logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञान स्रोत केंद्राने आणि 'सेज जर्नल्स'ने संयुक्तपणे 'एन्हांसिंग रिसर्च एक्सलन्स विथ ओएनओएस' या विषयावर एका विशेष ऑनलाईन लेखक कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश संशोधन क्षेत्रात जागतिक दर्जाची मानके आत्मसात करणे आणि संशोधनाची दृश्यमानता वाढवणे हा होता. सध्याच्या स्पर्धात्मक युगात उत्कृष्ट संशोधन करण्यासोबतच ते योग्य व्यासपीठावर प्रकाशित करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याच अनुषंगाने, 'सेज पब्लिकेशन्स'चे वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशिक्षण आणि विश्लेषण) श्री. मनोज गुप्ता यांनी उपस्थित संशोधकांना सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी ओएनओएस प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर कसा करावा, हस्तलिखित सादर करताना कोणती काळजी घ्यावी आणि जागतिक प्रकाशन मानकांनुसार संशोधनाचा दर्जा कसा उंचावावा, याविषयी महत्त्वाची तंत्रे आणि प्रात्यक्षिके सादर केली. संशोधनपर लेख का, कसे आणि कुठे प्रकाशित करावे, तसेच संशोधनपर लेख कसा लिहावा, वांग्मयचौर्य (प्लॅगरिझम) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या संदर्भातील प्रश्नांनाही त्यांनी उत्तरे दिली. ही कार्यशाळा विद्यापीठाचे माननीय कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मुख्य उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. ज्ञान स्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. 'सेज जर्नल्स'च्या ग्राहक प्रशिक्षण आणि संवाद समन्वयक शगुन गोयल आणि रेणू राणा याही कार्यशाळेत उपस्थित होत्या. विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रकाश निहलानी, ‘नॅक’, ‘आय.क्यू.ए.सी.’ आणि ‘एन.आय.आर.एफ.’ चे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. नितीन दारकुंडे, डॉ. उदय दिव्यवीर, डॉ. स्मिता पाटील, डॉ. शिवाजी सोनटक्के, डॉ. सुनिता माने, डॉ. अभिजित पांडे आणि डॉ. अरुण हंबर्डे यांच्यासह अनेक प्राध्यापक, ग्रंथपाल, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

13 hrs ago
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
13 hrs ago
2e836048-f828-432f-9d48-ac8339dadef0

More news from Maharashtra and nearby areas
  • सांदीपनी पब्लिक स्कूलच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेने या विशेष दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
    1
    सांदीपनी पब्लिक स्कूलच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेने या विशेष दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house Nanded, Maharashtra•
    20 hrs ago
  • गावात कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरू असतानाही, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई वाढल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज घागर घेऊन निवेदन दिले. ही परिस्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे, जेव्हा पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे; मात्र, ग्रामपंचायतीने पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून घागरी घेऊन निवेदन सादर केले.
    1
    गावात कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरू असतानाही, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई वाढल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज घागर घेऊन निवेदन दिले.

ही परिस्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे, जेव्हा पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे; मात्र, ग्रामपंचायतीने पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून घागरी घेऊन निवेदन सादर केले.
    user_श्री व्यंकटेश देवराव कदम
    श्री व्यंकटेश देवराव कदम
    Voice of people बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमर राजुरकर यांनी तब्बल ३३९ मतं मिळवत विजयाची हॅट्रिक साधली आहे. एकूण ४५१ पैकी ३३९ मतं मिळवून राजुरकर विजयी झाले असून, हा विजय 'अशोक चव्हानाच्या विश्वासाची हॅट्रिक' असल्याचे म्हटले जात आहे. या विजयानंतर नवनिर्वाचित आमदार अमर राजुरकर यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. त्यांना 'सदृश्य आणि अदृश्य शक्तीची साथ मिळाल्याचे' त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसची जवळपास निम्मे मतं फुटल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.
    1
    विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमर राजुरकर यांनी तब्बल ३३९ मतं मिळवत विजयाची हॅट्रिक साधली आहे. एकूण ४५१ पैकी ३३९ मतं मिळवून राजुरकर विजयी झाले असून, हा विजय 'अशोक चव्हानाच्या विश्वासाची हॅट्रिक' असल्याचे म्हटले जात आहे.

या विजयानंतर नवनिर्वाचित आमदार अमर राजुरकर यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. त्यांना 'सदृश्य आणि अदृश्य शक्तीची साथ मिळाल्याचे' त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसची जवळपास निम्मे मतं फुटल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • न्यूज मराठी 24x7 वाहिनी परभणी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींचे थेट प्रक्षेपण दाखवत आहे. दर्शक 24 तास, 7 दिवस लाईव्ह टीव्हीवर या बातम्या पाहू शकतात.
    1
    न्यूज मराठी 24x7 वाहिनी परभणी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींचे थेट प्रक्षेपण दाखवत आहे. दर्शक 24 तास, 7 दिवस लाईव्ह टीव्हीवर या बातम्या पाहू शकतात.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • महायुतीच्या अभेद्य एकजुटीमुळे आमदार सईद खान यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांच्या या मोठ्या यशामागे महायुतीची भक्कम एकजूट प्रमुख कारण ठरली आहे, ज्यामुळे त्यांना हा विजय मिळवता आला.
    1
    महायुतीच्या अभेद्य एकजुटीमुळे आमदार सईद खान यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांच्या या मोठ्या यशामागे महायुतीची भक्कम एकजूट प्रमुख कारण ठरली आहे, ज्यामुळे त्यांना हा विजय मिळवता आला.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    13 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • देगलूर तालुक्यात श्रावणबाळ, इंदिरा गांधी निराधार आणि संजय गांधी निराधार योजनांचे एकूण 16,238 लाभार्थी गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. शासनाचे पोर्टल बंद असल्याने अनुदान मिळाले नसल्याने गोरगरीब, दिनदलित, वृद्ध, निराधार आणि अपंग लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या लाभार्थी आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी आज, 22 जून रोजी नायबतहसीलदार गणेश रायेवार यांना घेराव घालून जाब विचारला. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र व उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि या योजनांचे दहा वर्षे अध्यक्ष राहिलेले महेश पाटील, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे, विभाग प्रमुख राजेद्र उल्लेवार मुजळगेकर, गंगाधर पाटील चाकूरकर, उपविभाग प्रमुख गंगाधर वकंलवार होट्टलकर, गट प्रमुख सुभाष खुनेवाड माळेगांवकर, माजी सरपंच शिंदे आमदापूरकर, संग्राम माधवराव गाडले बल्लूरकर यांच्यासह शेकडो वृद्ध, निराधार, अपंग महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी शासनाला येत्या काही दिवसांत अनुदान न मिळाल्यास तहसील कार्यालयास कुलूप लावून धरणे आंदोलन करण्याचा तीव्र इशारा दिला आहे.
    1
    देगलूर तालुक्यात श्रावणबाळ, इंदिरा गांधी निराधार आणि संजय गांधी निराधार योजनांचे एकूण 16,238 लाभार्थी गेल्या तीन महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. शासनाचे पोर्टल बंद असल्याने अनुदान मिळाले नसल्याने गोरगरीब, दिनदलित, वृद्ध, निराधार आणि अपंग लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या लाभार्थी आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी आज, 22 जून रोजी नायबतहसीलदार गणेश रायेवार यांना घेराव घालून जाब विचारला. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र व उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि या योजनांचे दहा वर्षे अध्यक्ष राहिलेले महेश पाटील, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, युवा सेना शहर प्रमुख विनोद सोनकांबळे, विभाग प्रमुख राजेद्र उल्लेवार मुजळगेकर, गंगाधर पाटील चाकूरकर, उपविभाग प्रमुख गंगाधर वकंलवार होट्टलकर, गट प्रमुख सुभाष खुनेवाड माळेगांवकर, माजी सरपंच शिंदे आमदापूरकर, संग्राम माधवराव गाडले बल्लूरकर यांच्यासह शेकडो वृद्ध, निराधार, अपंग महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलकांनी शासनाला येत्या काही दिवसांत अनुदान न मिळाल्यास तहसील कार्यालयास कुलूप लावून धरणे आंदोलन करण्याचा तीव्र इशारा दिला आहे.
    user_जयपाल चांदोबा दावनगीरकर
    जयपाल चांदोबा दावनगीरकर
    Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नांदेड शहरामध्ये, आधार हॉस्पिटलच्या शेजारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि डोळ्यांची तपासणी केली जाईल.
    1
    नांदेड शहरामध्ये, आधार हॉस्पिटलच्या शेजारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि डोळ्यांची तपासणी केली जाईल.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.