मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मात्र, हवामान अंदाजानुसार, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याचे दिसून येते. सध्याच्या हवामान अंदाजानुसार, किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस व्यापक क्षेत्रावर पेरणीसाठी पोषक ठरेल अशी परिस्थिती सध्या तरी नाही. दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विशेषतः, विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी व नागरिकांना आवाहन केले आहे की, आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. तसेच, विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.
मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मात्र, हवामान अंदाजानुसार, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. यामुळे
या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याचे दिसून येते. सध्याच्या हवामान अंदाजानुसार, किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस व्यापक क्षेत्रावर पेरणीसाठी
पोषक ठरेल अशी परिस्थिती सध्या तरी नाही. दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विशेषतः, विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज
आहे. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी व नागरिकांना आवाहन केले आहे की, आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. तसेच, विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.
- अमरावती शहरामध्ये प्रतिबंधात्मक कलम 37 (1) आणि (3) लागू करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी केली आहे.1
- वर्धा जिल्हा पोलीस स्टेशन आर्वी JKV NEWS 24 Page ko like kariye1
- अंजनगाव सुर्जी येथील प्रभात नंबर १३ नवगछी प्लँटजवळ गेल्या ५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. याबाबत अंजनगाव नगर परिषदेकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसून, हा कचरा उचलण्यासाठी कुणीही आलेले नाही.1
- दर्यापूर पोलिसांनी ‘ऑपरेशन सुरक्षा कवच’ या विशेष मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे यशस्वीरित्या आयोजन केले. या रॅलीचा मुख्य उद्देश युवकांना व्यसनांच्या विळख्यातून दूर ठेवणे हा होता. पोलिसांनी या माध्यमातून ‘नशामुक्त दर्यापूर’ चा प्रभावी संदेश देत, एक प्रकारे नशामुक्तीचा एल्गारच पुकारला.1
- मुंबई लोकल ट्रेनमधील हत्या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ७ दिवसांच्या पोलीस कोठडीत (PC) पाठवण्याचा आदेश कायम ठेवला आहे. आता पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत हत्येची कारणे आणि अन्य पैलूंचा तपास करतील.1
- वरुण राजाच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावर संत मुक्ताबाईंच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे.1
- शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत अर्वाच्च शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांची माफी कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेने स्पष्ट केले आहे. एस. एम. देशमुख यांनी ठाम भूमिका मांडत "माफी नव्हे, गुन्हा दाखल करा!" अशी मागणी केली असून, या कारवाईसाठी राज्यभर पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे. संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकारांच्या प्रश्नांवर संताप व्यक्त करत, "पुन्हा माझ्याकडे आलात तर मारून टाकीन" अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांनी पत्रकारांना अर्वाच्च शिवीगाळ करत "तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, माझी तक्रार करा" अशा शब्दांचा वापर केल्याने पत्रकार संघटनांसह राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला. या घटनेनंतर महाड, पाटण, पिंपरी-चिंचवड आणि नांदेडसह विविध ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. अनेक पत्रकार संघटनांनी पोलिसांकडे तक्रारी दिल्या, तर विविध राजकीय पक्षांनीही या घटनेचा निषेध केला. वाढत्या दबावामुळे संजय दिना पाटील यांनी नंतर एका व्हिडिओद्वारे माफी मागितली. मात्र, एस. एम. देशमुख यांनी ही माफी मान्य नसल्याचे सांगत म्हटले आहे की, "अगोदर धमक्या द्यायच्या, शिवीगाळ करायची आणि नंतर माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करायचा, ही नौटंकी आम्हाला मान्य नाही." "अपराध केला आहे, त्यामुळे कायद्यानुसार गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे," यावर त्यांनी भर दिला. दरम्यान, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करून संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करणार आहेत. यासोबतच, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदने देऊन कठोर कारवाईची मागणीही करण्यात येणार असल्याची माहिती एस. एम. देशमुख यांनी दिली.1
- अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात वादळी वाऱ्याने प्रकाश बाहेकर यांच्या घराचे छप्पर उडून गेले आहे. या वादळाच्या कहराने बाहेकर कुटुंबाच्या संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून, ते उघड्यावर आले आहेत. त्यामुळे कुटुंबाने प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे.1