Shuru
Apke Nagar Ki App…
आ. रोहित पवार कर्जत - जामखेड मतदारसंघातून गायब ; भाजपाचे सुनील यादव आक्रमक
कर्जत लाईव्ह
आ. रोहित पवार कर्जत - जामखेड मतदारसंघातून गायब ; भाजपाचे सुनील यादव आक्रमक
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- शिरूर तालुक्यातील वरुडे-धामारी रोडवर भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून खड्ड्यात कोसळली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1
- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यात महसूल, पोलिस, कृषी व ग्राम विकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून आठ-आठ दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलन स्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह या सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या चार वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे. मात्र या कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली “जिल्हा प्रशासनाला तिरडी भेट” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती आधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील (शिवशक्ती भिमशक्ति प्रदेशाध्यक्ष) बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), सादेक सय्यद (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी), भिमराव कुटे (बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था), बबिता शिंदे (जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड), सीताबाई भोसले (रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष), हनुमान घोडके, भिमराव पायाळ सह आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकदा नागरिक आठवडाभर किंवा पंधरा दिवस उपोषण करतात. संबंधित विभागांनी दोन दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर रोड परिसरातील शासकीय कार्यालयांजवळील झाडे तोडल्याने आंदोलनकर्त्यांचा नैसर्गिक निवारा नाहीसा झाला आहे. त्या मुळे कडक उन्हात उपोषण करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, तातडीने निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. अशी मागणी करण्यात आली आहे. बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान नाली बांधकामासाठी अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्या मुळे शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, तातडीने नवीन स्वच्छतागृहे उभारावीत, अशी ही मागणी करण्यात आली आहे.1
- सोलापूरमध्ये रविवारी पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत वेदिका सासने हिला एकतर्फी पराभूत करून महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. या विजयानंतर अमृता पुजारी हिचे नाव महिला कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. हरीभाई देवकरण प्रशाला मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व निर्झरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.1
- अतिक्रम विभागांच्या बीटनिरक्षकाच काम फक्त नोटीस देणंच नव्हे .कारवाई करणे देखील त्यांचे कर्तव्य आहे1
- शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा वावर वाढून पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी अधिक पिंजरे लावण्याची मागणी केली आहे.वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, शेतात जाताना व सकाळ-संध्याकाळ विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.1