logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता; यवतमाळ भाजप जिल्ह्याध्यक्षाच्या आरोपांची मंत्री अशोक उईकेंकडून दखल, पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे. त्यात त्यांची मानवी तस्करी (Yavatmal Crime News) केली जात असल्या ची धक्का दायक प्रकार समोर आला आहे.यात एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातीलसंभाषणाचीकथितऑडिओ क्लिप (Audio Clip) समोरआली आहे. त्यात कशा पध्दतीने मानवी तस्करी (Crime News)केली जाते, हे सांगितलं जातं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचादावाकरण्यातआलाआहे. दरम्यान, यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा गंभीर आरोप करत देह व्यापार, मानवी तस्करी यांसारखे गंभीर प्रकार सुरू असल्याचा अतिशय धक्कादायक दावा प्रफुल चव्हाण यांनी केला आहे. अशातच, चव्हाण यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल घेण्यातआलीअसून मंत्री डॉ. अशोक उईकेंनी (Ashok Uike) याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतलीय.

3 hrs ago
user_अरबाज शेख
अरबाज शेख
Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
3 hrs ago
8337301f-3ba7-4aa0-ac7b-cde057436021

सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता; यवतमाळ भाजप जिल्ह्याध्यक्षाच्या आरोपांची मंत्री अशोक उईकेंकडून दखल, पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सहा महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे. त्यात त्यांची मानवी तस्करी (Yavatmal Crime News) केली जात असल्या ची धक्का दायक प्रकार समोर आला आहे.यात एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातीलसंभाषणाचीकथितऑडिओ क्लिप (Audio Clip) समोरआली आहे. त्यात कशा पध्दतीने मानवी तस्करी (Crime News)केली जाते, हे सांगितलं जातं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचादावाकरण्यातआलाआहे. दरम्यान, यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा गंभीर आरोप करत देह व्यापार, मानवी तस्करी यांसारखे गंभीर प्रकार सुरू असल्याचा अतिशय धक्कादायक दावा प्रफुल चव्हाण यांनी केला आहे. अशातच, चव्हाण यांच्या आरोपांची आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल घेण्यातआलीअसून मंत्री डॉ. अशोक उईकेंनी (Ashok Uike) याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतलीय.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • 👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    1
    👩‍💻 *गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना*
    user_अरबाज शेख
    अरबाज शेख
    Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा
    1
    सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने लाभार्थ्यांच्या तक्रारीला कंटाळून रोजगार सेवकांनी दिला राजीनामा
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    1
    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    19 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रतिनिधी D.M...
घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप
मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही.
कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    1
    संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद 
छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
🔹 घटनेचा तपशील:
माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही.
🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग:
घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण:
भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔹 पोलिसांचे आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • येथील शिंदे पाटील फाऊंडेशनतर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धा, अर्थात 'शिंदे पाटील चषक २०२६' सध्या मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या स्पर्धेला दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. ​यावेळी बोलताना खासदार भगरे म्हणाले की, "खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते युवकांमध्ये शिस्त आणि जिद्द निर्माण करण्याचे उत्तम माध्यम आहे." खेळासोबतच १०० गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्याच्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. आयोजक अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे पाटील यांच्या हस्ते खासदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. ​याप्रसंगी कुणाल दराडे, शाहू राजे शिंदे, विशाल परदेशी, नाना भाऊ शिंदे, अरुण काका शिंदे, शंभूराजे शिंदे, प्रशांत शिंदे, दादा फिटर, सुनील शिंदे, अमोल शिंदे, प्रशांत शिनकर, संजय शिंदे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, पप्पू वाणी, राजू बाकळे आणि योगेश सोनवणे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदारांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची रंगत वाढली असून खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
    1
    येथील शिंदे पाटील फाऊंडेशनतर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल डे-नाईट क्रिकेट स्पर्धा, अर्थात 'शिंदे पाटील चषक २०२६' सध्या मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या स्पर्धेला दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला.
​यावेळी बोलताना खासदार भगरे म्हणाले की, "खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते युवकांमध्ये शिस्त आणि जिद्द निर्माण करण्याचे उत्तम माध्यम आहे." खेळासोबतच १०० गरजू कुटुंबांना किराणा वाटप करण्याच्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. आयोजक अध्यक्ष गणेशभाऊ शिंदे पाटील यांच्या हस्ते खासदारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
​याप्रसंगी कुणाल दराडे, शाहू राजे शिंदे, विशाल परदेशी, नाना भाऊ शिंदे, अरुण काका शिंदे, शंभूराजे शिंदे, प्रशांत शिंदे, दादा फिटर, सुनील शिंदे, अमोल शिंदे, प्रशांत शिनकर, संजय शिंदे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, पप्पू वाणी, राजू बाकळे आणि योगेश सोनवणे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदारांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची रंगत वाढली असून खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे नळाला मोटर लावत असताना बारा वर्षे चिमुकल्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटने प्रकरणी पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे नळाला मोटर लावत असताना बारा वर्षे चिमुकल्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदर घटने प्रकरणी पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.