांशी थेट संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून आधुनिक शेतीची माहिती आणि यशोगाथा पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना 'व्हिडिओ क्लिप्स' तयार करण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित शेतकऱ्यांसाठी माहितीपर दिनदर्शिकेचे (Calendar) वितरण करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या या 'ज्ञान यज्ञा'त परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
- हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.1
- खासदार नागेश आष्टीकर अखेर जनतेसमोर आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.1
- गेल्या तीन दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या दराटीच्या माकडाला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. वन विभागाला हे यश मिळाले असून, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर माकडाला पकडण्यात आले.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- संजय जाधवांसह सहा खासदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर जात आहेत. 27 जूनपासून दोन दिवसांसाठी उद्धव ठाकरे परभणीत मुक्कामी असतील, जिथे ते शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत. बंडानंतर पक्षाची संघटना नव्याने बांधण्यासाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- माळेगाव येथे संध्याकाळी ठीक ५:०० वाजता जोरदार पाऊस आणि वादळी वारे सुटले. या कारणामुळे नाल्यांमधील पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे. ही माळेगाव येथील सत्य घटना आहे.2