व्यापाऱ्यांच्या व पोलिसांचा संवाद वाढविणार; शहरातील पार्किंग, वाहतूक व सुरक्षा प्रश्नांवर व्यापारी मेळाव्यात चर्चा शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: देशाच्या आर्थिक प्रगतीत व्यापारी वर्गाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून बदलत्या काळात सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले. अखिल एकता उद्योग व्यापार मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त शिरूर येथील सरदार पेठेतील ओम लाईट हाऊस येथे आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पारनेरचे नायब तहसीलदार आकाश किसवे, कापड असोसिएशनचे निलेश पिपाडा, र. मामा धोंडगे, नगरसेवक राजेंद्र लोळगे, नगरसेवक उमेश शेळके, भाजपच्या रेश्मा शेख, भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. संपत लोखंडे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, विजय नरके, निलेश भळगट, महावीर कर्नावट, प्रा. रासकर आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विनोद पाटील म्हणाले की, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.व्यापाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येक दुकानात तसेच परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. व्यापारी आणि पोलिसांमध्ये परस्पर विश्वास व सहकार्याची भावना अधिक दृढ होणे आवश्यक असून, व्यापाऱ्यांशी नियमित संवाद साधण्यासाठी पुढील काळात बैठका आयोजित करण्यात येतील. नायब तहसीलदार आकाश किसवे यांनी व्यापाऱ्यांनी संघटितपणे आपल्या समस्या मांडण्याची गरज व्यक्त केली. अखिल एकता उद्योग व्यापार मंडळाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जात असल्याचे सांगत त्यांनी बँकिंग व आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाच्या आवश्यक दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्यात व्यापारी वर्गासमोरील विविध समस्या, व्यापाऱ्यांशी संबंधित कायदे, व्यवसायातील अडचणी तसेच विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. प्रास्ताविक प्रवीण भंडारी यांनी केले. व्यवसायिक प्रा. संपत लोखंडे यांनी शहरातील पार्किंगची समस्या मांडली. नगरसेवक राजेंद्र लोळगे यांनी व्यापाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासह सराफ कट्टा परिसरात गस्ती पथक कार्यान्वित करण्याची मागणी केली. बांधकाम व्यावसायिक अतुल बोथरा, प्रकाश चोपडा, निलेश पिपाडा आणि राजेश शिंगवी यांनीही व्यापारी वर्गाच्या विविध अडचणी मांडल्या. नगरसेवक उमेश शेळके यांनी मोकाट जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच वाहतूक आणि पार्किंग प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलिसांची संयुक्त बैठक घेण्याची सूचना केली. व्यावसायिक बगाडे यांनी पार्किंगचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे आभार नितीन भंडारी यांनी मानले.
व्यापाऱ्यांच्या व पोलिसांचा संवाद वाढविणार; शहरातील पार्किंग, वाहतूक व सुरक्षा प्रश्नांवर व्यापारी मेळाव्यात चर्चा शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: देशाच्या आर्थिक प्रगतीत व्यापारी वर्गाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून बदलत्या काळात सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी केले. अखिल एकता उद्योग व्यापार मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त शिरूर येथील सरदार पेठेतील ओम लाईट हाऊस येथे आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पारनेरचे नायब तहसीलदार आकाश किसवे, कापड असोसिएशनचे
निलेश पिपाडा, र. मामा धोंडगे, नगरसेवक राजेंद्र लोळगे, नगरसेवक उमेश शेळके, भाजपच्या रेश्मा शेख, भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. संपत लोखंडे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, विजय नरके, निलेश भळगट, महावीर कर्नावट, प्रा. रासकर आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विनोद पाटील म्हणाले की, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.व्यापाऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येक दुकानात तसेच परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. व्यापारी आणि पोलिसांमध्ये परस्पर विश्वास व सहकार्याची भावना अधिक दृढ होणे आवश्यक असून, व्यापाऱ्यांशी नियमित संवाद साधण्यासाठी पुढील
काळात बैठका आयोजित करण्यात येतील. नायब तहसीलदार आकाश किसवे यांनी व्यापाऱ्यांनी संघटितपणे आपल्या समस्या मांडण्याची गरज व्यक्त केली. अखिल एकता उद्योग व्यापार मंडळाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जात असल्याचे सांगत त्यांनी बँकिंग व आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाच्या आवश्यक दक्षतेबाबत मार्गदर्शन केले. मेळाव्यात व्यापारी वर्गासमोरील विविध समस्या, व्यापाऱ्यांशी संबंधित कायदे, व्यवसायातील अडचणी तसेच विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. प्रास्ताविक प्रवीण भंडारी यांनी केले. व्यवसायिक प्रा. संपत लोखंडे यांनी
शहरातील पार्किंगची समस्या मांडली. नगरसेवक राजेंद्र लोळगे यांनी व्यापाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासह सराफ कट्टा परिसरात गस्ती पथक कार्यान्वित करण्याची मागणी केली. बांधकाम व्यावसायिक अतुल बोथरा, प्रकाश चोपडा, निलेश पिपाडा आणि राजेश शिंगवी यांनीही व्यापारी वर्गाच्या विविध अडचणी मांडल्या. नगरसेवक उमेश शेळके यांनी मोकाट जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या तसेच वाहतूक आणि पार्किंग प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलिसांची संयुक्त बैठक घेण्याची सूचना केली. व्यावसायिक बगाडे यांनी पार्किंगचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे आभार नितीन भंडारी यांनी मानले.
- सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक लढा उभारण्याचे आवाहन; शिरूर {. डेली न्यूज पोस्ट टीम 24}सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे वाढते संकट थांबवणे हे पोलिसा बरोबर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. सजग आणि सतर्क राहूनच या संकटावर मात करता येईल. सायबर गुन्ह्यांचे संकट आता प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचले असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले. शिरूर पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे व अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते, राकेश मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रवींद्र भोसले म्हणाले, "छुप्या पद्धतीने तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा एपीके (APK) फाईल कधीही डाउनलोड करू नयेत. ओटीपी कोणालाही सांगू नये तसेच बनावट लोन अॅप्सपासून सावध राहावे." पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, अनोळखी व्यक्तींना ओटीपी देऊ नका, खात्री केल्याशिवाय कोणतीही फाईल डाउनलोड करू नका आणि बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी १९३० हा राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक असल्याची माहितीही त्यांनी दिली. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत बोलताना नखाते म्हणाले की, गांजा, अफू, चरस आणि विशेषतः एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थांचे व्यसन तरुणांमध्ये वाढत आहे. थ्रिलच्या नादात अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या आहेत. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, त्यांच्या मित्रपरिवार आणि हालचालींकडे लक्ष द्यावे. युवकांनी जीवनाचे ध्येय निश्चित करून प्राणायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस शिरूर नगरपालिकेच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, मीना पाडळे, हनुमंत सोनवणे, राजाराम चौरे, सुदर्शन भाकरे, गणेश पवार, विशाल गदादे, संदीप पवार, रोहित दाते, अशोक पाचुंदकर, अर्चना थोरात, वर्षा पवार, सोनल गोरडे, राहुल जगताप, स्नेहल निचित, सर्जेराव बोऱ्हाडे, भानुदास रोकडे, बाबासाहेब शेलार, भास्कर ओव्हाळ, शितल गायकवाड, वैशाली गायकवाड, ऋतुजा वराळ, पल्लवी पुदगाणे, विशाल कारखिले, इंदिरा जाधव, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, रेश्मा शेख, शोभना पाचंगे, रवींद्र सानप, ज्योती गायकवाड, उर्मिला कुसेकर, उत्तम शेलार, अमित उकिरडे, दिव्या कारकूड, शोभा मंदीलकर, संदीप भोगावडे, देवल शहा, रामभाऊ सरोदे, नितीन भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अमोल गारुडी यांनी मानले.4
- दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली अहिल्यानगर साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. *आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी* आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.1
- "पुढे काय होईल याची शक्यता आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतात स्मार्टफोन...!"1
- मोहम्मदवाडीत मध्यरात्रीचा हैदोस! राहेजा व्हिस्टा प्रीमियरसमोर स्टंटबाजी, नागरिकांची पोलिसांकडे कारवाईची मागणी1
- Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले Pune : खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले1
- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन पुणे, दि. १: साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार अमित गोरखे, योगेश टिळेकर, चेतन तुपे, हेमंत रासने आदी उपस्थित होते. #annabhausathejayanti #amitshah #devendrafadnavis #lokshahirannabhausathe #अण्णाभाऊसाठेजयंती पुणे, AmitShahIn Pune, साहित्यरत्न, MaharashtraPolitics, Pune,1
- CJP आंदोलनात पोलीस व्हॅन अडवणाऱ्या रियाचा राज ठाकरेंकडून जाहीर सत्कार; पुन्हा चर्चेत 'रिया'!1
- अमित शाहांच्या पुणे दौऱ्याआधी वसंत मोरे यांच्यावर पोलिसांची कारवाई!1