नितीन गडकरी १० एप्रिलला 'पालखी मार्गा'ची पाहणी करणार; हर्षवर्धन पाटलांच्या विनंतीला तात्काळ होकार...! संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग ९६५ जी) कामात होत असलेला विलंब आणि निकृष्ट दर्जाबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी (दि. २८) नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाटलांनी या मार्गावरील समस्यांचा पाढा वाचला. या भेटीची दखल घेत नितीन गडकरी यांनी येत्या १० एप्रिल रोजी स्वतः पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे जाहीर केले आहे. निकृष्ट कामे आणि टोल वसुलीवर गडकरींचा संताप या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी पालखी मार्गावरील अनेक गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले. प्रामुख्याने जंक्शन उड्डाणपूल, गोतोंडी उड्डाणपूल, निमगाव केतकी बायपास आणि वडापुरी येथील कामांचा यात समावेश आहे. "रस्त्याची कामे अपूर्ण असताना टोल वसुली कशी काय सुरू झाली?" असा थेट सवाल गडकरींनी उपस्थित केला. त्यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून कामात सुधारणा करण्याचे आणि प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले. या प्रमुख मागण्यांवर झाली चर्चा: उड्डाणपूल व भुयारी मार्ग: जंक्शन, गोतोंडी, वडापुरी येथील उड्डाणपूल आणि वकीलवस्ती येथील भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे. बाह्यवळण रस्ते: बावडा आणि निमगाव केतकी येथील बायपास रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी लावणे. सुशोभीकरण व सुरक्षा: इस्टिमेटप्रमाणे वृक्षारोपण, रस्ता दुभाजक, स्ट्रीट लाईट आणि दिशादर्शक फलक लावणे. गटार व्यवस्था: अनेक ठिकाणी गटारींची कामे अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास दूर करणे. इथेनॉल प्रकल्पावरही खलबते रस्ते विकासासोबतच हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याशी इथेनॉल निर्मिती आणि त्यातील भविष्यातील संधींबाबतही सविस्तर चर्चा केली. गडकरींचा १० एप्रिलचा दौरा हा पालखी मार्गाच्या कामाला गती देणारा ठरेल, असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला.
नितीन गडकरी १० एप्रिलला 'पालखी मार्गा'ची पाहणी करणार; हर्षवर्धन पाटलांच्या विनंतीला तात्काळ होकार...! संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग ९६५ जी) कामात होत असलेला विलंब आणि निकृष्ट दर्जाबाबत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शनिवारी (दि. २८) नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाटलांनी या मार्गावरील समस्यांचा पाढा वाचला. या भेटीची दखल घेत नितीन गडकरी यांनी येत्या १० एप्रिल रोजी स्वतः पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे जाहीर केले आहे. निकृष्ट कामे आणि टोल वसुलीवर गडकरींचा संताप या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी पालखी मार्गावरील अनेक गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले. प्रामुख्याने जंक्शन उड्डाणपूल, गोतोंडी उड्डाणपूल, निमगाव केतकी बायपास आणि वडापुरी येथील कामांचा यात समावेश आहे. "रस्त्याची कामे अपूर्ण असताना टोल वसुली कशी काय सुरू
झाली?" असा थेट सवाल गडकरींनी उपस्थित केला. त्यांनी तत्काळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून कामात सुधारणा करण्याचे आणि प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले. या प्रमुख मागण्यांवर झाली चर्चा: उड्डाणपूल व भुयारी मार्ग: जंक्शन, गोतोंडी, वडापुरी येथील उड्डाणपूल आणि वकीलवस्ती येथील भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे. बाह्यवळण रस्ते: बावडा आणि निमगाव केतकी येथील बायपास रस्त्यांची प्रलंबित कामे मार्गी लावणे. सुशोभीकरण व सुरक्षा: इस्टिमेटप्रमाणे वृक्षारोपण, रस्ता दुभाजक, स्ट्रीट लाईट आणि दिशादर्शक फलक लावणे. गटार व्यवस्था: अनेक ठिकाणी गटारींची कामे अपूर्ण असल्याने पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास दूर करणे. इथेनॉल प्रकल्पावरही खलबते रस्ते विकासासोबतच हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याशी इथेनॉल निर्मिती आणि त्यातील भविष्यातील संधींबाबतही सविस्तर चर्चा केली. गडकरींचा १० एप्रिलचा दौरा हा पालखी मार्गाच्या कामाला गती देणारा ठरेल, असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला.
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- BARAMATI BREAKING : बारामती तालुक्यात आज गारांसह जोरदार पावसानं हजेरी लावली.. यात मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे.. त्यामुळं शेतकरी धास्तावले असून शासन आता काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलं आहे..1
- थोपटे वाडी येथे पाण्याची पाईपलाईन व रस्त्याच्या कामाचे पाणी करून ते तात्काळ दुरुस्त करून काम पूर्ण करण्याचे सभापती किरण तावरे यांनी दिले आदेश1
- सुषमा अंधारे यांनी खरात व दीपक आबा साळुंखे यांच्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते त्याला दीपक आबा साळुंखे यांनी प्रत्युत्तर दिले.1
- शिरुर, { डेली न्यूज पोस्ट टीम 24} भैरवनाथाचा नावाने चांगभल , च्या जयघोषात भैरवनाथाच्या बगाड यात्रेस रामलिंग येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली . तर्डोबाची वाडी येथील बगाड यात्रा दरवर्षा आड होत असते . रामलिंग जुने शिरुर येथील भैरवनाथ मंदिरा पासून बगाड यात्रा मिरवणूकीस सुरुवात झाली. यावेळी पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, कमिशनर इन्स्पेक्टर जनरल अमित घावटे, रामलिंगच्या सरपंच शिल्पा गायकवाड, माजी सरपंच अरुण घावटे, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, माजी सरपंच विठ्ठल घावटे, सोमनाथ घावटे, माजी नगरसेवक प्रवीण दसगुडे, रामलिंग देवस्थानचे ट्रस्टी पोपटराव दसगुडे, प्रा. डॉ. राजेराम घावटे, डॉ. विक्रम घावटे, डॉ. राहुल घावटे, दीपक घावटे , अनिल घावटे, माजी पंचायत समिती सदस्य दादापाटील घावटे, बाबाजी वर्पे, किरण घावटे ,व बगाडाचे मानकरी उपस्थित होते . रामलिंग मंदिर येथील भैरवनाथ मंदिरातील भैरवनाथ हा थोरला भैरवनाथ तर तर्डोबाची वाडी येथील भैरवनाथ मंदिरातील भैरवनाथ हा धाकटा भैरवनाथ समजला जातो. तर्डोबावाडीच्या भैरवनाथाचा लग्न सोहळया साठी बगाडदवारे व-हाड घेवून रामलिंग येथील थोरला भैरवनाथ जातो व वाडीच्या भैरवनाथ व जोगेश्वरी देवीच्या लग्नसोहळा पार पाडतो. बगाड कडानीच्या डोंगरा ( शहा डोंगर ) जवळ आल्यानंतर पालखी गावातून येते व सायंकाळी भैरवनाथाचा विवाह पार पाडला जातो . काल सायंकाळी देवाच्या हळदीचा कार्यक्रम ही पार पडला . बगाड प्रस्थानाचा वेळी वाद्यांच्या गजर करण्यात आला . रामलिंग मंदिर ,मारुती मंदिरा कडून बगाडाने पाषाणमळा कडे प्रस्थान केले.ठिकठिकाणी बगाडाचे स्वागत करण्यात आले व भंडा- याची उधळण करण्यात आली .पाषाणवाडी जवळील दत्त मंदिर येथे बगाड हे विसावासाठी थांबले होते . याठिकाणी तर्डोबाचीवाडी ग्रामस्थांच्या कडे बगाड सुपूर्त करण्यात आले .माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे, बाजार समितीचे माजी सदस्य संतोष मोरे, बबनराव कर्डीले , संभाजी कर्डीले, नगरसेवक अमित कर्डीले, माजी उपसरपंच गणेश खोले, आदी सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . बाबूराव नगर , बाफना मळा ,गंगानगर या मार्गाने बगाड मार्गस्थ झाले. .कडानीच्या डोंगरावरुन बगाड तर्डोबावाडीच्या कडे बगाड खाली उतरतानाचा सोहळ्या अत्यंत नयनमनोहर असतो. हा सोहळा पाहण्यासाठी कडानीच्या डोंगर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . डोंगरावरुन बगाड उतरताना नाथ साहेबांच्या नावाने चांगभलच्या जयघोषाने आसमंत दुमदूमून गेला .कडानीच्या डोंगरावर बगाडाच्या आढा फिरविण्यात आला .दरम्यान काही काळ पाऊसाचे थेंब पडल्याने गारवा निर्माण झाला होता. बगाडा बरोबर आलेल्या व- हाडी मंड्ळीचे स्वागत तर्डोबावाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. बगाड यात्रेनिमित्त भैरवनाथ मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली असून उद्या गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी दंडवत व शेरणीचा कार्यक्रम आहे .पुर्वी हे बगाड पाठीला गळ लावून ओढले जायचे जिथे बगाडाचा आढा फिरविला जातो. त्याठिकाणी पाठीचा गळ सुटला व त्या व्यक्तीचा अपघात झाला त्यामुळे या यात्रेवर ब्रिटीशानी बंदी घातली होती त्यानंतर लोकांनी ही बंदी मागे घ्यावी अशी मागणी केली . बगाड गळाने न आणता बैलाने आणण्याचे कबूल केल्यावर वर्षा आड बगाडास परवानगी देण्यात आल्याचे पंचक्रोशीतील बुजुर्ग सांगतात . फोटो ओळी तर्डोबाचीवाडी येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त बगाड काढण्यात येते बगाड यात्रेत सहभागी झालेले भाविक1
- Post by Kishor subhash jadhav1
- ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- सांगोला तालुका वाटंबरे येथे आज आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका व इतर पिकांचे नुकसान झाले तसेच मोठमोठे झाडे उन्मळून पडली.1