logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी-चिंचवडच्या सन्मानाचा प्रश्न; बारणे यांचा इशारा.... पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराच्या अस्मितेच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक झाली असून महापालिका आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असा इशारा शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी दिला आहे. शहराच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे कोणतेही विधान सहन केले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. बारणे म्हणाले की, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहराच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवावी. चांगल्या कामांना शिवसेनेचा नेहमीच पाठिंबा राहील, मात्र शहराच्या अस्मितेविरोधात कोणी बोलत असेल तर त्याला तितक्याच ताकदीने विरोध केला जाईल. पिंपरी-चिंचवड हे संतांची आणि क्रांतीकारकांची भूमी असल्याची आठवण करून देताना त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि चापेकर बंधूंचा उल्लेख केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेचा वारसा या शहराला लाभल्याचे त्यांनी नमूद केले. हे शहर औद्योगिक आणि कामगारनगरी म्हणून विकसित झाले असून आज आयटी हब म्हणून जगाच्या नकाशावर आपले वेगळे स्थान निर्माण करत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहराच्या इतिहासाची आणि ओळखीची जाणीव ठेवूनच भूमिका मांडावी, असा सल्ला त्यांनी दिला. पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान असल्याचे सांगताना त्यांनी यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे, अजित पवार आणि शरद पवार यांचा उल्लेख केला. या सर्वांच्या नेतृत्वामुळे शहराने वेगाने प्रगती केली असून आज ते देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक बनले आहे, असे त्यांनी नमूद केले. “चूक मान्य करा, वाद टाळा” आयुक्तांनी केलेल्या विधानाबाबत त्यांनी थेट भूमिका घेत, “आपण चुकला आहात, हे मान्य करावे,” असे स्पष्टपणे सांगितले. अन्यथा शिवसेना आपल्या पारंपरिक आक्रमक शैलीत विरोध करेल, असा इशाराही त्यांनी दिला. शहराच्या सन्मानाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश शिवसेनेने या माध्यमातून दिला आहे.

16 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
16 hrs ago
573ad388-2d9e-4572-956e-569824611f4d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Maharashtra 18 news
    1
    Post by Maharashtra 18 news
    user_Maharashtra 18 news
    Maharashtra 18 news
    Pimpri Chanchwad, Pune•
    18 hrs ago
  • अंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून दोन समाजामध्ये वाद
    1
    अंजनगाव खेलोबा तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून दोन समाजामध्ये वाद
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे. सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत.... #पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या #PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews
    1
    पिंपरी चिंचवड : - 
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे.
सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत....
#पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या
#PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!
    1
    पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Prasad Panchal
    1
    Post by Prasad Panchal
    user_Prasad Panchal
    Prasad Panchal
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात गारपीठाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कांदा, मका, गहू, भाजीपाला पिके भुईसपाट; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी
    1
    राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात गारपीठाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कांदा, मका, गहू, भाजीपाला पिके भुईसपाट; तात्काळ नुकसान भरपाईची मागणी
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.