ऑस्ट्रियन महिलेच्या हरवलेल्या मोबाईलचा अर्ध्या तासात शोध श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तसेच शिवपुरी पंचकर्म केंद्राला भेट देण्यासाठी ऑस्ट्रिया देशातून आलेल्या एका महिलेचा सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा मोबाईल हरवल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता बसस्थानक ते शिवपुरी मार्गावर घडली होती. मात्र अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे हा मोबाईल अवघ्या अर्ध्या तासात शोधून संबंधित महिलेला परत मिळवून देण्यात यशस्वी झाले आहेत. ऑस्ट्रिया येथील आस्ट्रीकल बर नायरा या महिला अवकलकोट येथील शिवपुरी पंचकर्म केंद्रात आल्या असताना त्यांचा मोबाईल गहाळ झाला होता. याबाबत माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राजू कोळी, मुबारक पिंजारी, केदारनाथ सुतार आणि लक्ष्मीकांत देढे यांनी तत्काळ परिसरात चौकशी व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अवघ्या अर्ध्या तासात मोबाईल शोधून काढण्यात यश आला. मोबाईल परत मिळाल्यानंतर संबंधित महिलेने अक्कलकोट पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
ऑस्ट्रियन महिलेच्या हरवलेल्या मोबाईलचा अर्ध्या तासात शोध श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी तसेच शिवपुरी पंचकर्म केंद्राला भेट देण्यासाठी ऑस्ट्रिया देशातून आलेल्या एका महिलेचा सुमारे ५० हजार रुपये किंमतीचा मोबाईल हरवल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता बसस्थानक ते शिवपुरी मार्गावर घडली होती. मात्र अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे हा मोबाईल अवघ्या अर्ध्या तासात शोधून संबंधित महिलेला परत मिळवून देण्यात यशस्वी झाले आहेत. ऑस्ट्रिया येथील आस्ट्रीकल बर नायरा या महिला अवकलकोट येथील शिवपुरी पंचकर्म केंद्रात आल्या असताना त्यांचा मोबाईल गहाळ झाला होता. याबाबत माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राजू कोळी, मुबारक पिंजारी, केदारनाथ सुतार आणि लक्ष्मीकांत देढे यांनी तत्काळ परिसरात चौकशी व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अवघ्या अर्ध्या तासात मोबाईल शोधून काढण्यात यश आला. मोबाईल परत मिळाल्यानंतर संबंधित महिलेने अक्कलकोट पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
- माननीय मोहदय आमदार साहेब यांनी भूकंपग्रस्त विभाग याचे प्रश्न अधिवेशन मध्ये खूप चागल्या प्रकारे विषय घेऊन या गरीब 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्याचे सतत कर्यस्थ ब प्रयत्न करीत आहेत कारण आज भूकंप होऊन दुसरी पीडी चालू आहे प्रत्तेक घरात तीन चार वारस आहेत त्यांना घर नको का याचा पण या आमदार साहेबानो विचार करून मुद्दा अधिवेशन मध्ये उचलूम धरले आहेत या बद्दल मी महादेव शिंदे 132 भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याच्या वतीने आमदार साहेब याचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे1
- ------- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी ग्राम पंचायत हद्दीतील मुळुकवाडी ते मसेवाडी शिवरस्त्याचा प्रश्न तब्बल २५ वर्षांपासून प्रलंबित होता. भूमी अभिलेख कार्यालयात तीन वर्षांपूर्वी २१ हजार रुपये मोजणी शुल्क भरून ही प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर वस्तीवरील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या कडे पाठपुरावा केला. त्या नंतर तहसीलदार शेळके यांनी कठोर भूमिका घेत पोलिस बंदोबस्तात रस्त्याच्या खुणा करून देत रस्ता मोकळा करून दिला. सरपंच रामकिसन कदम व पांडुरंग कानडे यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना होणारी अडचण दूर झाली आहे. या बद्दल ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे आभार मानले आहेत. ----_---- पावसाळ्यातील अडचण दूर झाली. :– ग्रामस्थ --- पावसाळ्यात शाळा सुरू झाल्यानंतर शाळकरी मुलांना गुडघाभर चिखलातून शाळेत जावे लागत होते. तसेच आठवडी बाजार, भाजीपाला, दूध-दुभते, खत-बियाणे आणणे तसेच दवाखान्यात जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. तहसीलदार शेळके यांच्या सहकार्यामुळे ही २५ वर्षांपासूनची समस्या दूर झाली असून आम्ही त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. >-:-> शाकींदर काटकर (ग्रामस्थ) >-:-> ----_---- तहसीलदारांच्या कठोर भूमिकेमुळे प्रश्न सुटला... --- गेल्या २५ वर्षांपासून पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तीन वर्षांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयात २१ हजार रुपये मोजणीसाठी भरून ही मोजणी होत नव्हती. त्या मुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देत तहसीलदार शेळके यांच्या कडे पाठपुरावा करण्यात आला. सुरुवातीला खुणा करून ही काही ग्रामस्थ सहकार्य करत नसल्याने शेवटी पोलिस बंदोबस्तात रस्ता मोकळा करण्यात आला. तहसीलदार शेळके साहेब यांच्या ठाम भूमिकेमुळे ग्रामस्थांचा २५ वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागला. >-:-> डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर (सामाजिक कार्यकर्ते) >-:->1
- पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- सोहम माळवे1
- शेतकरी संघर्ष यात्रा कळमनुरी ते हिंगोली या पद यात्रेत हर्ष वर्धन सपकाळ प्रदेश अध्यक्ष, लोहा ता अध्यक्ष मधुकर दिघे, लोहा ता. उपाध्यक्ष उत्तम महाबळे. या पद यात्रेत लोहा येथील कांग्रेस कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता.1
- भिमाई व्याख्यानमाला मुखेडकरांसाठी एक प्रेरणादायक - डॉ.राहुल कांबळे मातोश्री भिमाई व्याख्यानमाला मुखेड मध्ये हे व्याख्यानाचे वादळ वर्षानुवर्षी वाढत चाललेला आहे आणि याला मुखेडकरानी चांगलाच प्रतिसाद देत आहेत डॉ.दिलीप पुंडे साहेबांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय प्रेरणादायक आहेत आरोग्य संस्कार व्यवसाय कौटुंबिक व्यवहारिक जीवन जीवनशैली आयुष्य जगत असताना ह्या साऱ्या गोष्टीची गरज आहेत डॉक्टर पुंडे सरांनी हाताची नाडी पकडता पकडता आणि कुटुंबातल्या वेदनाही त्यांनी जाणल्या आणि त्या वेदना उपचारीक करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या उद्दिष्टनातून ही व्याख्यानमाला आयुष्याला आकार देणारी ठरत आहे मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी झाला. “चला कुटुंब जपूया” या विषयावर युवराज पाटील यांचे मार्गदर्शन समाजासाठी निश्चितच विचारप्रवर्तक ठरले. आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचा दिलेला संदेश सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. अशा दर्जेदार आणि समाजप्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल आदरणीय डॉ. दिलीप पुंडे सर व तसेच सर्व संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.2
- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळुकवाडी शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वर बुधवारी (दि.११) दुपारी सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत एक काळवीट गंभीर जखमी झाले. मुळुकवाडी येथील सुखदेव वाणी व ग्रामस्थांनी जखमी काळवीटाला पाणी पाजून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र गंभीर दुखापत झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. काळवीट मृत्यूमुखी पडल्याची माहिती त्यांनी फोनद्वारे वनरक्षक महेश मेटे यांना दिली तसेच वनकर्मचारी तातडीने पाठविण्याची विनंती केली. राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी वर हरिण व काळवीट अज्ञात वाहनांच्या धडकेत जखमी होण्याच्या किंवा मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या महिन्यातही याच मुळुकवाडी शिवारात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरिणाला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले होते. मात्र या वेळी काळवीटाचा जागीच मृत्यू झाला. या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सावधानतेचे फलक लावावेत व वाहनचालकांना वेग मर्यादा पाळण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.1
- पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड झाली आहे. पणदरे गटातून निवडून आलेल्या किरण तावरे यांच्यावर संघटन कौशल्य आणि कामाच्या अनुभवाच्या जोरावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, ही निवड उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार झाल्याची माहिती समोर येत आहे. निवडीनंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण विकास, शेतकरी, महिला आणि युवकांसाठीच्या योजनांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.1
- *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 95610623693