logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कर्जतच्या नागेश्वर मंदिरातील मूर्ती चोरण्याचा प्रयत्न; आरोपी जेरबंद कर्जत शहरातील नागेश्वर हेमाडपंथी मंदिरातील नागेश्वराची नागाची पितळी फणी व नागेश्वराची पितळी मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यातून चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या २३ वर्षीय आरोपीला कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. दि.२७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास कर्जत शहरातून ढेरे मळ्याकडे जाणाऱ्या रोडलगत असलेल्या नागेश्वर हेमाडपंथी मंदिरात ही घटना घडली. मंदिरातील नागेश्वराची नागाची पितळी फणी व नागेश्वराची पितळी मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणून ठेवलेली होती. एक इसम बाजूला लपून बसलेला असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर फॉरेन्सिक पथक तसेच डॉग स्क्वॉड पथकाला पाचारण करून संशयित इसमाचा शोध घेण्यात आला. संशयितास ताब्यात घेऊन त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने आपले नाव अमोल छगन समुद्र, वय २३ वर्षे, रा. समुद्रमळा, ता. कर्जत असे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. या प्रकरणी फिर्यादी उदयकुमार पोपटलाल बलदोटा, रा. बाजारतळ, कर्जत यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल छगन समुद्र (वय २३) याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ६२, ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल छगन समुद्र यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.

51 min ago
user_कर्जत लाईव्ह
कर्जत लाईव्ह
Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
51 min ago
5f899e2c-d45b-43c7-930c-85bc548fcbf9

कर्जतच्या नागेश्वर मंदिरातील मूर्ती चोरण्याचा प्रयत्न; आरोपी जेरबंद कर्जत शहरातील नागेश्वर हेमाडपंथी मंदिरातील नागेश्वराची नागाची पितळी फणी व नागेश्वराची पितळी मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यातून चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या २३ वर्षीय आरोपीला कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे. दि.२७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास कर्जत शहरातून ढेरे मळ्याकडे जाणाऱ्या रोडलगत असलेल्या नागेश्वर हेमाडपंथी मंदिरात ही घटना घडली. मंदिरातील नागेश्वराची नागाची पितळी फणी व नागेश्वराची पितळी मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात आणून ठेवलेली होती. एक इसम बाजूला लपून बसलेला असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर फॉरेन्सिक पथक तसेच डॉग स्क्वॉड पथकाला पाचारण करून संशयित इसमाचा शोध घेण्यात आला. संशयितास ताब्यात घेऊन त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने आपले नाव अमोल छगन समुद्र, वय २३ वर्षे, रा. समुद्रमळा, ता. कर्जत असे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. या प्रकरणी फिर्यादी उदयकुमार पोपटलाल बलदोटा, रा. बाजारतळ, कर्जत यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल छगन समुद्र (वय २३) याच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ६२, ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल छगन समुद्र यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६ खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली. खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली. “अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.
    1
    खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली
खेड बु!! तुळशी वृंदावन येथे दोन वाहनांचा अपघात; जीवितहानी टळली
खड्डेमय रस्ता, धोकादायक वळणे अन् वाढती वाहतूक; PWD विभागाने तातडीने दुरुस्ती करावी
खेड बु!! | वार : शुक्रवार | दिनांक : २८/८/२०२६
खंडाळा–लोणंद मार्गावरील तुळशी वृंदावन येथे एमएच ११ ए.डब्ल्यू. ६०२३ आणि एमएच ०४ के.यू. १०९६ या दोन वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी टळली.
अपघाताची माहिती मिळताच खंडाळा रेस्क्यू टीमने तत्काळ मदतकार्य केले, तर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व गर्दी नियंत्रणात आणली.
खेड बुद्रुक–लोणंद रस्ता प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेला असून रस्ता अरुंद आणि ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्हॉइस ऑफ मीडिया खंडाळा तालुका संपर्क प्रमुख सुनिल रासकर यांनी यापूर्वीही सातत्याने आवाज उठविला असून साथ प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही पाठपुरावा केला आहे. अपघातावेळी सुनिल रासकर व आर.पी.आय. खंडाळा तालुका अध्यक्ष यांच्या सतर्कतेमुळे पुढील मदत मिळण्यास मदत झाली.
“अजून किती जीव गेल्यावर PWD जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
जीवितहानी टळली; मात्र धोका कायम! PWD ने आता तरी जागे व्हावे.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बारामतीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन; वृक्षाला राखी बांधून अजितदादांच्या आठवणींना उजाळा
    1
    बारामतीमध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन; वृक्षाला राखी बांधून अजितदादांच्या आठवणींना उजाळा
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • डॉक्टरने मेडिकल मधील औषध गोळ्या घेण्यासाठी कॅपिटल अक्षर आवश्यक.
    1
    डॉक्टरने मेडिकल मधील औषध गोळ्या घेण्यासाठी कॅपिटल  अक्षर आवश्यक.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .
    1
    बीड वकील संघ सचिव नितीन शिंदे तर कोषाध्यक्ष पदी विद्या गायकवाड यांची निवड झाल्याने केला भव्य सत्कार 
बीड २८(प्रतिनिधी)बीड वकील संघाचे महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी कोषाध्यक्ष विद्या गायकवाड सचिव नितीन शिंदे यांचा बीड वकील संघ 2026 च्या निवडणुकीत विजयी  प्रतिनिधी यांचा पेढे भरवुन भव्य सत्कार ॲड सुनिल साळवे व अँड महेंद्र जाधव यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक वकील बांधव व भगीणी यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बीड वकील संघाच्या निवडणुकी दरम्यान  झालेल्या मत मोजणी द्वारा घोषीत  महीला प्रतिनिधी प्रेरणा सुर्यवंशी 8 मताने तर सचिव नितीन शिंदे २३ मताने व कोषाध्यक्ष म्हणुन विद्या गायकवाड 25 मताने विजयी झाल्या , या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अॅड सुनील साळवे यांनी विशेष परीश्रम घेतले .
    user_Journalist Rajeshkumar Jogdand
    Journalist Rajeshkumar Jogdand
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला. संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले. खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले. या मेळाव्यातील काही खास क्षण: पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली. या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
    2
    ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
बीड प्रतिनिधी 
बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला.
संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस
सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले.
खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा
तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले.
या मेळाव्यातील काही खास क्षण:
पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला.
सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.
रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली.
या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
    1
    राहुरी फॅक्टरी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांचे जंगी स्वागत
राहुरी फॅक्टरीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे उत्साहात स्वागत
राहुरी फॅक्टरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आज मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या प्रवरानगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेऊन बारामतीकडे मोटारीने रवाना झाल्या. यावेळी राहुरी फॅक्टरी येथे त्यांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी आ.संग्राम जगताप, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे, साई आदर्शचे वेदांत कपाळे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, युवा नेते किरण कडू,अमृत धुमाळ, संजय पोटे, सुखदेव मुसमाडे,यमनाजी आघाव, आप्पासाहेब ढुस, पंढरीनाथ पवार,कारभारी खुळे,अनिल चव्हाण,रंगनाथ घाडगे, वैशाली नान्नोर,साई त्रिभुवन,सोमा आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • धाराशिव–उस्मानाबाद व परिसरातील दिनांक २८/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी या व्हिडिओमध्ये पाहा. 📢 धाराशिव–उस्मानाबाद व परिसरातील दिनांक २८/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी या व्हिडिओमध्ये पाहा. जिल्ह्यातील महत्त्वाच्या स्थानिक बातम्या, नागरिकांच्या समस्या, प्रशासनाशी संबंधित घडामोडी, सामाजिक विषय आणि परिसरातील ताज्या अपडेट्स जाणून घ्या. 🔴 झुंजार SC 37 NEWS OSMANABAD स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा. 📞 बातमी, मुलाखत व जाहिरातीसाठी संपर्क: 08805974164 🔑 Keywords / कीबोर्ड धाराशिव बातम्या, उस्मानाबाद बातम्या, धाराशिव न्यूज, उस्मानाबाद न्यूज, धाराशिव आजच्या बातम्या, धाराशिव ताज्या बातम्या, उस्मानाबाद ताज्या बातम्या, धाराशिव दहा ठळक घडामोडी, 28 ऑगस्ट 2026 बातम्या, धाराशिव परिसरातील बातम्या, उस्मानाबाद परिसरातील बातम्या, महाराष्ट्र न्यूज, मराठी न्यूज, आजच्या दहा ठळक बातम्या, झुंजार SC 37 NEWS, Osmanabad News, Dharashiv News #️⃣ Hashtags #धाराशिव #उस्मानाबाद #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #आजच्याबातम्या #ताज्याबातम्या #दहा_ठळक_घडामोडी #महाराष्ट्रन्यूज #मराठीन्यूज #DharashivNews #OsmanabadNews #BreakingNews #MarathiNews #ZunjharSC37News
    1
    धाराशिव–उस्मानाबाद व परिसरातील दिनांक २८/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी या व्हिडिओमध्ये पाहा.

📢 धाराशिव–उस्मानाबाद व परिसरातील दिनांक २८/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी या व्हिडिओमध्ये पाहा.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या स्थानिक बातम्या, नागरिकांच्या समस्या, प्रशासनाशी संबंधित घडामोडी, सामाजिक विषय आणि परिसरातील ताज्या अपडेट्स जाणून घ्या.
🔴 झुंजार SC 37 NEWS OSMANABAD
स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा.
📞 बातमी, मुलाखत व जाहिरातीसाठी संपर्क: 08805974164
🔑 Keywords / कीबोर्ड
धाराशिव बातम्या, उस्मानाबाद बातम्या, धाराशिव न्यूज, उस्मानाबाद न्यूज, धाराशिव आजच्या बातम्या, धाराशिव ताज्या बातम्या, उस्मानाबाद ताज्या बातम्या, धाराशिव दहा ठळक घडामोडी, 28 ऑगस्ट 2026 बातम्या, धाराशिव परिसरातील बातम्या, उस्मानाबाद परिसरातील बातम्या, महाराष्ट्र न्यूज, मराठी न्यूज, आजच्या दहा ठळक बातम्या, झुंजार SC 37 NEWS, Osmanabad News, Dharashiv News
#️⃣ Hashtags
#धाराशिव #उस्मानाबाद #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #आजच्याबातम्या #ताज्याबातम्या #दहा_ठळक_घडामोडी #महाराष्ट्रन्यूज #मराठीन्यूज #DharashivNews #OsmanabadNews #BreakingNews #MarathiNews #ZunjharSC37News
    user_आप्पा भगवान सिरसाठे
    आप्पा भगवान सिरसाठे
    Newspaper publisher उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    31 min ago
  • सातारा तालुका पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्सव उत्साहात संपन्न
    1
    सातारा तालुका पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्सव उत्साहात संपन्न
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.